Jump to content

इजिप्तएर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इजिप्तएर
आय.ए.टी.ए.
MS
आय.सी.ए.ओ.
MSR
कॉलसाईन
EGYPTAIR
स्थापना ७ जून १९३२ (मिस्र एरलाइन्स ह्या नावाने)
हब कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे अलेक्झांड्रिया, लुक्सोर, हुर्गादा, शर्म अल-शेख
फ्रिक्वेंट फ्लायर माइल्स अँड स्माईल
अलायन्स स्टार अलायन्स
विमान संख्या ८०
ब्रीदवाक्य Enjoy the Sky
मुख्यालय कैरो, इजिप्त
संकेतस्थळ http://www.egyptair.com/
इस्तंबूल अतातुर्क विमानतळावर थांबलेले इजिप्तएरचे बोईंग ७३७ विमान

इजिप्तएर (अरबी: مصر للطيران) ही इजिप्त देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे.[१] १९३३ साली स्थापन झालेली इजिप्तएर मध्य पूर्व, आफ्रिका, युरोप इत्यादी खंडांमधील ७५ शहरांना विमानसेवा पुरवते. इजिप्तएर ११ जुलै २००८ पासून स्टार अलायन्सची सदस्य आहे.

इजिप्त एर ही इजिप्त देशाची ध्वजवाहक विमानवाहतूक कंपनी आहे.[२] या कंपनीचे मुख्यालय कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे. इजिप्तएर मध्य पूर्व, युरोप, आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील ७५ पेक्षा अधिक ठिकाणी प्रवाशांना विमान सेवा देते.[३]

इतिहास

[संपादन]

सुरुवातीची वर्षे: मिस्र एरवर्क (१९३२–१९४९)

[संपादन]

एरवर्कचे अध्यक्ष ॲलन मंट्झ १९३१मध्ये इजिप्तला गेलेले असताना त्यांनी मिस्र एरवर्क (अरबी भाषेत 'मिस्र' (مصر) नावाने विमानकंपनी सुरू करण्याची खटपट सुरू केली. ३१ डिसेंबर १९३१ रोजी सरकारने या मिस्र एरवर्कला हवाई वाहतूक सुरू करण्यासाठी विशेष अधिकार प्रदान केले.[४] ७ जून १९३२ रोजी इजिप्शियन तरुणांमध्ये विमान वाहतुकीची आवड निर्माण करण्यासाठी मिस्र एरवर्कचा मिस्र एरलाइन्स नावाचा एक विभाग स्थापन करण्यात आला.[४] मिस्र एरलाइन्स त्या काळाची जगातील सातवी विमान वाहतूक कंपनी होती.[५] मिस्र एरवर्कचे मुख्यालय कैरोमधील हॅलिओपोलिस येथील अलमाझा विमानतळ (Almaza Aerodrome) येथे होते.[६]

या कंपनीच्या सुरुवातीच्या २०,००० इजिप्शियन पाउंड इतक्या भांडवलाचा ८५% हिस्सा बँक मिस्रकडे, १०% हिस्सा एरवर्क सर्व्हिसेस कडे आणि उरलेला ५% हिस्सा इजिप्शियन खाजगी गुंतवणूकदारांमध्ये वाटलेला होता. कंपनीचे कामकाज जुलै १९३३ मध्ये सुरू झाले. कंपनीच्या पहिल्या सेवा कैरो ते अलेक्झांड्रिया आणि मर्सा मात्रुह दरम्यान होत्या. या साठी डी हॅविलँड डी.एच.८४ ड्रॅगन विमानांचा वापर केला जात असे. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये कैरो-अलेक्झांड्रिया विमान सेवा दिवसातून दोनदा करण्यात आली.[४] १९३३ च्या उत्तरार्धात कैरो-आस्वान दरम्यान आठवड्यातून दोनदा विमान सेवा सुरू झाली. ही अश्युत आणि लुक्सोर येथे थांबत असे.[४] १९३४ मध्ये कैरो पासून पोर्ट सैद मार्गे लिडा, हैफा आणि गाझा पर्यंत नवीन मार्ग सुरू झाले. ३ ऑगस्ट १९३५ रोजी, डी हॅविलँड डी.एच.८६ विमानांसह सायप्रसमधील निकोसियापर्यंत एक प्रायोगिक सेवा सुरू करण्यात आली; ही त्याच वर्षी २० ऑक्टोबर पर्यंत टिकली.[४] अलेक्झांड्रिया-पोर्ट सैद-कैरो-मिनिया-अश्युत हा मार्ग १९३५ च्या उत्तरार्धात सुरू झाला.[७]

१९३५ मध्ये या विमान कंपनीने ६,९९० प्रवासी आणि २१,८३० किग्रॅ मालाची वाहतूक केली; त्या वर्षात कंपनीच्या या नियमित विमान सेवांनी एकूण ४,१९,४६७ मैल प्रवास केला होता.[८]


सप्टेंबर १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर इजिप्शियन सरकारने कंपनीचे सर्व मार्ग आपल्या ताब्यात घेतले. १९४० मध्ये बैरुत आणि पॅलेस्टाईन पर्यंत विमान सेवा सुरू करण्यात आली. १९४४ मध्ये तीन अॅव्हरो १९ विमानांचा ताफ्यात समावेश करण्यात आला. १९४५ च्या उत्तरार्धात झालेल्या तीन अपघातांमुळे ताफ्याचे नूतनीकरण करण्यासाठी संप पुकारण्यात आला आणि यामुळे फेब्रुवारी १९४६ पासून कामकाज पूर्णपणे ठप्प झाले;[४] मे महिन्यात सेवा पुन्हा सुरू झाली आणि १९४६ च्या अखेरीस ताफ्यात चार अॅव्हरो अॅनसन, एक बीच एटी-११, पाच बीच सी-४५, चार डी हॅविलँड डी.एच.८९ ड्रॅगन रॅपिड आणि दोन नॉर्थ अमेरिकन एटी-६ टेक्सन विमानांचा समावेश होता.[९] दोस्त राष्ट्रांचे प्रादेशिक विमान विल्हेवाट केंद्र इजिप्तमध्येच असल्याने या कंपनीला उरलेल्या लष्करी विमानांच्या खरेदीत मोठा फायदा झाला. १९४७ मध्ये आणखी दोन बीच सी-४५ विमाने घेतली आणि १९४८ मध्ये व्हिकर्स व्हायकिंग विमानांचा समावेश करण्यात आला. मे १९४९ मध्ये कंपनीचे सर्व भांडवल आणि विमाने सरकारने ताब्यात घेतली.[१०] इजिप्शियन सरकार एकमेव भागधारक बनल्यानंतर कंपनीने आपले नाव बदलून मिस्रएर एसएई असे केले.

