आषाढ शुद्ध नवमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आषाढ शुद्ध नवमी ही आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील नववी तिथी आहे.


हिला कांदे नवमी म्हणतात.

यादिवशी कांद्याचे भरपूर पदार्थ करून खाण्याची प्रथा आहे. कारण या दिवसानंतर दोनच दिवसांनी आषाढी एकादशी येते आणि त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. चातुर्मासात कांदा, लसूण, वांगे वगैरे पदार्थ आणि मांसाहार वर्ज्य असतो. आषाढ शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे वर्षातले चार महिने, कांदा लसूण खाणे बंद करायचे. मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचे म्हणून मोठी एकादशीपूर्वी अर्थात आषाढ शुद्ध नवमीला कांदे नवमी साजरी होते. पावसाळ्यात कांदा सडल्यासारखा होतो, म्हणून चातुर्मासात वर्ज्य केलेला आहे. तसेच वांगीदेखील वर्ज्य असतात.

यादिवशी कांदा भजी, कांद्याचे थालीपीठ, भरलेली वांगी हे पदार्थ तयार करून हा दिवस साजरा केला जातोच जातो. एकेकाळी हे नियम प्रामाणिकपणे लागू व्हायचे. कोणाच्याही घरातून कांदा, लसणाचा फोडणीचा घमघमीत वास येणे शक्यच नव्हते. म्हणून कांदे नवमीच्या दिवशी भरपूर कांदे खाल्ले जायचे. कांद्याची भजी, थालपीठे, झुणका वगैरे खाऊन हा दिवस साजरा होतो.


पहा : नवमी