ऊती (जीवशास्त्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
उती 
cellular organizational level intermediate between cells and a complete organism; cells that are grouped together with a common function
उपवर्ग multicellular structure,
biological component,
organism substance,
उती
ह्याचा भाग organ
अधिकार नियंत्रण
विकिडाटा
Blue pencil.svg
ह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतरभाषा ते मराठी मशिन ट्रांसलेशन वापरून, [[]] भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयास संबंधीत मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशिन ट्रांसलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थीत अनुवादीत वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशिन ट्रान्सलेशन/निती काय आहे?)
हे सुद्धा करा: विकिकरण,शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपासःऑनलाईन शब्दकोश, अन्य सहाय्य: भाषांतर प्रकल्प.

ऊती हे पेशी पासून तयार झालेल्या संस्था असतात. ऊती हे समान मूळ असलेले पेशीने बनलेले असतात, जे एकत्रितपणे एक विशिष्ट कार्य करतात.  अनेक ऊती मिळून एक अवयव बनवतात, अवयव मधील सर्व ऊती  एकत्र काम करतात. सर्व साजीवांमध्ये निरनिराळ्या प्रकारांच्या ऊती एकत्र येउन अवयव बनवतात, हे अवयव एकत्र येउन अवयव संस्था तयार होते. उद. श्वासंसंस्त्था, पचनसंस्था इ.

पेशी -> ऊती -> अवयव -> अवयव संस्था -> सजीव.

प्राण्यांचे ऊती[संपादन]

प्राणी ऊतींचे चार प्रकार आहेत. त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करतात: अभिस्तर ऊती, स्नायू ऊती, चेता ऊती, संयोजी ऊती.

अभिस्तर उती : अभिस्तर उतींमधील पेशांची रचना दाटीवाटीची असून त्या एक मेकीस चिटकून असतात. त्यामुळे त्यांचा एक सलग स्थळ तयार होतो. अभिस्तर हे अन्तर्प्रेशिय पोकळीतील तंतूमय पटलाने खालच्या उतींपासून वेगळे झालेले असते. त्वचा, तोंडाच्या आतील स्थर, रक्तवाहिन्यांचे स्थर इ. हे अभिस्थर उतीपासून बनलेले असतात. अभिस्तर उतीचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहेत:

 • सरल पटट्की अभिस्तर
 • स्तरीत पटट्की अभिस्तर
 • स्तम्भीय अभिस्तर
 • रोमक स्तम्भीय अभिस्तर
 • घनाभरूप अभिस्तर
 • ग्रंथिल अभिस्तर

संयोजी उती : संयोजी उतीमध्ये अधारक असते आणि त्या आधारराकांमध्ये पेशी रुतलेल्या असतात. या आधारकाचे स्वरूप, घनता आणि प्रमाण हे त्यातील संयोजी उटीच्या कार्यानुसार ठरते. हे अधारक जेलीस्दृश द्रवरूप व दाट किंवा दृढ अस्ते. संयोजी उतीचे बरेच विविध प्रकार असतात:

 • -अस्थी
 • -रक्त
 • -अस्थिबंध
 • -स्नायुरज्जू
 • -कास्थी
 • -विरल उती
 • -चरबीयुक्त उती

स्नायू उती : स्नायू उती या स्नायूतंतूच्या लांब पेशीपासून बनलेल्या असतात. स्नायुंमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रथिन असते. त्यास 'संकोची प्रथिन' असे म्हणतात या प्रथिनानच्या आकुंचन व प्रसारणामुळे स्नायूंची हालचाल होते.

चेता उती : सर्व पेशींमध्ये चेतना क्षमता आढळते. या उती चेतना ग्रहण करतात व या अत्यंत जलद गतीने शरीरातील एका भागाकडून दुसर्या भागाकडे वहन करतात. मेन्दू , चेतरज्जू व चेतान्तू हे सर्व चेताउतीनी बनलेले असतात.

वनस्पती ऊती[संपादन]

वनस्पती ऊतींचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत : साध्या ऊती व संयुक्त ऊती

बाह्य दुवे[संपादन]