मिस्रएर (१९४९–१९५७)

[संपादन]

मिस्रएरने आपल्या पूर्ववर्ती कंपनीच्या सगळ्या मार्गांवर विमान सेवा सुरू ठेवली.[११] १९५१ मध्ये लांब पल्ल्याच्या मार्गांवर वापरण्यासाठी तीन एसएनकेएएसई लँग्युडोक विमाने खरेदी करण्यात आली.[१२] या विमानांनी जिनिव्हा, खार्तूम आणि तेहरानला जाणाऱ्या उड्डाणांमध्ये विकर्स व्हायकिंग विमानांची जागा घेतली.[११]

१ डिसेंबर १९५२ रोजी, मिस्रएरने आपली देशांतर्गत स्पर्धक कंपनी सर्व्हिसेस एरिअन्स इंटरनॅशनल डी'इजिप्त ही कंपनी विकत घेतली आणि त्याचे कामकाज बंद केले. त्या कंपनीचा फायद्यात असलेला कैरो-ट्युनिस हा मार्ग मिस्रएरने स्वतःच्या मार्गजाळ्यात समाविष्ट करून घेतला.[१३]

१९५४ च्या सुरुवातीला मिस्रएरने तीन व्हिकर्स व्हायकाउंट विमाने खरेदी केली.[१४] त्या वर्षात या कंपनीने ६४,५३९ प्रवाशांची वाहतूक केली. मार्च १९५५ पर्यंत मिस्रएरच्या ताफ्यात एक बीचक्राफ्ट, तीन लँग्युडोक आणि सात व्हायकिंग विमाने होती.[१५] त्यानंतर डग्लस डीसी-३ विमाने खरेदी करून ती देशांतर्गत मार्गांवर आणि शेजारील अरब देशांमध्ये तैनात करण्यात आली. पहिल्या दोन व्हायकाउंट विमानां डिसेंबर १९५५ मध्ये मिळाली आणि मार्च १९५६ मध्ये प्रत्यक्ष सेवेत दाखल झाली.[११] आठ महिन्यांनंतर १ नोव्हेंबर १९५६ रोजी सुएझ संकटादरम्यान रॉयल एर फोर्सने केलेल्या हवाई हल्ल्यात अलमाझा विमानतळावर उभे असलेले एक व्हायकाउंट विमान (नोंदणी क्र. एसयू-एआयसी) पूर्णपणे नष्ट झाले.[१६][१७] १९५५ मध्ये वाहतूक केलेल्या प्रवाशांची संख्या ७७,०५० पर्यंत वाढली होती.[१८] फेब्रुवारी १९५७ मध्ये, मिस्रएरचे नाव बदलून युनायटेड अरब एरलाइन्स असे करण्यात आले.[११] त्या वर्षाच्या शेवटी ६,००,००० ते ८,००,००० पाउंड खर्चाने करून आणखी दोन व्हायकाउंट विमाने आणि सुटे भाग खरेदी करण्यात आले.

युनायटेड अरब एरलाइन्स (१९५७–१९७१)

[संपादन]

१ फेब्रुवारी १९५८ रोजी इजिप्त आणि सिरियाने मिळून युनायटेड अरब रिपब्लिकची स्थापना केल्यानंतर त्याच वर्षी मार्च महिन्यात मिस्रएरचे नाव बदलून युनायटेड अरब एरलाइन्स असे करण्यात आले.[१३] ७ जुलै रोजी कैरो–ॲथेन्स–रोम–झुरिच विमान सेवा सुरू झाली. २३ डिसेंबर रोजी सिरियन एरवेझचे युनायटेड अरब एरलाइन्समध्ये विलीनीकरण झाले. सिरियन कंपनीचे सर्व मार्ग व उपकरणे यूएएने सामावून घेतली.[१३] मार्च १९६० पर्यंत या कंपनीत ५७९ कर्मचारी कार्यरत होते. त्यावेळी ताफ्यात एक बीच मॉडेल १८, चार डीसी-३, सहा व्हिकर्स व्हायकिंग आणि सहा व्हिकर्स व्हायकाउंट विमानांचा समावेश होता.[१९] १० एप्रिल रोजी एका विस्काउंट विमानाला भूमध्य समुद्रात अपघात झाला, ज्यात १७ प्रवासी आणि ३ कर्मचारी मारले गेले.[१३] ९ जून रोजी पहिले डी हॅविलँड कॉमेट ४सी विमान ताफ्यात दाखल झाले.[२०] याच वर्षाच्या १६ जुलैपासून या प्रकारच्या दोन विमानांद्वारे सेवा सुरू झाली. ऑक्टोबर १९६० पर्यंत या कंपनीने कॉमेट विमानांचा वापर कैरो–बेलग्रेड–प्राग, कैरो–रोम–लंडन, कैरो–जेद्दा आणि कैरो–खार्तूम या मार्गांवर सुरू केला होता.[२०] तर डीसी-३ विमाने कैरो–अलेक्झांड्रिया–मर्सा मात्रुह, कैरो–अश्युत–लुक्सोर, कैरो–लुक्सोर–आस्वान आणि कैरो–पोर्ट सईद–अलेक्झांड्रिया मार्गांवर वापरली जात होती. तसेच कैरो आणि अलेक्झांड्रिया दरम्यानच्या थेट विमान प्रवासासाठी व्हायकाउंट विमानांचा वापर होत असे. नोव्हेंबर १९६० मध्ये आणखी दोन कॉमेट विमानांची मागणी नोंदवण्यात आली.[२१] ऑक्टोबर १९६१ मध्ये सीरियाने यूएएमधून अंग काढून घेतले आणि सिरियाच्या सरकारने दमास्कसमध्ये सिरियन अरब एरवेझची स्थापना केली; त्यानंतर पूर्वी ताब्यात घेतलेले मार्ग आणि विमाने नवीन कंपनीला परत करण्यात आली.[२२]

१९६८ मध्ये जिनिव्हा विमानतळावरून उड्डाण करणारे युनायटेड अरब एरलाइन्सचे कॉमेट ४सी विमान.

