एगॉन क्रेंझ
Appearance
एगॉन क्रेंझ (जर्मन: Egon Rudi Ernst Krenz; १९ मार्च १९३७, कोल्बर्ग, जर्मनी (आजचा झाखोज्ञोपोमोर्स्का प्रांत, पोलंड) हा पूर्व जर्मनी ह्या भूतपूर्व देशाच्या कम्युनिस्ट पक्षाचा अखेरचा अध्यक्ष व पर्यायाने अल्प काळासाठी पूर्व जर्मनीचा अखेरचा राष्ट्रप्रमुख होता. १९८९ सालच्या क्रांतीदरम्यान क्रेंझला पूर्व जर्मनीमध्ये कम्युनिस्ट राजवट चालू ठेवण्यात यश आले नाही. बर्लिनची भिंत पडून जर्मनीचे पुनःएकत्रीकरण झाल्यानंतर क्रेंझला पदाचा राजीनामा देणे भाग पडले.
१९९० साली क्रेंझवर ४ पूर्व जर्मन व्यक्तींना ठार मारल्याच्या आरोपावरून खटला भरण्यात आला व त्याला साडेसहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.
मागील एरिक होनेकर |
पूर्व जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष १९८९ |
पुढील − |