Jump to content

इजिप्तएर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इजिप्तेर या पानावरून पुनर्निर्देशित)
इजिप्तएर
आय.ए.टी.ए.
MS
आय.सी.ए.ओ.
MSR
कॉलसाईन
EGYPTAIR
स्थापना ७ जून १९३२ (मिस्र एरलाइन्स ह्या नावाने)
हब कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे अलेक्झांड्रिया, लुक्सोर, हुर्गादा, शर्म अल-शेख
फ्रिक्वेंट फ्लायर माइल्स अँड स्माईल
अलायन्स स्टार अलायन्स
विमान संख्या ८०
ब्रीदवाक्य Enjoy the Sky
मुख्यालय कैरो, इजिप्त
संकेतस्थळ http://www.egyptair.com/
इस्तंबूल अतातुर्क विमानतळावर थांबलेले इजिप्तएरचे बोईंग ७३७ विमान

इजिप्तएर (अरबी: مصر للطيران) ही इजिप्त देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे.[] १९३३ साली स्थापन झालेली इजिप्तएर मध्य पूर्व, आफ्रिका, युरोप इत्यादी खंडांमधील ७५ शहरांना विमानसेवा पुरवते. इजिप्तएर ११ जुलै २००८ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे.

इजिप्त एर ही इजिप्त देशाची ध्वजवाहक विमानवाहतूक कंपनी आहे.[] कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या कंपनीचेचे मुख्य केंद्र आहे. इजिप्तएर मध्य पूर्व, युरोप, आफ्रिका, एशिया आणि अमेरिकेतील ७५ पेक्षा अधिक ठिकाणी प्रवाशांना विमान सेवा देते.[]

इतिहास

[संपादन]

सन १९३१ मध्ये आंतरराष्ट्रीय विमान व्यवसायाचे अध्यक्ष ॲलन मुन्थ्झ यांनी इजिप्तला भेट दिली. तेव्हा त्यांनी इजिप्त मध्ये विमान सेवा चालू करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांनी त्याला मिश्र एरवर्क नाव दिले. इजिप्त इजिप्सीयनासाठी असे मिश्रचे संबोधन केले. विमान सेवेचे कार्यक्रमाला तत्कालीन सरकारने ३१ डिसेंबर १९३१ रोजी हिरवा कंदील दाखविला. मिश्र एरवर्कच्या एका विभागाला मिश्र एर लाइन नाव दिले आणि तो विभाग दी.७-६-१९३२ रोजी सुरू केला. इजिप्शियन तरुणात याचे महत्त्व वाढवून स्पर्धात्मक जीवनात क्रांति घडविणे हे या उध्योंगाचे धेय होते आणि ती जगातील ७ क्रमांकाची एरसेवा होती.[] एरवर्कचे मिश्र मुख्य कार्यालय S.A.E. हे अलमाझा एरोड्रम, हेलिओपोलीस, कैरो मध्ये होते. यातील भागभांडवल EG पाउंड २०००० होते त्यात ८५% मिश्र बँक,१०% एर वर्क,आणि ५% इजिप्सीयन जनता असा सहभाग होता. प्रत्यक्षात यांचे कामकाज जुलै १९३३ मध्ये चालू झाले. दे हेविलंड DH.84 या विमानाचा उपयोग करून कैरो शहर आलेक्सांद्रिय आणि मेरसा मात्रूह यांच्याशी जोडले. त्याच वर्षी ऑगस्ट मध्ये ही सेवा दिवसातून दोन वेळा चालू केली. पुढील काळात खालील सेवा सुरू झाल्या.[]

सन प्रस्थान आगमन सेरा
१९३३ (चे सेवटी) कैरो आसवण फोर्ट सेड मार्गे त्यात ल्यद्दा, हाइफा, पालेस्तिन या सेवेचा १९३४ मध्ये समावेश झाला.
३-८-१९३५ कैरो साईप्रस ल्यद्दा मार्गे (D.H.86 विमान वापरून, ऑक्टोबर १९३५ मध्ये बंद)
१९३५ आलेक्झांद्रिय - फोर्ट सेड - कैरो, - मिनिय, - अस्सिउत

१९३५ या वर्षात या विमान कंपनीने ६९९० प्रवाशी वाहातूक केली, २१८३० किलोग्राम मालवाहातूक केली आणि ४१९४६७ मैल (६७५०६७ की.मी) प्रवास केला.[]

कंपनी कामकाज

[संपादन]

इजिप्त एर ही इजिप्त देशाचे १००% भाग भांडवल असणारी इजिप्त देशाचे मालकीची आहे. या विमान कंपनीने सन २००२ मध्ये ७ कंपनी निर्माण केल्या. त्यानंतर त्यात आनखी दोन कंपनीची भर पडली. तेथे ऐओसी(AOC)चे व्यवस्थापनात तीन विमाने सेवा देत होती आणि त्यांचे उत्पन्न खर्च (हिशोब) स्वतंत्र ठेवले जात होते. ती म्हणजे

  • इजिप्त एर लाइन्स अति महत्त्वाची विमान कंपनी
  • इजिप्त देशाचे कार्गो, समर्पित कार्गो एर लाइन (२००२ मध्ये स्थापना)
  • इजिप्त एर एक्सप्रेस आंतरदेशीय आणि प्रादेशिक एर लाइन (२००७ मध्ये प्रारंभ)