१९६१ च्या सुरुवातीला अजून दोन कॉमेट विमाने मागवण्यात आली. एप्रिल १९६१ मध्ये स्कँडिनेव्हियन एरलाइन्सकडून तीन डग्लस डीसी-६ विमाने खरेदी करण्यात आली. १२ जून रोजी कैरो–लागोस मार्गाचा विस्तार आक्रापर्यंत करण्यात आला आणि २१ जूनपासून मॉस्कोला सेवा सुरू झाली. बोईंग कंपनीकडून बोईंग ७०७-३२०बी खरेदी करण्याचा करार झाला होता, परंतु कंपनीला अर्थसाह्य न मिळाल्याने हा व्यवहार फसला.[२३] १ नोव्हेंबर रोजी कराची आणि मुंबईसाठी नवीन विमान सेवा सुरू झाली. डिसेंबरमध्ये सहाव्या आणि सातव्या कॉमेट विमानांची मागणी नोंदवण्यात आली, जी एप्रिल १९६२ मध्ये ताफ्यात दाखल झाली.[२४] तसेच १९६१ मध्ये कैरो–निकोसिया मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला, जो १९५६ च्या सुएझ संकटापासून बंद होता. मे १९६२ मध्ये मुंबई सेवेचा विस्तार बँकॉक आणि हाँग काँग मार्गे तोक्योपर्यंत करण्यात आला.[२५]

१६ मे १९६२ रोजी हेलिओपोलिस येथे झालेल्या डीसी-३ विमान अपघातात ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर १९ जुलै रोजी बँकॉक येथे झालेल्या कॉमेट विमान अपघातात २६ जणांचा बळी गेला. ऑगस्ट १९६२ मध्ये आणखी दोन कॉमेट विमाने घेण्यात आली. १५ फेब्रुवारी १९६३ रोजी बगदादचा विमान मार्ग तीन वर्षांनंतर पुन्हा सुरू झाला, परंतु इजिप्त, इराक आणि सिरियामधील राजकीय तणावामुळे तो फार काळ टिकला नाही. १ एप्रिल १९६३ रोजी ऱ्होडेशियाला नवीन सेवा सुरू झाली. १२ मे १९६३ रोजी अलेक्झांड्रिया जवळ झालेल्या डीसी-३ अपघातात २७ प्रवासी आणि ४ कर्मचारी मारले गेले. २८ जुलै १९६३ रोजी मुंबईजवळ समुद्रात एक कॉमेट विमान कोसळून ६२ जणांचा मृत्यू झाला. तोक्योसाठी पुरेशी विमाने नसल्यामुळे तो मार्ग बंद करण्यात आला. १९६४ मध्ये नऊ कॉमेट विमानांचा ताफा पूर्ण झाला. त्याच वर्षी पॅन ॲम आणि नॉर्थवेस्ट ओरिएंटकडून प्रत्येकी तीन डग्लस डीसी-६बी विमाने खरेदी करण्यात आली, ज्यांनी देशांतर्गत मार्गावर विस्काउंट विमानांची जागा घेतली. देशांतर्गत सेवेसाठी २३ लाख डॉलर्स खर्च करून सात अँतोनोव्ह एन-२४ विमाने मागवण्यात आली.[२४]

१९७१ मध्ये पॅरिसमधील विमानतळावर उभे असलेले युनायटेड अरब एरलाइन्सचे इल्यूशिन इल-६२ विमान.

१४ जानेवारी १९७० रोजी कैरोहून अदिस अबाबाला जाणारे एक कॉमेट ४सी विमान उतरताना कोसळले. सुदैवाने विमानातील १४ प्रवाशांपैकी कोणीही गंभीर जखमी झाले नाही. ३० जानेवारी १९७० रोजी लुक्सोर येथे एका अँटोनोव्ह एन-२४ विमानाची चाके आणि प्रणाली निकामी झाली. १९ फेब्रुवारी रोजी म्युन्शेन येथे एका विमानाला उड्डाण करताना अपघात झाला. मार्च १९७० पर्यंत युनायटेड अरब एरलाइन्समध्ये ७,८१० कर्मचारी होते; ताफ्यात सात अँतोनोव्ह एन-२४बी, तीन बोईंग ७०७-३६६सी, सहा कॉमेट ४सी आणि तीन आयएल-१८ विमाने होती.[२६] २ जानेवारी १९७१ रोजी त्रिपोली येथे झालेल्या कॉमेट विमान अपघातात ८ प्रवासी आणि ८ कर्मचारी मारले गेले.[२७] २३ मे १९७१ रोजी दोन इल्यूशिन इल-६२ विमाने खरेदी करण्याची घोषणा झाली. जून १९७१ पासून ही विमाने युरोपीय मार्गांवर आणि ९ जुलैपासून आशियाई मार्गांवर वापरली जाऊ लागली.

१० ऑक्टोबर १९७१ रोजी देशाचे नाव बदलून अरब रिपब्लिक ऑफ इजिप्त झाल्यामुळे विमान कंपनीचे नावही बदलून इजिप्तएर असे करण्यात आले.[२८]

मालकी आणि रचना

[संपादन]

इजिप्तएर ही पूर्णपणे इजिप्त सरकारच्या मालकीची कंपनी आहे.[२९] २००२ मध्ये सात उपकंपन्यांसह इजिप्तएर होल्डिंग कंपनीची स्थापना करण्यात आली. यात नंतर आणखी दोन कंपन्यांची भर पडली.[३०]

इजिप्त एरचे मुख्य कार्यालय कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर आहे.[३१]

या अंतर्गत तीन विमान वाहतूक कंपन्या कार्यरत आहेत, ज्या एकाच हवाई संचलन प्रमाणपत्राखाली काम करतात, परंतु त्यांचे व्यवस्थापन आणि नफा-तोटा खाती स्वतंत्र आहेत:

