इजिप्तएअर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इजिप्तएअर
आय.ए.टी.ए.
MS
आय.सी.ए.ओ.
MSR
कॉलसाईन
EGYPTAIR
स्थापना ७ जून १९३२ (मिस्र एअरलाइन्स ह्या नावाने)
उड्डाणांची सुरूवात १९३३
हब कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे अलेक्झांड्रिया, लुक्सोर, हुर्गादा, शर्म अल-शेख
फ्रिक्वेंट फ्लायर माइल्स ॲन्ड स्माईल
अलायन्स स्टार अलायन्स
विमान संख्या ८०
ब्रीदवाक्य Enjoy the Sky
मुख्यालय कैरो, इजिप्त
संकेतस्थळ http://www.egyptair.com/
इस्तंबूल अतातुर्क विमानतळावर थांबलेले इजिप्तएअरचे बोईंग ७३७ विमान

इजिप्तएअर (अरबी: مصر للطيران) ही इजिप्त देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे.[१] १९३३ साली स्थापन झालेली इजिप्तएअर मध्य पूर्व, आफ्रिका, युरोप इत्यादी खंडांमधील ७५ शहरांना विमानसेवा पुरवते. इजिप्तएअर ११ जुलै २००८ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे.

इजिप्त एअर ही इजिप्त देशाची ध्वजवाहक विमानवाहतूक कंपनी आहे.[२] कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या कंपनीचेचे मुख्य केंद्र आहे. इजिप्तएर मध्य पूर्व, युरोप, आफ्रिका, एशिया आणि अमेरिकेतील ७५ पेक्षा अधिक ठिकाणी प्रवाशांना विमान सेवा देते.[३]

इतिहास[संपादन]

सन १९३१ मध्ये आंतरराष्ट्रीय विमान व्यवसायाचे अध्यक्ष ॲलन मुन्थ्झ यांनी इजिप्तला भेट दिली. तेव्हा त्यांनी इजिप्त मध्ये विमान सेवा चालू करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांनी त्याला मिश्र एअरवर्क नाव दिले. इजिप्त इजिप्सीयनासाठी असे मिश्रचे संबोधन केले. विमान सेवेचे कार्यक्रमाला तत्कालीन सरकारने ३१ डिसेंबर १९३१ रोजी हिरवा कंदील दाखविला. मिश्र एयरवर्कच्या एका विभागाला मिश्र एअर लाइन नाव दिले आणि तो विभाग दी.७-६-१९३२ रोजी सुरू केला. इजिप्शियन तरूणात याचे महत्व वाढवून स्पर्धात्मक जीवनात क्रांति घडविणे हे या उध्योंगाचे धेय होते आणि ती जगातील ७ क्रमांकाची एयरसेवा होती.[४] एअरवर्कचे मिश्र मुख्य कार्यालय S.A.E. हे अलमाझा एरोड्रम, हेलिओपोलीस, कैरो मध्ये होते. यातील भागभांडवल EG पाउंड २०००० होते त्यात ८५% मिश्र बँक,१०% एअर वर्क,आणि ५% इजिप्सीयन जनता असा सहभाग होता. प्रत्यक्षात यांचे कामकाज जुलै १९३३ मध्ये चालू झाले. दे हेविलंड DH.84 या विमानाचा उपयोग करून कैरो शहर आलेक्सांद्रिय आणि मेरसा मात्रूह यांच्याशी जोडले. त्याच वर्षी ऑगस्ट मध्ये ही सेवा दिवसातून दोन वेळा चालू केली. पुढील काळात खालील सेवा सुरू झाल्या.[५]

सन प्रस्थान आगमन सेरा
१९३३ (चे सेवटी) कैरो आसवण फोर्ट सेड मार्गे त्यात ल्यद्दा, हाइफा, पालेस्तिन या सेवेचा १९३४ मध्ये समावेश झाला.
३-८-१९३५ कैरो साईप्रस ल्यद्दा मार्गे (D.H.86 विमान वापरुन, ऑक्टोबर १९३५ मध्ये बंद)
१९३५ आलेक्झांद्रिय - फोर्ट सेड - कैरो, - मिनिय, - अस्सिउत

१९३५ या वर्षात या विमान कंपनीने ६९९० प्रवाशी वाहातूक केली, २१८३० किलोग्राम मालवाहातूक केली आणि ४१९४६७ मैल (६७५०६७ की.मी) प्रवास केला.[६]

कंपनी कामकाज[संपादन]

इजिप्त एअर ही इजिप्त देशाचे १००% भाग भांडवल असणारी इजिप्त देशाचे मालकीची आहे. या विमान कंपनीने सन २००२ मध्ये ७ कंपनी निर्माण केल्या. त्यानंतर त्यात आनखी दोन कंपनीची भर पडली. तेथे ऐओसी(AOC) चे व्यवस्थापनात तीन विमाने सेवा देत होती आणि त्यांचे उत्पन्न खर्च (हिशोब) स्वतंत्र ठेवले जात होते. ती म्हणजे

  • इजिप्त एअर लाइन्स अति महत्वाची विमान कंपनी
  • इजिप्त देशाचे कार्गो, समर्पित कार्गो एयर लाइन (२००२ मध्ये स्थापना)
  • इजिप्त एअर एक्सप्रेस आंतरदेशीय आणि प्रादेशिक एअर लाइन (२००७ मध्ये प्रारंभ)

