आवळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुरटआंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे, हिरव्या रंगाचे अत्यंत औषधी फळ.

आवळ्याचे झाड
आवळ्याच्या झाडाची फांदी

हा ज्यांचे जन्मनक्षत्र भरणी आहे त्यांचा हा आराध्यवृक्ष आहे. रोज एक चमचा आवळा रस किंवा चूर्ण घेतल्याने माणूस जन्मभर निरोगी राहतो. आवळा हा भाजला, उकडला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाही. यात पांच रस आहेत. कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षड्रस) मिळतात. च्यवनप्राश या प्रसिद्ध औषधाचा मुख्य घटक आवळा हा आहे.'वयस्थापक' (म्हातारपण येऊ न देणे) हा आवळ्याचा एक प्रमुख गुणधर्म आहे.

रायआवळा नावाचे एक आवळ्याच्या चवीचे पण वेगळे फळ आहे.

आवळा हे कोरडवाहू फळपीक आहे. या फळामध्ये ‘क’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.

हे सुद्धा पहा[संपादन]