  • इजिप्तएर एरलाइन्स (मुख्य विमान कंपनी)
  • इजिप्तएर कार्गो (मालवाहू सेवा)
  • इजिप्तएर एक्सप्रेस (प्रादेशिक सेवा)
  • इजिप्तएर मेंटेनन्स अँड इंजिनिअरिंग (देखभाल आणि अभियांत्रिकी)[३२]
  • इजिप्तएर ग्राउंड सर्व्हिसेस (जमिनीवरील सेवा)
  • इजिप्तएर इन-फ्लॉईट सर्व्हिसेस (विमानांतर्गत खानपान सेवा)
  • इजिप्तएर टुरिझम अँड ड्युटी फ्री शॉप्स (पर्यटन आणि करमुक्त दुकाने)
  • इजिप्तएर मेडिकल सर्व्हिसेस (वैद्यकीय सेवा)
  • इजिप्तएर सप्लिमेंटरी इंडस्ट्रिज (पूरक उद्योग)

उपकंपन्या

[संपादन]
  • एर कैरो (६०%)[३३]
  • स्मार्ट एव्हिएशन कंपनी (१३.३३%)
  • एर साइनाई (१००%)[३३]
  • इजिप्त एरो मॅनेजमेंट सर्व्हिस (५०%)
  • एलएसजी स्काय शेफ्स कॅटरिंग इजिप्त (७०%)[३४]
  • सीआयएएफ-लीझिंग (२०%)[३५]

बोधचिन्ह

[संपादन]

या विमान कंपनीचे बोधचिन्ह होरस हे आहे. प्राचीन इजिप्शियन पुराणकथेनुसार होरस "पंख असलेला सूर्यदेव" हा एक आकाश देव आहे. होरस सहसा ससाणा किंवा ससाण्याचे डोके असलेला माणूस अशा रूपात दर्शविला जातो.

या बोधचिह्नाचा प्रथम वापर १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस करण्यात आला. मूळ रूपात हे बोधचिन्ह सोनेरी पार्श्वभूमीवर लाल डोके आणि निळ्या पंखांसह रेखाटलेले होते.[३६] विमानांच्या इंजिनसह इतर भागांवरही हे चिन्ह रंगवले जात असे. इजिप्तएरला आपल्या सुरुवातीच्या काळात विमानांवर उष्ण रंगांची छटा राखायची असल्याने अशा रंगांची निवड करण्यात आली होती.[३६]

गंतव्यस्थाने

[संपादन]

ऑगस्ट २०२२ पर्यंत, इजिप्तएर ५६ देशांमधील ८१ गंतव्यस्थानांवर आपली सेवा पुरवते.[३७] Egyptair is a member of Star Alliance.[३८]

विमान संघटना

[संपादन]
स्टार अलायन्सच्या विशेष रंगात असलेले इजिप्तएरचे बोईंग ७३७-८०० विमान.

ऑक्टोबर २००७ मध्ये स्टार अलायन्सच्या मुख्य कार्यकारी मंडळाने इजिप्तएरला आपल्या संघटनात स्वीकारले. या संघटनेत सामील होणारी ही पहिली अरब देशातील आणि साउथ आफ्रिकन एरवेझनंतर दुसरी आफ्रिकन विमान कंपनी आहे.[३९][४०] कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११ जुलै २००८ रोजी झालेल्या एका सोहळ्यात, ही कंपनी या संघटनेची २१ वी सदस्य झाली.[४१][४२]

ऑक्टोबर २०२० मध्ये इजिप्तएरने घाना आणि इजिप्त सरकार बरोबर गुंतवणुक करु घानामध्ये एक राष्ट्रीय विमान कंपनी स्थापन करण्यासाठी करार केला.[४३]

कोडशेर करार[४४][४५]

[संपादन]

इंटरलाईन करार

[संपादन]

याव्यतिरिक्त, तांत्रिक सहाय्य, प्रशिक्षण आणि मार्ग विस्तारासाठी कंपनीची सेबा इंटरकॉन्टिनेंटल सोबत भागीदारी आहे.

कतार मार्गांचे तात्पुरते निलंबन

[संपादन]

२०१७ मधील कतार राजनैतिक संकटामुळे, इजिप्शियन सरकारच्या सूचनेनुसार इजिप्तएरने कतारमधील दोहा येथील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आपली उड्डाणे स्थगित केली होती.[५३]

२०२१ मध्ये इजिप्तने कतारसोबत अल-उला करार केल्यानंतर इजिप्तएरने साडेतीन वर्षांचा बहिष्कार संपवून दोहाला पुन्हा विमान सेवा सुरू केली.[५४][५५]

विमानताफा

[संपादन]

जुलै २०२५ च्या सुमारास इजिप्तएरकडे खालील विमाने होती:[५६]

इजिप्तएर विमान ताफा
विमान सेवेत मागण्या प्रवासी क्षमता[५७] नोंदी
व्यावसायिक इकॉनॉमी एकूण
एरबस ए३२० निओ ८ — १६ १२६ १४२
एरबस ए३२१ निओ ७ — १६ १६६ १८२
एरबस ए३३०-२०० ५ — २४ २४४ २६८ २ विमानांचे मालवाहू विमानात रूपांतर केले जाणार.[५८]
एरबस ए३३०-३०० ४ — ३६ २६५ ३०१
एरबस ए३५०-९०० २ १४[५९] ३० ३१० ३४०
बोईंग ७३७-८०० ३० — २४ १२० १४४
१६ १३८ १५४
बोईंग ७३७ मॅक्स ८ — १८[६०] —
बोईंग ७७७-३०० ईआर ५ — ४९ २९७ ३४६
बोईंग ७८७-९ ८ — ३० २७९ ३०९
एकूण ६८ ३२

छायाचित्र दालन

[संपादन]

ताफ्याचा विस्तार आणि विकास

[संपादन]

जून १९९५ मध्ये, इजिप्तएरने तीन एरबस ए३४० विमानांची मागणी नोंदवली.[६१] यातील पहिले २६० आसनी विमान १९९६ च्या उत्तरार्धात ताफ्यात दाखल झाले. तसेच १९९५ मध्ये कंपनीने ४० कोटी डॉलर्स खर्च करून तीन ३०८ आसनी बोईंग ७७७-२०० विमाने खरेदी केली.[६२] ही विमाने एरबस ए३०० आणि बोईंग ७६७-२०० विमानांची जागा घेण्यासाठी घेण्यात आली होती.[६३]

