एर्विन रोमेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एर्विन रोमेल

एर्विन रोमेल (पूर्ण नाव: एर्विन योहानस युजिन रोमेल)(नोव्हेंबर १५, इ.स. १८९१ - ऑक्टोबर १४, इ.स. १९४४, ज्यांना नुसते फील्ड मार्शल रोमेल म्हणून ओळखले जाते) हे दुसऱ्या महायुद्धातील सर्वात प्रसिद्ध जर्मन सेनापतींपैकी एक होते. जर्मनीचा महान सेनानायक. रोमेलचा जन्म १८९१ मध्ये स्टुटगार्ट जवळिल हाइडेनहाइम येथे झाला. त्याची जर्मन लष्करामध्ये अधिकारी कॅडेट म्हणून १९१० मध्ये भरती झालि. आणि लवकरच अधिकारीपदावर सेकन्ड लेफ्टनंट म्हणून १९१२ मध्ये नेमणूक झालि. त्यानी पहिल्या महायुद्धात फ्रान्स रोमेनिया व इटलि मधील आघाडिवर काम केले.

पहिल्या महायुद्धानंतर रोमेलनी लष्करी विद्यालयात शिक्षक म्हणून काम केले १९२९-३३ ड्रेसडेन इन्फंट्रि स्कुल त्यानंतर १९३५- ३८ पोस्टडॅम वॉर अकादमी. यावेळेपर्यंत रोमेल एक साधा अधिकारी म्हणूनच ज्ञात होता त्याची सर्वात पहिलि छाप १९३८ मध्ये पडलि जेव्हा त्याला हिटलरच्या सुरक्षेची जवाबदारी सोपवण्यात आलि. त्यानंतर रोमेलने पोलंडच्या आक्रमणामध्ये महत्त्वपुर्ण कामगीरी पार पाडलि.

पोलंड्च्या कामगिरी नंतर रोमेलची मेजर जनरल पदी नियुक्ति झालि. त्याने ७व्या पॅन्झर डिव्हिजनची सुत्रे हाति घेतलि व फ्रान्सच्या आक्रमणात उल्लेखनिय कामगिरी बजावलि.