उल्का महाजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उल्का महाजन या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.

शिक्षण[संपादन]

वडील सरकारी नोकरीत असल्याकारणे उल्का महाजन यांचे शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये झाले. काॅलेजचे शिक्षण मुंबईत. त्या एमएसडब्ल्यू (मास्टर्स डिग्री इन सोशल वेलफेअर) पदवीधर आहेत.

कामाचा विषय[संपादन]

एमएसडब्ल्यू पदवी घेतल्यानंतर उल्का महाजन यांनी रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागातील लोकांसाठी १९८९ साली काम सुरू केले. त्या जिल्ह्यातील कातकरी आदिवासींचा पिढ्या न पिढ्या कसत आलेल्या जमिनीवरही हक्क नाही. या जमिनींच्या कागदपत्रावर त्यांचे नावच नाही. कात पाडण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय, परंतु जंगलतोडीमुळे ते काम बंद झाले आणि या आदिवासींवर उपासमारीची पाळी आली. पोटासाठी दुसऱ्याच्या जमिनीवर वेठबिगारी करून वर्षानुवर्षे ते शोषणाचे बळी ठरू लागले. पंधरा हजार कुटुंबे आणि सुमारे पंचाहत्तर हजार लोकांसाठी उल्का महाजन या सुमारे दोन दशके लढे करत आहेत. शेतकऱ्यांना जमिनीचे हक्क मिळवून देणे, त्यांचे पुनर्वसन करणे, शेतमजुरांना संघटित करणे, वीटभट्ट्यांवरील कामगार आणि स्थलांतरित मजुरांची संघटना बांधणे, आदिवासी महिलांना आधार देणे, रायगड जिल्ह्यातील दलितांना पाण्याचा समान हक्क मिळवून देणे अशा विविध लढ्यांबरोबरच रायगडमधील एसईझेड (स्पेशल इकाॅनॅमिक झोन) आणि दिल्ली - मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरविरोधातील लढ्यातही त्या सतत अग्रेसर राहिल्या. शोषित अन्यायग्रस्तांसाठी त्यांनी केलेल्या कामाची विविध संस्था संघटनांनी दखल घेतली असून विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.

उल्का महाजन यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

उल्का महाजन यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • कार्य आणि कार्यकर्ते (आत्मकथन).
  • कोसळता गावगाडा २०१५.

बाह्यदुवे[संपादन]

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/ulka-mahajan/articleshow/35529750.cms