एरबस ए३००-६०० आर ताफ्याऐवजी नवीन विमाने आणण्यासाठी, कंपनीने २००३ मध्ये सात एरबस ए३३०-२०० विमानांची मागणी नोंदवली.[६४] या विमानांच्या इंजिनसाठी रोल्स-रॉइस कंपनीशी १५ कोटी डॉलर्सचा करार करण्यात आला होता.[६५] ऑगस्ट २०१० मध्ये पहिले एरबस ए३३०-३०० विमान ताफ्यात समाविष्ट करण्यात आले.[६६]

इजिप्तएरचे बोईंग कंपनीसोबतचे व्यावसायिक संबंध १९६८ मध्ये बोईंग ७०७ विमानापासून सुरू झाले.[६७] मार्च २०१० मध्ये कंपनीने आपले पहिले ३४६ आसनी बोईंग ७७७-३०० ईआर विमान भाडेतत्त्वावर घेतले.[६८]

२०१६ मध्ये इजिप्तएरने ८६ कोटी डॉलर्सच्या कराराद्वारे आणखी नऊ बोईंग ७३७-८०० विमानांची मागणी नोंदवली.[६९] २०१९ च्या दुबई एरशोमध्ये १५ एरबस विमानांच्या मागणीत बदल करून सात ए३२१ निओ आणि आठ ए३२० निओ विमाने निश्चित करण्यात आली. फेब्रुवारी २०२६ मध्ये कंपनीने आपले पहिले ३४० आसनी एरबस ए३५०-९०० विमान प्राप्त केले.[७०]

ऐतिहासिक ताफा

[संपादन]
१९९९ मध्ये फ्रँकफर्ट विमानतळावर असलेले इजिप्तएरचे बोईंग ७६७-३०० ईआर विमान.
इजिप्तएरचा ऐतिहासिक ताफा
विमान सुरू झाले निवृत्त झाले नोंदी
एरबस ए२२०-३०० २०१९ २०२४[७१]
एरबस ए३०० बी४ १९७७ १९९८
एरबस ए३००-६०० १९८८ २००९
एरबस ए३२१-२०० १९९७ २०१८
एरबस ए३४०-२०० १९९६ २०१५
एरबस ए३४०-३०० १९९५ १९९७
एटीआर ४२-५०० २००३ २००३
बोईंग ७३७-५०० १९९७ २०१५
बोईंग ७४७-१०० १९८३ १९८४
बोईंग ७४७-२०० १९८४ १९८९
बोईंग ७४७-३०० १९८८ २००५
बोईंग ७६७-२०० ईआर १९८४ १९९७
बोईंग ७६७-३०० ईआर १९८९ २००१
बोईंग ७७७-२०० ईआर १९९७ २०१८[७२]
डग्लस डीसी-८-२० १९७८ १९७९
डग्लस डीसी-८-३० १९७८ १९७९
डग्लस डीसी-८-६२ १९८५ १९८९
इल्यूशिन इल-६२ १९७१ —
लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार १९८९ १९९०
मॅकडोनेल डग्लस डीसी-९-३० १९७१ १९७३
तुपोलेव्ह तू-१५४ १९७३ १९७४

