Jump to content

इराण असेमान एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इराण असेमान एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
EP
आय.सी.ए.ओ.
IRC
कॉलसाईन
ASEMAN
हब तेहरान इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ (तेहरान)
मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे शिराझ
मशहद
रश्त
सनंदाज
विमान संख्या ३५
गंतव्यस्थाने ५४
ब्रीदवाक्य We Guarantee Your Safety in The Sky
मुख्यालय तेहरान, इराण
मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इराण असेमानचे एअरबस ए३४० विमान

इराण असेमान एरलाइन्स (फारसी: هواپیمایی آسمان‎) ही मध्य पूर्वेतील इराण ह्या देशामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे.

विमानताफा

[संपादन]

सध्याचा ताफा

[संपादन]

ऑगस्ट २०२५ च्या सुमारास इराण असेमान एरलाइन्सची विमाने:[]

विमान सेवेत मागण्या प्रवासी नोंदी
एरबस ए३२०-२००
एरबस ए३४०-३०० २५७
बोईंग ७३७-४०० १४४ ए३२०-२०० विमाने पुन्हा सेवेत आल्यावर निवृत्त केली जातील
फोक्कर १०० १००
एकूण २२

पूर्वीची विमाने

[संपादन]
इराण असेमान एरलाइन्सचे एक एटीआर ७२-५००
विमान एकूण दाखल निवृत्त नोंदी
एरबस ए३२०-२०० २०१४ २०२१ निर्बंधांमुळे सर्व विमाने जमिनीवर ठप्प आहेत.[ संदर्भ हवा ]
एटीआर ७२ १९९३ २०१९ एक विमान फ्लाइट ३७०४ म्हणून कोसळले
बोईंग ७२७-२०० १९९८ २०१९ बोईंग ७२७ चे शेवटचे व्यावसायिक प्रवासी संचालक
फोक्कर एफ २७ फ्रेंडशिप ? ? ? ईपी-एएनए भंगारात काढले
फोक्कर एफ २८ ? १९८०-१९९० २००४ एक विमान फ्लाइट ७४६ म्हणून कोसळले, ईपी-पीएयू एका घटनेत सामील होते

अपघात आणि दुर्घटना

[संपादन]
  • ४ ऑक्टोबर १९९० रोजी इराण असेमानचे फोक्कर एफ२७ फ्रेंडशिप (नोंदणी क्रमांक EP-ANA) रामसर विमानतळावर उतरताना धावपट्टी ओलांडून पुढे गेले १०० मीटर अंतरावरील एका काँक्रीटच्या भिंतीला धडकून थांबले. विमानातील ४६ प्रवासी आणि चार कर्मचारी वर्गापैकी कोणीही दगावले नाही आणि विमानाची पूर्णपणे दुरुस्ती करण्यात आली.[]
  • १२ ऑक्टोबर १९९४ रोजी इराण असेमान एरलाइन्स फ्लाइट ७४६ हे फोक्कर एफ२८ फेलोशिप (नोंदणी क्रमांक EP-PAV) इस्फहानहून तेहरानला जात असताना, इस्फहान आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ३५ मिनिटांनी स्थानिक वेळेनुसार २३:०५ वाजता दोन्ही इंजिनांची शक्ती अचानक कमी झाली. विमान अनियंत्रितपणे खाली कोसळले आणि नतांझ जवळ अपघातग्रस्त झाले. यामध्ये विमानातील सर्व ५९ प्रवासी आणि सात कर्मचारी मारले गेले.[]
  • १८ जुलै २००० रोजी इराण असेमान एरलाइन्स फ्लाइट ७७५ हे फोक्कर एफ२८ फेलोशिप (नोंदणी क्रमांक EP-PAU) तेहरानहून अहवाझला जात असताना धुक्यामध्ये वैमानिकाने अहवाझ विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करताना धावपट्टी चुकली आणि विमान धावपट्टी बाहेर उतरले. वैमानिकाने पुन्हा एकदा विमान हवेत घेउन नंतर सुखरूप उतरवले. विमानातील ८४ प्रवासी व चार कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही इजा झाली नाही परंतु विमान भंगारात काढावे लागले.[]
  • २६ ऑगस्ट २०१० रोजी तेहरानहून तब्रिझला जाणारे इराण असेमान एरलाइन्स फ्लाइट ७७३ हे फोक्कर १०० (नोंदणी क्रमांक EP-ASL) तब्रिझ आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टी ओलांडून पुढे गेले आणि एका कालव्यात पडले. यात विमानाचे मोठे नुकसान झाले. विमानातील १०३ प्रवाशांपैकी दोन प्रवासी जखमी झाले, तर सात कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही इजा झाली नाही.[][]
  • १० मे २०१४ रोजी एक फोक्कर १०० (नोंदणी क्रमांक EP-ASZ) इराणमधील झहेदान विमानतळावर उतरताना झालेल्या अपघातात नुकसानग्रस्त झाले. हे विमान मशहद विमानतळावरून फ्लाइट ८५३ म्हणून आले होते. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार उतरण्यापूर्वी डाव्या बाजूची मुख्य चाके खाली आली नव्हती किंवा लॉक झाली नव्हती. धावपट्टी ३५ वर सक्तीचे लँडिंग करण्यात आले. विमान डाव्या बाजूला वळले आणि धावपट्टीच्या सुरुवातीपासून १,४५० मीटर पुढे आणि मध्यरेषेच्या २३ मीटर डावीकडे भरकटत जाउन थांबले.[]
  • १८ फेब्रुवारी २०१८ रोजी इराण असेमान एरलाइन्स फ्लाइट ३७०४ हे एटीआर ७२-२०० (नोंदणी क्रमांक EP-ATS) तेहरानहून यासुजला जात असताना मेहराबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ८५ मिनिटांनी रडारवरून गायब झाले आणि इस्फहानच्या दक्षिणेला झाग्रोस पर्वतावर कोसळले.[] विमानातील सर्व ६६ व्यक्ती (६० प्रवासी आणि सहा कर्मचारी) मृत्युमुखी पडल्या.

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Global Airline Guide 2025 - Iran Aseman Airlines". Airliner World. September 2025. p. 62.
  2. Ranter, Harro. "ASN Aircraft accident Fokker F-27 Friendship 600 EP-ANA Ramsar Airport (RZR)". aviation-safety.net. 18 February 2018 रोजी पाहिले.
  3. Ranter, Harro. "ASN Aircraft accident Fokker F-28 Fellowship 1000 EP-PAV Natanz". aviation-safety.net. 18 February 2018 रोजी पाहिले.
  4. Ranter, Harro. "ASN Aircraft accident Fokker F-28 Fellowship 4000 EP-PAU Ahvaz Airport (AWZ)". aviation-safety.net. 18 February 2018 रोजी पाहिले.
  5. Ranter, Harro. "ASN Aircraft accident Fokker 100 EP-ASL Tabriz Airport (TBZ)". aviation-safety.net. 18 February 2018 रोजी पाहिले.
  6. "Plane Skids off Runway in Northwestern Iran". Fars News Agency. 27 August 2010 रोजी पाहिले.
  7. Ranter, Harro. "ASN Aircraft accident Fokker 100 EP-ASZ Zahedan Airport (ZAH)". aviation-safety.net. 18 February 2018 रोजी पाहिले.
  8. "'No survivors' in Iranian plane crash". BBC News. 18 February 2018. 18 February 2018 रोजी पाहिले.