आफ्रिका कोर
Appearance
डॉयचेस आफ्रिका कोर, जर्मन आफ्रिका कोर तथा आफ्रिका कोर ही नाझी जर्मनीची दुसऱ्या महायुद्धातील आक्रमक कोर होती. या सैन्यदलाने मुख्यत्वे उत्तर आफ्रिकेच्या रणांगणात भाग घेतला व आपल्या अतुलनीय शौर्य व डावपेचांमुळे जगातील सर्वोत्तम लढाऊ सैन्यांमध्ये गणली गेली.
या कोरला दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस उत्तर आफ्रिकेतील जर्मन वसाहतींचे रक्षण करण्यासाठी पाठविले गेले होते. मार्च १९४१ ते मे १९४३ दरम्यान आफ्रिका कोरने दोस्त राष्ट्रांशी झुंज दिली व शेवटी अल अलामेनच्या दुसऱ्या लढाईनंतर शरणागती पत्करली.
फील्ड मार्शल अर्विन रॉमेल या कोरच्या सेनापतींपैकी एक होता.