अपघात आणि दुर्घटना

[संपादन]
  • २२ डिसेंबर १९५१ रोजी, मिस्रएरचे एसएनसीएएसई लँग्युडोक (नोंदणी: SU-AHH) इराणमधील तेहरानच्या पश्चिमेला कोसळले. या अपघातात विमानातील सर्व २० लोकांचा मृत्यू झाला. हे विमान बगदाद, इराक येथून तेहरानला जाणारे आंतरराष्ट्रीय अनुसूचित प्रवासी उड्डाण होते.[७३][७४]
  • ३० जुलै १९५२ रोजी, मिस्रएरचे एसएनसीएएसई लँग्युडोक (नोंदणी: SU-AHX) कैरो येथील अल्माझा हवाई तळावर लँडिंग करताना चाके न उघडल्यामुळे (wheels-up landing) मोठ्या प्रमाणात खराब झाले. हे विमान सुदानमधील खार्तूमला जात होते, परंतु इंजिन क्रमांक १ मध्ये आग लागल्याने ते कैरोला परतले होते.[७५]
  • १५ डिसेंबर १९५३ रोजी, मिस्रएरचे व्हिकर्स व्हायकिंग (नोंदणी: SU-AFK) कैरो येथील अल्माझा विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले. यामध्ये विमानातील सहाही जणांचा (५ कर्मचारी, १ प्रवासी) मृत्यू झाला.[७६]
  • १ नोव्हेंबर १९५६ रोजी, सुएझ संकटादरम्यान रॉयल एर फोर्सने (RAF) केलेल्या हवाई हल्ल्यात अल्माझा विमानतळावर उभे असलेले मिस्रएरचे व्हिकर्स व्हायकाउंट (नोंदणी: SU-AIC) नष्ट झाले.[१६][७७]
  • २९ सप्टेंबर १९६० रोजी, युनायटेड अरब एरलाइन्स फ्लाइट ७३८ (व्हिकर्स व्हायकाउंट, नोंदणी: SU-AKW) इटलीतील एल्बा जवळ भूमध्य समुद्रात कोसळले. यामध्ये विमानातील २१ जणांचा मृत्यू झाला.[७८]
  • १९ जुलै १९६२ रोजी, युनायटेड अरब एरलाइन्स फ्लाइट ८६९ (डी हॅविलँड कॉमेट, नोंदणी: SU-AMW) थायलंडमधील खाओ याई डोंगरावर कोसळले (सीएफआयटी). यात १८ प्रवासी आणि ८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.[७९]
  • २८ जुलै १९६३ रोजी, युनायटेड अरब एरलाइन्स फ्लाइट ८६९ (डी हॅविलँड कॉमेट, नोंदणी: SU-ALD) भारतातील मुंबई विमानतळावर उतरत असताना समुद्रात कोसळले. विमानातील ६३ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.[८०]
  • १८ मार्च १९६६ रोजी, युनायटेड अरब एरलाइन्स फ्लाइट ७४९ (अँटोनोव्ह एएन-२४) कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना कोसळले. यात ३० जणांचा मृत्यू झाला.
  • २० मार्च १९६९ रोजी, युनायटेड अरब एरलाइन्सचे इल्यूशिन इल-१८ (नोंदणी: SU-APC) अस्वान विमानतळावर उतरताना कोसळले. विमानातील १०५ पैकी १०० जणांचा या आपत्तीत मृत्यू झाला.[८१]
  • १९ मार्च १९७२ रोजी, इजिप्तएर फ्लाइट ७६३ (डग्लस डीसी-९-३२, नोंदणी: YU-AHR) येमेनमधील एडन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना डोंगरावर कोसळले. विमानातील ३० जणांचा मृत्यू झाला.[८२]
  • २९ जानेवारी १९७३ रोजी, इजिप्तएर फ्लाइट ७४१ (इल्यूशिन इल-१८, नोंदणी: SU-AOV) निकोसिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना कोसळले. विमानातील ३७ जणांचा मृत्यू झाला.[८३]
  • १० जुलै १९७४ रोजी, इजिप्तएरचे तुपोलेव्ह तू-१५४ प्रशिक्षण फ्लाइट कैरो विमानतळाजवळ कोसळले. यात चार सोव्हिएत प्रशिक्षक आणि इजिप्तएरच्या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला.
  • २५ डिसेंबर १९७६ रोजी, इजिप्तएर फ्लाइट ८६४ (बोईंग ७०७, नोंदणी: SU-AXA) थायलंडमधील बँकॉक येथील एका औद्योगिक संकुलावर कोसळले. विमानातील ५२ जण आणि जमिनीवरील १९ जणांचा यात मृत्यू झाला.[८४]
  • १७ ऑक्टोबर १९८२ रोजी, इजिप्तएर फ्लाइट ७७१ (बोईंग ७०७, नोंदणी: SU-APE) स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा विमानतळावर उतरताना कोसळले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु विमान दुरुस्ती पलीकडे खराब झाले.
  • १० ऑक्टोबर १९८५ रोजी, अकिले लाउरो अपहरणास जबाबदार असलेल्या व्यक्तींना घेऊन जाणारे इजिप्तएरचे बोईंग ७३७ (फ्लाइट २८४३) अमेरिकन लढाऊ विमानांनी अडवले आणि इटलीतील सिगोनेला येथे उतरवण्यास भाग पाडले.[८५][८६][८६]
  • २३ नोव्हेंबर १९८५ रोजी, इजिप्तएर फ्लाइट ६४८ (बोईंग ७३७) चे अबू निदाल या दहशतवादी गटाच्या तीन जणांनी अपहरण करून ते माल्टा येथे नेले. विमानातील इजिप्शियन स्काय मार्शलने एका अपहरणकर्त्याला गोळ्या घातल्या, परंतु त्यानंतर तो स्वतःही मारला गेला. वाटाघाटी अपयशी ठरल्यानंतर इजिप्शियन सैन्याने विमानात प्रवेश केला. यावेळी झालेल्या चकमकीत ५९ प्रवासी आणि २ कर्मचारी ठार झाले.
  • २१ सप्टेंबर १९८७ रोजी, इजिप्तएरचे एरबस ए३०० (नोंदणी: SU-BCA) लक्सर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रशिक्षण फ्लाइट दरम्यान कोसळले. विमानातील पाचही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही एरबस ए३०० प्रकारच्या विमानाची पहिली प्राणघातक दुर्घटना होती.
  • ३१ ऑक्टोबर १९९९ रोजी, इजिप्तएर फ्लाइट ९९० (बोईंग ७६७, नोंदणी: SU-GAP) न्यू यॉर्कहून कैरोला जात असताना अटलांटिक महासागरात कोसळले. विमानातील सर्व २१७ प्रवासी ठार झाले. अमेरिकन अधिकाऱ्यांनी वैमानिक जमिल अल-बतौती याने मुद्दाम विमान कोसळवल्याचा संशय व्यक्त केला, परंतु इजिप्शियन अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला.[८७]
  • ७ मे २००२ रोजी, इजिप्तएर फ्लाइट ८४३ (बोईंग ७३७-५००) ट्युनिशियातील ट्युनिस येथे उतरत असताना मुसळधार पाऊस आणि धुळीच्या वादळामुळे कोसळले. विमानातील ६४ पैकी १५ जणांचा मृत्यू झाला.[८८]
  • २९ जुलै २०११ रोजी, इजिप्तएर फ्लाइट ६६७ (बोईंग ७७७-२०० ईआर) मध्ये कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळावर कॉकपिटमध्ये आग लागल्याने विमानाचे मोठे नुकसान झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे निष्पन्न झाले. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप बाहेर पडले, परंतु विमान दुरुस्ती पलीकडे खराब झाले.
  • २९ मार्च २०१६ रोजी, इजिप्तएर फ्लाइट १८१ (एरबस ए३२०, नोंदणी: SU-GCB) अलेक्झांड्रियाहून कैरोला जात असताना अपहरण करण्यात आले. विमान सायप्रसच्या लार्नाका येथे उतरवण्यात आले. तेथे अपहरणकर्त्याने आत्मसमर्पण केले आणि सर्व ओलीस सुखरूप सुटले.[८९]
  • १९ मे २०१६ रोजी, इजिप्तएर फ्लाइट ८०४ (एरबस ए३२०, नोंदणी: SU-GCC) पॅरिसहून कैरोला जात असताना भूमध्य समुद्रात कोसळले. विमानातील ६६ जणांचा मृत्यू झाला.[९०] २०२२ मधील एका फ्रेंच तपासणीनुसार, वैमानिकाच्या सिगारेटच्या धुराचा गळती होत असलेल्या ऑक्सिजन मास्कशी संपर्क आल्यामुळे कॉकपिटमध्ये आग लागून हा अपघात झाला. असे असता ३० ऑक्टोबर २०२४ रोजी इजिप्शियन नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ही दुर्घटना कॉकपिटच्या मागील भागातील गॅलीमध्ये स्फोट झाल्यामुळे घडली.[९१]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ "इजिप्त एयर - कंपनी प्रोफाइल आणि इतिहास".
  2. ↑ "इजिप्त एयरने नुकसान भरपाईसाठी पुनर्रचना योजना आखली आहे". रोजी मूळ पानापासून संग्रहित2014-06-24. 2016-10-19 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  3. ↑ "इजिप्त एयर - एयरलाईनची माहिती".
  4. 1 2 3 4 5 6 Guttery (1998), p. 51.
