स्कायवेस्ट एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्कायवेस्ट एअरलाइन्स अमेरिकेतील प्रादेशिक विमानकंपनी आहे. सेंट जॉर्ज, युटा येथे मुख्यालय असलेली ही कंपनी देशभर तसेच परदेशातही विमानसेवा पुरवते ही कंपनी बव्हंशी इतर विमानकंपन्यांसाठी प्रादेशिक सेवा पुरवते. रोज १,७१४ उड्डाणे असलेली स्कायवेस्ट एअरलाइन्स अलास्का एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स (युनायटेड एक्सप्रेस), यूएस एरवेझ (यूएस एरवेझ एक्सप्रेस), डेल्टा एअरलाइन्स (डेल्टा कनेक्शन), अमेरिकन एअरलाइन्स (अमेरिकन ईगल) या मोठ्या विमानकंपन्याच्या उपकंपन्यांसारखी सेवा पुरवते. ही उड्डाणे अमेरिकेच्या ५०पैकी ४३ राज्ये, वॉशिंग्टन डी.सी., कॅनडा आणि मेक्सिको मधील शहरांत जातात.