Jump to content

२०११ तोहोकू भूकंप व त्सुनामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इ.स. २०११ जपान भूकंप आणि त्सुनामी या पानावरून पुनर्निर्देशित)
सेंदाई येथे झालेल्या भूकंप व त्सुनामीच्या विध्वंसानंतर अन्नवाटप करणाऱ्या हेलिकॉप्टरातून घेतलेले प्रकाशचित्र

इ.स. २०११ जपान भूकंप आणि त्सुनामी मार्च ११, इ.स. २०११ रोजी आशियातील जपान देशामध्ये घडून आला. रिश्च्टर स्केलवर ९.०-९.१ इतका भीषण आवाका असणाऱ्या ह्या भूकंपाचे केंद्र प्रशांत महासागरामध्ये जपानच्या तोहोकू प्रदेशातील किनारपट्टीच्या ७२ किमी पूर्वेस होते. ह्या समुद्राखाली घडलेल्या भूकंपामुळे व त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे जपान देशाचे भीषण नुकसान झाले.

भूकंप[संपादन]

मार्च ११, इ.स. २०११ रोजी जपानाच्या किनारपट्ट्यांना त्सुनामीचा तडाखा बसला. जपानी प्रमाणवेळेनुसार दुपारी २.४६ वाजता जपानाच्या किनाऱ्यापासून १२५ कि.मी. अंतरावर सुमारे १० कि.मी. खोलीवर ९.० रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. त्यातून उद्भवलेल्या त्सुनामीने काही मिनिटांतच किनारपट्टी गाठली. केवळ किनारपट्टीशीच न थांबता ही त्सुनामी किनाऱ्यापासून आत अनेक कि.मी. अंतरापर्यंत पसरत गेली. जमिनीवर पसरताना या लाटेने किनाऱ्याजवळच्या मोठ्या जहाजांना तर आपल्या कवेत घेतलेच; सोबत रस्त्यांवरील मोटारी, घरे आदींसह जे काही वाटेत आले ते सगळेच गिळंकृत केले.

त्सुनामी[संपादन]

जपान भूकंपानंतर आणि त्सुनामीच्या लाटांची उंची

मियागीजवळील समुद्रात ३३ फुटांहून अधिक उंचीच्या लाटा उसळल्या. त्यात अनेक जहाजे वाहून गेली. त्सुनामीच्या लाटा किनारपट्टीपासून कित्येक किलोमीटर आतपर्यंत शिरल्याने मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. त्सुनामीचा तडाखा एवढा जबरदस्त होता, की उत्तर जपानातले रस्ते उखडून वर आले. लाव्हारस बाहेर पडावा, त्याप्रमाणे प्रचंड वेगाने त्सुनामीचे पाणी आपल्या वाटेत येणाऱ्या सर्व गोष्टी घेऊन कित्येक किलोमीटर आत घुसले. तोक्यो आणि परिसरातील सुमारे ४० लाख घरांतील विद्युतप्रवाह खंडित झाला [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "जपानमध्ये आण्विक आणीबाणी". Archived from the original on 2011-03-16. 2011-03-12 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]