एकता यात्रा
एकता यात्रा (English: National Integration rally) ही भारतीय जनता पार्टी (भाजपा) युवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकसभा खासदार अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली चालवली जाणारी यात्रा आहे. [१] या यात्रेला काही बातम्या एजन्सींनी तिरुंगा यात्रा देखील संबोधतात. [२] १२ जानेवारी रोजी कोलकाता, पश्चिम बंगालमधून ही यात्रा सुरू झाली. या यात्रेच्या योजनेनुसार ही यात्रा झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, हरयाणा या राज्यांमधून नेण्यात आली. २६ जानेवारीला श्रीनगरच्या लाल चौक येथे तिरुंगा फड्कावून या यात्रेची सांगता करण्यात येणार होती. परंतू भाजपच्या नेत्यांना अटक करण्यात आली आणि कश्मीरमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नसल्यामुळे हे झाले नाही.[३] ही यात्रा रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी सर्व काही केले.
अभूतपूर्व घटना[संपादन]
स्वतंत्र भारतात आधी कधीही न पाहिलेली किंवा न ऐकलेली अशा अभुतपूर्व कारवाई सरकारने केली. गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार, कर्नाटक ते दिल्ली निघालेली रेल्वेगाडी, १५०० भाजप कार्यकर्त्यांनी भरलेली, परत फिरवली. त्यावेळेस भाजपा कार्यकर्ते गाडीतच झोपलेले होते.