एक्सप्रेसजेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एक्सप्रेसजेट अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील कॉलेज पार्क शहरात स्थित प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी पूर्णपणे स्कायवेस्ट इंकॉर्पोरेटेडच्या मालकीची आहे. स्कायवेस्ट इंकॉर्पोरेटेड स्कायवेस्ट एरलाइन्सची मालक कंपनी आहे. स्कायवेस्टने विकत घेण्याआधी एक्सप्रेसजेट स्वतंत्र कंपनी होती व त्याही आधी ती कॉंटिनेंटल एरलाइन्सची उपकंपनी होती.

एक्सप्रेसजेट अमेरिकन ईगल आणि युनायटेड एक्सप्रेस या विमानवाहतूक कंपन्यांना त्यांच्या नावाखाली विमानसेवा पुरवते. यापूर्वी ती डेल्टा कनेक्शनला सुद्धा ही सेवा पुरवायची.

एक्सप्रेसजेटकडे सीआरजे-२००, सीआरजे-७००, सीआरजे-९००, एम्ब्राएर १३५, एम्ब्राएर-१४५ एलआर आणि एम्ब्राएर-१४५ एक्सआर प्रकारची विमाने आहेत.