इजिप्त एयर होल्डिंग कंपनीच्या इतर कंपनी खालील प्रमाणे आहेत[संपादन]

  • इजिप्त एअर मेंटेनन्स आणि इंजीनीरिंग, मुळातील अंतरदेशीय सेवा पण अलीकडे थर्ड पार्टी व्यवसाय आहे. यांचेकडे EASA पार्ट१४५ आणि FAA सर्टिफिकेट आहे.[७]
  • इजिप्त एअर ग्राऊंड सेवा, इजिप्त कडे येनार्‍या ७५% विमानांना सेवा दिली जाते.
  • इजिप्त एअर विमान सेवा
  • इजिप्त एअर पर्यटक आणि कर विरहित शॉपिंग
  • इजिप्त एअर स्वास्थ्य सेवा
  • इजिप्त एअर औध्योगिक पूरक कंपनी

सहायक आणि संघटन[संपादन]

इजिप्त एअरचे खालील कंपनीत भाग भांडवल आहे.

  • एअर कार्गो (६०%)(६६),
  • स्मार्ट एविएशन कंपनी.(१३.३३%)
  • एअर सिनई
  • इजिप्त एरो व्यवस्थापन सेवा
  • LSG स्काय चेफ्स कटरिंग इजिप्त
  • CIAF – लिजिंग(२०%)

मुख्य कार्यालय[संपादन]

इजिप्त एअरचे मुख्य कार्यालय कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर आहे.[८]

बोध चिन्ह[संपादन]

इजिप्त एअरचे बोध चिन्ह होरूस आहे. (इजिप्सीयनांची BC २४००-२३०० कालावधीतील देवता) इजिप्तचे पौराणिक परंपरेप्रमाणे त्यांनी आकाश देवता मानलेली आहे. तीला त्यानी विंगड गॉड ऑफ द सन म्हटले आहे, साधारणपणे बहिरी ससाणा आकाशात भरारी घेतानाचे त्याचे विहंगम दृश्य नजरेसमोर ठेऊन तसे चित्र निर्मिले आहे आणि ते हे बोध चिन्ह घेतले आहे.

निर्गमन स्थानक[संपादन]

जून २०१३ पर्यन्त इजिप्त एअर लाइन ८१ ठिकाणी विमान सेवा देत होती त्यात १२ इजिप्त,१९ आफ्रिका,२० मध्य पुर्व, ७ एशिया, २१ युरोप आणि २ अमेरिका सेवेचा समावेश होता.[९]

संघटन[संपादन]

११ जुलै २००८ रोजी कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या कार्यक्रमात २१ विमान कंपनीचे ९ महिन्यांच्या अथक प्रयत्नाने संघटन झाले.[१०]

कायदेशीर भागीदारी करार[संपादन]

एप्रिल २०१५ पर्यन्त खालील विमान कंपनीशी व्यवसाय भागीदारी करार झालेले आहेत.

  • एगेयन एअर लाइन
  • एअर कॅनडा
  • एअर चायना
  • एअर इंडिया
  • औस्ट्रियन एअर लाइन
  • ब्रुसेल्स एअर लाइन्स
  • एथिओपियन एअर लाइन्स
  • गल्फ एअर
  • लुफतान्सा
  • मलेशिया एअर लाइन्स
  • स्कंडींनावियन एअर लाइन
  • सिंगापुर एअर लाइन
  • साऊथ आफ्रिकन एअर वेज
  • स्विस इंटरनॅशनल एअर लाइन्स
  • टाप (TAP) पोर्तुगाल
  • थाय एअर वेज इंटरनॅशनल
  • तुंनिसाइर
  • टर्किश एअर लाइन्स
  • यूनायटेड एअर लाइन्स

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • ^ "इजिप्त एयर - कंपनी प्रोफाइल आणि इतिहास". आईडीई.गो.जेपी. ९ जून २०१६. 
  • ^ "इजिप्त एयरने नुकसान भरपाईसाठी पुनर्रचना योजना आखली आहे". वेब.आर्काइव.ऑर्ग. १५ जून २०१४. 
  • ^ "इजिप्त एयर - एयरलाईनची माहिती". सीएच-एविएशन .कॉम. १३ जुलै २०१६. 
  • ^ "इजिप्तएयर - हवाई प्रवासचे प्रणेते". वेब.आर्काइव.ऑर्ग. ७ मे २००२. 
  • ^ "इजिप्त एयरचे उड्डाण वेळापत्रक". क्लियरट्रिप.कॉम. १८ ऑक्टोबर २०१६. 
  • ^ "व्यावसायिक हवाई वाहतूक". वेबसाइटेशन.ऑर्ग. २९डिसेंबर २०१३. 
  • ^ "इजिप्तएयर - वार्षिक अहवाल २०१०-२०११". वेब.आर्काइव.ऑर्ग. ३० ऑक्टोबर २०१३. 
  • ^ "इजिप्त एयर - हवाई प्रवासचे प्रणेते". वेब.आर्काइव.ऑर्ग.कॉम. ७ मे २००२. 
  • ^ "इजिप्त एयर ने सहा 737-800 प्रकारची विमान विकत घेतले, सहा अधिक पर्याय उपलब्ध". वेब.आर्काइव.ऑर्ग.कॉम. १० ऑगस्ट २००५. 
  • ^ "इजिप्त एयर-स्टारअलायन्स सदस्य". स्टारअलायन्स.कॉम. १५ अक्टूबर २०१६.