त्रिफळा
त्रिफळा म्हणजे आवळा, हिरडा आणि बेहडा या तीन औषधी वनस्पतींच्या फळांचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण केलेले चूर्ण होय. हे आयुर्वेदातील एक उत्तम रसायन आहे.
वैदिक शास्त्रानुसार गेली ५००० वर्षे, आयुर्वेदिक औषध प्रणाली त्यांच्या औषधीय आणि आरोग्य निर्मात्या गुणधर्मांसाठी अनेक वनस्पतींचे वापर करत आहे. “शारंगधर संहिता” नावाच्या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथामध्ये प्रसिद्ध बहुवनस्पतीय (एकापेक्षा अधिक वनस्पतीने बनलेले) मिश्रणांचे उल्लेख सापडते आणि “चरक संहिता” नावाच्या ग्रंथात विशेष करून त्रिफळाचे आरोग्य फायदे सापडतात.
त्रिफळा म्हणजे नेमके काय आहे ?
[संपादन]त्रिफळा अर्थात तीन फळे. त्यात आवळा (एंब्लिका ऑफिशिअनॅलिस) , बिभीतकी किंवा बहेडा किंवा बेहडा ( टर्मिनलिआ बेलेरिका) आणि हारीतकी किंवा हरड किंवा हिरडा ( टर्मिनलिआ शेब्युला) यांपासून बनलेले मिश्रण वास्तविक पाहता, त्रिफळा या नावातच लक्षात येते. “त्रिफळा” (त्रि = तीन आणि फळा= फळ) आयुर्वेदामध्ये, त्रिफळाचे शोध मुख्यत्वे त्याच्या “रसायन” गुणधर्मांसाठी केले जाते, म्हणजेच हे मिश्रण शरिराचे आरोग्य आणि सुदृढता राखून ठेवण्यात खूप प्रभावी आहे आणि आजार होणें टाळते.
आवळा (एंब्लिका ऑफिशिअनॅलिस)
[संपादन]देशभरात सर्वत्रच आढळून येणाऱ्या सर्वांत सामान्य फळांपैकी एक असलेल्या आवळ्याला इंडिअन गूझबॅरी असेही म्हणतात. आवळा हे फळ तंतू, अँटीऑक्सिडंट, खनिज यामध्ये प्रचुर आणि जगात विटामिन सीच्या सर्वांत समृद्ध स्त्रोतांपैकी एक आहे. ते चांगल्या अमाशय आरोग्य, बद्धकोष्ठता टाळणे, केस संबंधित समस्या, पोटासंबधित आणि संक्रमणाविरुद्ध झगडण्यासाठी आणि एक वयवाढरोधी संकाय म्हणून सामान्यपणे वापरले जाते.[१][२]
बहेडा/बेहडा (टर्मिनलिआ बेलेरिका)
[संपादन]हे रोप सामान्यपणे भारतीय उपमहाद्वीपात आढळते. हे फळ तापशामक, अँटीऑक्सिडंट, यकृतरक्षक (यकृतासाठी चांगले), श्वसनात्मक समस्या आणि मधुमेहरोधी म्हणून आयुर्वेद औषधीय प्रणालीमध्ये ओळखल्या जाते. आयुर्वेदाप्रमाणें, बहेडामध्ये अनेक प्रचुर जीवशास्त्रीय यौगिक असतात उदा. ग्लूकोसाइड, टॅनिन, गॅलिक एसिड, एथाइल गॅलॅट इ. एकत्रितपणें, ही यौगिके बहेडाच्या अधिकतम आरोग्य फायद्यांसाठी लाभकारी आहे.[३][४]
हरड/हिरडा (टर्मिनलिआ शेब्युला)
[संपादन]हरड आयुर्वेदाला ज्ञात असलेली सर्वांत महत्त्वपूर्ण वनस्पती आहे. त्याचे आरोग्य फायदे अँटीऑक्सिडंट, दाहशामक आणि वयवाढरोधी असल्याशिवाय एक उत्कृष्ट जखम बरे करणारे औषधी आहे. यकृत, पोट, हृदय आणि पित्ताशयाच्या सामान्य कार्याची पुनर्स्थापना आणि साजसांभाळ करण्यात त्याचे लाभ आयुर्वेदात सुख्यात आहे. वास्तविकरीत्या हिरडा याला “औषधांचा राजा” असे म्हणले आहे.[५][६]
अशक्तपणावर फायदेशीर
शारीरिकरित्या कमकूवत असणाऱ्या व्यक्तीसाठी त्रिफळा रामबाण ठरते. याचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते. दुर्बलता कमी होते. हरडा, बेहडा, आवळा, तूप आणि साखर यांच्या सह त्रिफळाचे सेवन केल्यास अतिशय फायदेशीर ठरते.
