इलिरिकम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


रोमन साम्राज्याचा इलिरिकम प्रांत

इलिरिकम (लॅटिन: Illyricum) हा इ.स.पू. २७ मध्ये स्थापन केलेला एक रोमन प्रांत होता. एड्रियाटिक समुद्राच्या पूर्व किनारपट्टीचा व आतील डोंगराळ भूभागाचा या प्रांतात समावेश होता. पुढे सम्राट व्हेस्पासियनच्या कारकिर्दीमध्ये इ.स. ६९ ते ७९ या काळात या प्रांताचे रूपांतर डॅल्मॅशिया मध्ये झाले.