इजिप्त एयर होल्डिंग कंपनीच्या इतर कंपनी खालील प्रमाणे आहेत

[संपादन]
  • इजिप्त एर मेंटेनन्स आणि इंजीनीरिंग, मुळातील अंतरदेशीय सेवा पण अलीकडे थर्ड पार्टी व्यवसाय आहे. यांचेकडे EASA पार्ट१४५ आणि FAA सर्टिफिकेट आहे.[]
  • इजिप्त एर ग्राऊंड सेवा, इजिप्त कडे येनाऱ्या ७५% विमानांना सेवा दिली जाते.
  • इजिप्त एर विमान सेवा
  • इजिप्त एर पर्यटक आणि कर विरहित शॉपिंग
  • इजिप्त एर स्वास्थ्य सेवा
  • इजिप्त एर औध्योगिक पूरक कंपनी

सहायक आणि संघटन

[संपादन]

इजिप्त एरचे खालील कंपनीत भाग भांडवल आहे.

  • एर कार्गो (६०%)(६६),
  • स्मार्ट एविएशन कंपनी.(१३.३३%)
  • एर सिनई
  • इजिप्त एरो व्यवस्थापन सेवा
  • LSG स्काय चेफ्स कटरिंग इजिप्त
  • CIAF – लिजिंग(२०%)

मुख्य कार्यालय

[संपादन]

इजिप्त एरचे मुख्य कार्यालय कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर आहे.[]

बोध चिन्ह

[संपादन]

इजिप्त एरचे बोध चिन्ह होरूस आहे. (इजिप्सीयनांची BC २४००-२३०० कालावधीतील देवता) इजिप्तचे पौराणिक परंपरेप्रमाणे त्यांनी आकाश देवता मानलेली आहे. तीला त्यानी विंगड गॉड ऑफ द सन म्हणले आहे, साधारणपणे बहिरी ससाणा आकाशात भरारी घेतानाचे त्याचे विहंगम दृश्य नजरेसमोर ठेवून तसे चित्र निर्मिले आहे आणि ते हे बोध चिन्ह घेतले आहे.

निर्गमन स्थानक

[संपादन]

जून २०१३ पर्यंत इजिप्त एर लाइन ८१ ठिकाणी विमान सेवा देत होती त्यात १२ इजिप्त,१९ आफ्रिका,२० मध्य पुर्व, ७ एशिया, २१ युरोप आणि २ अमेरिका सेवेचा समावेश होता.[]

संघटन

[संपादन]

११ जुलै २००८ रोजी कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या कार्यक्रमात २१ विमान कंपनीचे ९ महिन्यांच्या अथक प्रयत्नाने संघटन झाले.[१०]

कायदेशीर भागीदारी करार

[संपादन]

एप्रिल २०१५ पर्यंत खालील विमान कंपनीशी व्यवसाय भागीदारी करार झालेले आहेत.

  • एगेयन एर लाइन
  • एर कॅनडा
  • एर चायना
  • एर इंडिया
  • औस्ट्रियन एर लाइन
  • ब्रुसेल्स एर लाइन्स
  • एथिओपियन एर लाइन्स
  • गल्फ एर
  • लुफतान्सा
  • मलेशिया एर लाइन्स
  • स्कंडींनावियन एर लाइन
  • सिंगापुर एर लाइन
  • साऊथ आफ्रिकन एर वेज
  • स्विस इंटरनॅशनल एर लाइन्स
  • टाप (TAP) पोर्तुगाल
  • थाय एर वेज इंटरनॅशनल
  • तुंनिसाइर
  • टर्किश एर लाइन्स
  • यूनायटेड एर लाइन्स

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. ^ "इजिप्त एयर - कंपनी प्रोफाइल आणि इतिहास".
  2. ^ "इजिप्त एयरने नुकसान भरपाईसाठी पुनर्रचना योजना आखली आहे". रोजी मूळ पानापासून संग्रहित2014-06-24. 2016-10-19 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  3. ^ "इजिप्त एयर - एयरलाईनची माहिती".
  4. ^ "इजिप्तएयर - हवाई प्रवासचे प्रणेते". रोजी मूळ पानापासून संग्रहित2014-02-02. 2016-10-19 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  5. ^ "इजिप्त एयरचे उड्डाण वेळापत्रक". 2016-08-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-18 रोजी पाहिले.
  6. ^ "व्यावसायिक हवाई वाहतूक". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-19 रोजी पाहिले.
  7. ^ "इजिप्तएयर - वार्षिक अहवाल २०१०-२०११". रोजी मूळ पानापासून संग्रहित2013-10-30. 2016-10-19 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  8. ^ "इजिप्त एयर - हवाई प्रवासचे प्रणेते". रोजी मूळ पानापासून संग्रहित2014-02-02. 2016-10-18 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  9. ^ "इजिप्त एयर ने सहा 737-800 प्रकारची विमान विकत घेतले, सहा अधिक पर्याय उपलब्ध". रोजी मूळ पानापासून संग्रहित2014-01-16. 2016-10-18 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  10. ^ "इजिप्त एयर-स्टारअलायन्स सदस्य".