इतमार फ्रँको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतमार ऑगस्टो कॉटोरिओ फ्रॅंको ( २८ जून १९३०, मृत्यु:२ जुलै २०११) हा एक ब्राझिलियन राजकारणी होता. त्याने ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष म्हणून २९ डिसेंबर १९९२ ते १ जानेवारी १९९५ या काळात आपली सेवा दिली. तो सन १९९० ते फर्नांडो कोलोर डी मेलो याने राष्ट्राध्यक्षाचा राजिनामा देईपर्यंत उपराष्ट्राध्यक्ष होता. त्याचे राजकारणाचे दीर्घ कार्यकाळात, तो सिनेटर, राजदूत व गव्हर्नरही होता. त्याचे मृत्युचे वेळी, सन २०१० मध्ये त्या पदावर निवडून आल्यावर, तो मिनास जेराईस या राज्याचा सिनेटर होता.