Jump to content

उत्तमराव ढिकले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तमराव नथुजी ढिकले

मतदारसंघ नाशिक

जन्म १० फेब्रुवारी १९४०
विंचूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यु ७ एप्रिल, २०१५ (वय ७५)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
अपत्ये राहुल उत्तमराव ढिकले
निवास ढिकले नगर, पंचवटी, नाशिक
शिक्षण LLB

उत्तमराव नथुजी ढिकले हे नाशिकचे माजी खासदार होते. शिवसेनेकडून ते भारताच्या तेराव्या लोकसभेचे सदस्य राहिले होते.[१] त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून नाशिक पूर्व मतदार संघाचे आमदार म्हणून काम पहिले.[२] उत्तमराव ढिकले यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी नाशिक येथे निधन झाले.[३][४][५][६][७]

जीवन[संपादन]

उत्तमराव ढिकले यांचा जन्म १० फेब्रुवारी १९४० रोजी विंचूर जिल्हा नाशिक येथे झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून त्यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केले. वयाच्या २७ व्या वर्षी ते नाशिक नगरपालिकेचे तरुण नगराध्यक्ष म्हणून निवडून आले.[४] नाशिक जिल्ह्यातील सहकार चळवळीत उत्तमराव ढिकले यांचे मोठे योगदान आहे. उत्तमराव ढिकले यांचे पुत्र राहुल उत्तमराव ढिकले हे नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहे.[८]

राजकीय कारकीर्द[संपादन]

 • नगराध्यक्ष नाशिक नगरपालिका (१९६७-१९६८)[४]
 • नगरसेवक नाशिक नगरपालिका(१९६७-१९८०)
 • नगरसेवक नाशिक महानगरपालिका (१९९२-१९९७)
 • सरचिटणीस नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी (१९७०-१९८०)[४]
 • संचालक नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक(१९७४-२०१३)
 • अध्यक्ष नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक(१९७४-१९७५, १९८२-१९८३, २००७-२००८)[५]
 • महापौर नाशिक महानगरपालिका(१९९५-१९९६)
 • सदस्य नाशिक लोकसभा मतदार संघ (१९९९-२००४)[१]
 • संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (१९९८-२००४)
 • सदस्य सल्लागार समिती कृषी मंत्रालय (२०००-२००४)[९]
 • महाराष्ट्र विधानसभा सदस्य (२००९-२०१४)[७]

संदर्भ[संपादन]

 1. ^ a b "Members : Lok Sabha". loksabha.nic.in. 2023-02-17 रोजी पाहिले.
 2. ^ "Adv. Dhikale Uttamrao Nathuji(MNS):Constituency- Nashik East(NASHIK) - Affidavit Information of Candidate:". myneta.info. 2023-02-17 रोजी पाहिले.
 3. ^ "Former MP Uttam Nathuram Dhikale passes away". Mid-day (इंग्रजी भाषेत). 2015-04-07. 2023-02-17 रोजी पाहिले.
 4. ^ a b c d "Ex-MLA Dhikle passes away". 2015-04-08. ISSN 0971-8257.
 5. ^ a b "अजातशत्रू हरपला!". Maharashtra Times. 2023-02-17 रोजी पाहिले.
 6. ^ "उत्तमराव ढिकले यांचे निधन". Maharashtra Times. 2023-02-17 रोजी पाहिले.
 7. ^ a b "अ‍ॅड. उत्तमराव ढिकले अनंतात विलीन". Loksatta. 2023-02-17 रोजी पाहिले.
 8. ^ "Rahul Uattamrao Dhikle(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency- NASHIK EAST(NASHIK) - Affidavit Information of Candidate:". myneta.info. 2023-02-17 रोजी पाहिले.
 9. ^ "Shri Uttamrao Nathuji Dhikale MP biodata Nashik | ENTRANCE INDIA" (इंग्रजी भाषेत). 2018-12-24. Archived from the original on 2023-02-16. 2023-02-17 रोजी पाहिले.