  5. ↑ "Egyptair – 'pioneer of air travel'". BBC News. 7 May 2002. 2 February 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. ↑ Flight International. २८ एप्रिल १९३८. पान. ४१६ (संचयित). "MISR AIRWORK, S.A.E., Almaza Aerodrome, Heliopolis."
  7. ↑ "Commercial Aviation – A Misr Airwork Extension". Flight. Vol. XXIX no. 1410. 2 January 1936. p. 23. 14 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. A new service has been opened by Misr Airwork between Alexandria, Port Said, Cairo, Minia and साचा:Sic for the benefit of the cotton fraternity and to enable passengers to redirect from Alexandria to Palestine. This is made possible by the connection at Port Said with the Cairo-Haifa service. The Upper Egypt service will not be immediately reopened since the international situation has played havoc with the tourist industry.
  8. ↑ "Commercial Aviation – Misr Airwork's Year". Flight. Vol. XXIX no. 1421. 19 March 1936. p. 314. 29 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  9. ↑ Guttery (1998), p. ५१–५२.
  10. ↑ Guttery (1998), p. ५२.
  11. 1 2 3 4 Guttery (1998), p. 52.
  12. ↑ "Brevities". Flight. Vol. LX no. 2234. 16 November 1951. p. 633. 14 January 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. The Egyptian airline, Misrair, is reported to have purchased three Languedoc 161s. Two more machines of this type will be acquired next year.
  13. 1 2 3 4 Guttery (1998), p. 55.
  14. ↑ "Civil aviation – Viscounts for Egypt". Flight. Vol. 65 no. 2358. 2 April 1954. p. 414. 14 January 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  15. ↑ "World airline directory – Misrair S.A.E." Flight. Vol. 67 no. 2407. 11 मार्च 1955. p. 307. 3 नोव्हेंबर 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 
  16. 1 2 "More Viscounts for Egypt". Flight. Vol. 72 no. 2533. 9 August 1957. p. 203. 15 January 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  17. ↑ "Unlawful interference, Vickers 739 Viscount SU-AIC, 1 October 1956". Aviation-Safety Network. 30 November 2024 रोजी पाहिले.
  18. ↑ "World airline directory – Misrair S.A.E.—Egyptian Airlines". Flight. Vol. 69 no. 2465. 20 April 1956. p. 475. 22 February 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  19. ↑
  20. 1 2
  21. ↑ "Air commerce – Breaking-even on the Comets". Flight. Vol. 78 no. 2698. 25 November 1960. p. 855. 7 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  22. ↑ "World airline survey—Syrian Arab Airways". Flight International. Vol. 83 no. 2822. 11 April 1963. p. 542. 7 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  23. ↑ Guttery (1998), p. 55–56.
  24. 1 2 Guttery (1998), p. 56.
  25. ↑ "World airline survey—United Arab Airlines[[:साचा:Spaced ndash]]UAA". Flight International. Vol. 83 no. 2822. 11 April 1963. p. 546. 8 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. URL–wikilink conflict (सहाय्य)
  26. ↑ "World airlines 1970 – United Arab Airlines (UAA)". Flight International. Vol. 97 no. 3185. 26 March 1970. p. 508. 3 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  27. ↑ Guttery (1998), p. 57.
  28. ↑ "Air Transport". Flight International. Vol. 100 no. 3268. 28 October 1971. p. 677. 23 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. Egyptair is the new name of United Arab Airlines, adopted on October 10. The change follows the adoption by Egypt of the official name Arab Republic of Egypt, in place of United Arab Republic. The airline's flight prefix code, MS (unchanged), dates from an earlier period when it was known as Misrair.
  29. ↑ Young, Kathryn M. (20 December 2014). "Egyptair contracts Sabre to help implement transformation plan".
  30. ↑ "Annual Report 2010–2011". 2012.
  31. ↑ "इजिप्त एयर - हवाई प्रवासचे प्रणेते". रोजी मूळ पानापासून संग्रहित2014-02-02. 2016-10-18 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  32. ↑ "इजिप्तएयर - वार्षिक अहवाल २०१०-२०११". रोजी मूळ पानापासून संग्रहित2013-10-30. 2016-10-19 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  33. 1 2 "Egypt Air Holding Company". CAPA Centre for Aviation.
  34. ↑ "LSG Sky Chefs Catering Egypt established Joint Venture Agreement signed by Egyptair, EAS and LSG Sky Chefs". LSG Sky Chefs. 15 January 2009.
  35. ↑ "shareholder". ciafleasing. |archive-url= requires |archive-date= (सहाय्य) रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  36. 1 2 Ian McMurtry (30 May 2019). "Logo Lineage Part 6: North African Flare". AirlineGeeks (इंग्रजी भाषेत).
  37. ↑ "Egyptair Flights and Destinations – FlightConnections". www.flightconnections.com (इंग्रजी भाषेत). 2022-08-08 रोजी पाहिले.
  38. ↑ "Home". www.staralliance.com (इंग्रजी भाषेत). 2022-08-08 रोजी पाहिले.
  39. ↑ "Government scraps Egyptair privatisation". Flightglobal. 4 December 2007. 14 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  40. ↑ Dunn, Graham (23 October 2007). "Star Alliance entry to fuel Egyptair expansion". Flightglobal. 14 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  41. ↑ Kaminski-Morrow, David (11 July 2008). "Egyptair formally joins Star Alliance". Flightglobal. London. 13 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  42. ↑ "Egyptair becomes 21st member of Star Alliance" (Press release). Star Alliance. 11 July 2008. 16 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  43. ↑ Saied, Mohamed (28 October 2020). "Ghana signs joint airline deal with Egypt, bypassing Ethiopia". Al-Monitor.
  44. ↑ "Egyptair Code Share Partners".
  45. ↑ "Profile on Egyptair". CAPA.
  46. ↑ "Egyptair and Air Cairo sign codeshare agreement". 1 September 2020.
  47. ↑ Hofmann, Kurt (17 April 2018). "Etihad Airways, Egyptair to expand codeshare". Air Transport World.
  48. ↑ Clark, Oliver (2 June 2017). "Egyptair and Kenya Airways begin cross-alliance codeshare". Flightglobal.
  49. ↑ Liu, Jim (22 November 2017). "EGYPTAIR / LOT Polish Airlines begins codeshare partnership from Nov 2017". Routesonline.
