आशिया खंडातील एलजीबीटी समुदायांचे हक्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खंडामध्ये समलिंगी लैंगिक कल असलेले पुरूष व स्त्रीया, द्वीलिंगी लैंगिक कल असलेले पुरूष व स्त्रीया आणि परालिंगी यांच्या हक्कांवर बाकीच्या जगाचा विचार केल्यास आशिया खंडात मर्यादा आहेत. जवळपास २० आशियाई देशात समलैंगिकता हा गुन्हा आहे. ८ आशियाई देशांनी ह्या समुदायाच्या हक्कांविषयी थोडेफार काही काही कायदे केले आहेत, फक्त ईस्त्राईल आणि तैवान ह्या देशांमध्येच या समुदायासाठी मोठ्या प्रमाणात हक्क दिले गेले आहेत. ह्या देशांमध्ये समलिंगी नात्याला कायदेशीर मान्यता आहे.

अफगाणीस्तान, ब्रुनोई, ईराण, क्वातार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि येमेन या ठिकाणी समलिंगी लैंगिक कृती केल्यास मृत्यूदंडाची शिक्षा केली जाते.[१] कायद्यात कोणत्या प्रकारची शिक्षा दिली गेली आहे, ह्याचा संबंध त्या देशातील न्याय व्यवस्था कोणत्या विचारश्रेणीची आहे याच्याशी आहे, काही देशांमध्ये मृत्यूदंड, तर काही ठिकाणी आजीवन कारावासाची शिक्षा दिली जाते. तर तुलनेने पुरोगामी असलेल्या अझेरबैजान, जोर्डन आणि टर्की सारख्या मुस्लिम बहुल लोकसंख्येच्या देशांमध्ये जरी समलैंगिकता कायद्याने गुन्हा नसली तरीही, सामाजिक पातळीवर स्वीकारली गेलेली नाही.

समानतेच्या पातळीवर एकत्र आलेली जोडपी हा विचार जरी पाश्चात्य जगाकडून आलेला असला तरीही तो अजुनही पुरेसा रुजलेला नाही.[२] कंबोडिया, पुर्व तिमोर, होंगकोंग, इस्राईल, जापान, मंगोलिया, नेपाळ, पिलिपाईन्स, दक्षिण कोरिया, तैवान, थाईलंड, वियेतनाम आणि सिप्रस हे देश एलजीबीटी समुदायासाठी खुले वातावरण असलेले समजले जातात. जापान, ईस्राईल, थाईलंड, तैवान आणि नेपाळ हे कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रगतीपथावर असलेले देश आहेत. सध्या, २०१८ पर्यंत फक्त अक्रोतिरी आणि ढेकेलिया येथेच समलिंगी विवाहाला कायदेशिर मान्यता दिली गेली आहे.[१][३][२]

२०११ च्या संयुक्त राष्ट्रांच्या आशीया खंडातील एलजीबीटी समुदायाच्या हक्कांसाठीच्या घोषणापत्रात आशीयातील देशांना आपला पाठिंबा देण्यास आमंत्रित केले गेले होते. फक्त अर्मेनिया, जोर्जिया, सिप्रस, ईस्राईल, दक्षिण कोरीया, जापान, मंगोलिया, नेपाळ, थाईलंड आणि पूर्व तिमोर यांनी आपला पाठींबा दर्शवला आहे. त्यांना वियेतनाम आणि फिलिपाईन्स या देशांनीही साथ दिली. तर इंडोनेशिया, मलेशिया, ब्रुनेई, मालदीव, उत्तर कोरिया, बांगलादेश, पाकिस्तान, इराण, इराक, सौदी अरेबिया, कुवैत, ओमान, येमेन, संयुक्त अरब अमिरात, बहारीन, कतार, सीरिया, अफगाणिस्तान, जॉर्डन, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, आणि ताजिकिस्तान. या आशियाई देशांनी आपला विरोध असल्याचे जाहिर केले.

जगातील पहिला वहिला एलजीबीटी राजकीय पक्ष, फिलीपिन्स मध्ये 2003 लाडलाड मध्ये स्थापन करण्यात आला.[४]

आशिया खंडातील समलिंगी विवाहाचे कायदे
  विवाहाला मान्यता
  परदेशात झालेल्या समलिंगी विवाहांना स्थानिक पातळीवर मान्यता
  इतर प्रकारची जोडपी
  कसलीही नोंदणी न करता एकत्र रहाणे
  समलिंगी जोडप्यांना कसलेही कायदेशीर अधिकार नाहीत.
  व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर मर्यादा
समलिंगी कृतीवरही कायदेशीर बंदी
  कायद्यांमधली संभ्रमता
  गंभीर शिक्षा
  आजीवन कारावास
  मृत्यूदंडाची शिक्षा

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ a b max.bearak. "Analysis | Here are the 10 countries where homosexuality may be punished by death". Washington Post (इंग्रजी भाषेत). 2018-11-23 रोजी पाहिले.
  2. ^ a b "ILGA | 7 countries still put people to death for same-sex acts". Archived from the original on 2009-10-29. 2018-11-23 रोजी पाहिले.
  3. ^ "Brunei: Sultan institutes death penalty for homosexuality". MuslimVillage.com (इंग्रजी भाषेत). 2014-04-20. 2018-11-23 रोजी पाहिले.
  4. ^ "Gay party-list group Ladlad out of the race - INQUIRER.net, Philippine News for Filipinos". Archived from the original on 2012-09-26. 2018-11-23 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)