  50. ↑ Hofmann, Kurt (3 April 2018). "TAP Portugal, Egyptair expand codeshare". Air Transport World.
  51. ↑ "Flynas signs agreement with EGYPTAIR to add new destinations in Europe and Africa". 2018.[permanent dead link]
  52. ↑ "Partner Carriers". Hahnair.
  53. ↑ "SUSPENSION OF FLIGHTS BETWEEN CAIRO AND DOHA WITH EFFECT FROM 6 JUNE 2017". Egyptair.
  54. ↑ "Qatar Airways, EgyptAir resume flights to Cairo, Doha after end of boycott". Ahram Online. 19 January 2021. Missing or empty |url= (सहाय्य)
  55. ↑ "EgyptAir makes 1st flight to Doha following restoration of ties". Dailynewsegypt. 18 January 2021. Missing or empty |url= (सहाय्य)
  56. ↑ "Egyptair fleet". Flightradar24 AB.
  57. ↑ "Fleet". EGYPTAIR.
  58. ↑ "EgyptAir to grow widebody freighter fleet". Cargo Facts. 14 November 2023.
  59. ↑ "EGYPTAIR announces order for 10 A350-900s to meet growing demand". www.airbus.com (Press release). 2023-11-13.
  60. ↑ "Air Lease Corporation Announces Lease Placement of 18 New Boeing 737-8 Aircraft with EGYPTAIR". airleasecorp.com (Press release). 13 November 2023.[permanent dead link]
  61. ↑ "Egyptair Buys A340". Flightglobal. 26 July 1995. 16 January 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  62. ↑ "Orders grow for 777s but 1995 deliveries show decline". Flightglobal. 30 August 1995. 16 January 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  63. ↑ "Egyptair introduces the A340-200". Flightglobal. 1 January 1997. 16 January 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  64. ↑ "Marketplace". Flightglobal. 8 April 2003. 16 January 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. Egyptair has ordered seven Airbus A330-200s to be delivered from June 2004 for operation on routes within the Middle East and to Europe, replacing A300-600Rs.
  65. ↑ "Egyptair chooses Trent 700 for new A330 order". Flightglobal. 18 June 2003. 16 January 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  66. ↑ Kaminski-Morrow, David (1 मार्च 2011). "Egyptair in talks to defer A330-300 deliveries". London: Flightglobal. Flight International. 3 जानेवारी 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. The flag carrier took delivery of the first of five Rolls-Royce Trent-powered A330-300s last August, having brought forward their introduction. 
  67. ↑ "Boeing Delivers 50th Airplane to EGYPTAIR" (Press release). Boeing. 17 June 2011. 16 January 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  68. ↑ "Boeing Delivers EGYPTAIR's First 777-300ER for Long-Haul Fleet Upgrade" (Press release). Boeing. 9 March 2010. 16 January 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  69. ↑ Dron, Alan (13 जुलै 2016). "Egyptair is customer for nine Boeing 737-800s". Air Transport World. 22 जुलै 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 
  70. ↑ "EGYPTAIR takes delivery of its first of 16 Airbus A350-900 aircraft" (Press release). Airbus. 9 February 2026. 14 February 2026 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  71. ↑ "EgyptAir to sell 12 Airbus A220 aircraft to Azzora". 3 April 2024.
  72. ↑ "EgyptAir to retire 25 aircraft in 2018". 8 July 2017.
  73. ↑ Ranter, Harro. "SU-AHH Accident description". aviation-safety.net. Aviation Safety Network. 27 February 2014 रोजी पाहिले.
  74. ↑ "WORLD EVENTS IN EUROPE, ASIA AND AMERICA: A MISCELLANY OF NEWS". Illustrated London News (5881): 25. 5 January 1952.
  75. ↑ "SU-AHX Accident description". Aviation Safety Network. 5 March 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 February 2014 रोजी पाहिले.
  76. ↑ "Crash of Vickers 634 Viking 1B in Cairo; 15 Dec 1953". Bureau of Aircraft Accidents Archives.
  77. ↑ "Unlawful interference, Vickers 739 Viscount SU-AIC, 1 October 1956". Aviation-Safety Network.
  78. ↑ "Accident Vickers 739B Viscount SU-AKW, 29 September 1960". Aviation-Safety Network.
  79. ↑ "Accident de Havilland Comet SU-AMW, 19 July 1962". Aviation-Safety Network.
  80. ↑ "Accident - de Havilland Comet SU-ALD, 28 July 1963". Aviation-Safety Network.
  81. ↑ Ranter, Harro. "ASN Aircraft accident Ilyushin Il-18D SU-APC Aswan Airport (ASW)". aviation-safety.net.
  82. ↑ Ranter, Harro. "ASN Aircraft accident McDonnell Douglas DC-9-32 YU-AHR Aden International Airport (ADE)". aviation-safety.net.
  83. ↑ Ranter, Harro. "ASN Aircraft accident Ilyushin Il-18D SU-AOV Nicosia Airport (NIC)". aviation-safety.net.
  84. ↑ Ranter, Harro. "Egyptair 864". aviation-safety.net. Aviation Safety Network. 30 October 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 November 2009 रोजी पाहिले.
  85. ↑ Michael K. Bohn (2004). The Achille Lauro Hijacking: Lessons in the Politics and Prejudice of Terrorism. Washington, D.C.: Potomac Books, Inc.
  86. 1 2 Dario Leone (10 October 2012). "27 years ago today, the Achille Lauro incident: when the U.S. Navy forced an Egyptair Boeing 737 off course". The Aviationist.
  87. ↑ "Egyptair Flight 990 Accident Information". 7 September 2007. 20 July 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 November 2007 रोजी पाहिले.
  88. ↑ "Flight Safety Australia July/August 2002 – Globewatch" (PDF). Civil Aviation Safety Authority. 26 February 2009 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 12 November 2007 रोजी पाहिले.
  89. ↑ "SU-GCB description". Aviation Safety Network. 30 March 2016 रोजी पाहिले.
  90. ↑ Flottau, Jens; Moores, Victoria (19 मे 2016). "Egyptair Airbus A320 lost from radar over Mediterranean Sea". Air Transport World. 19 मे 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 
  91. ↑ "Oxygen fire in cockpit study - Accident to the A320 registered SU_GCC on 19 May 2016" (PDF). Bureau of Enquiry and Analysis for Civil Aviation Safety. 6 December 2024 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 4 May 2025 रोजी पाहिले.