रोगप्रतिकारकशक्ती वाढते
त्रिफळाच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. मात्र यासाठी त्रिफळाचे सेवन नियमित करणे आवश्यक आहे.
उच्च रक्तदाबावर गुणकारी
त्रिफळाचे सेवन केल्याने हृदयरोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यावर फायदा होतो. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या वाढत्या स्तरामुळे हैराण असाल तर 3-4 ग्रॅम त्रिफळा चूर्ण दूधात घालून दररोज रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा. नक्कीच आराम मिळेल.
बद्धकोष्ठतेवर फायदेशीर
त्रिफळा चूर्णाचे महत्त्वाचा गुण म्हणजे यामुळे बद्धकोष्ठतेवर आराम मिळतो. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत खाण्या-पिण्याच्या वेळा नियमित नसतात, ताण-तणाव तर कायम असतोच. त्यामुळे अधिकतर लोक बद्धकोष्ठतेने हैराण आहेत. हा त्रास असणाऱ्यांनी कोमट पाण्यात त्रिफळा चूर्ण घालून नियमित घ्या.
नेत्रविकारांवर आराम
त्रिफळा चूर्ण पाण्यात घालून त्याने डोळे धुतल्याने डोळ्यांचे त्रास दूर होतात. मोतीबिंदू, डोळ्यांची जळजळ, इतर दोष कमी करण्यासाठी 10 ग्रॅम गायच्या तूपात 1 चमचा त्रिफळा चूर्ण आणि 5 ग्रॅम मध घालून त्याचे सेवन करा.
त्वचारोगावर परिणामकारक
खाज, जळजळ, फोड्या यांसारख्या समस्यांवर त्रिफळा परिणामकारक ठरते. यासाठी सकाळ-संध्याकाळी 6-8 ग्रॅम त्रिफळा चूर्ण खाल्याने फायदा होतो. एक चमचा त्रिफळा चूर्ण एक ग्लास पाण्यात 2-3 तास भिजत ठेवा. त्यानंतर त्या पाण्यात गुळण्या करा. त्यामुळे तोंडाचे विकार दूर होण्यास मदत होईल.
डोकेदुखीवर
त्रिफळा, हळद, कडूलिंब यांच्या साली काढून पाण्यात उकळवा. हे पाणी गाळून सकाळ-संध्याकाळ गुळ किंवा साखरेसोबत प्या. डोकेदुखीवर आराम मिळेल.
जाडेपणावर उपयुक्त
जाडेपणामुळे त्रासलेले असाल तर त्रिफळाचे सेवन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. यासाठी त्रिफळाच्या कोमट काढ्यात मध घालून प्या. त्यामुळे चरबी कमी होते.
हे सुद्धा पहा
[संपादन]
संदर्भ
[संपादन]- ^ "आवळा". विकिपीडिया. 2020-10-01.
- ^ "आवळा: रस, फायदे, वापर, सहप्रभाव आणि मात्रा - Amla: Juice, Benefits, Uses, Side Effects and Dosage in Marathi". myUpchar. 2020-10-02 रोजी पाहिले.
- ^ "बेहडा (Behada)". मराठी विश्वकोश. 2019-02-07. 2020-10-02 रोजी पाहिले.
- ^ "बेहडा". विकिपीडिया. 2020-10-01.
- ^ "हिरडा". विकिपीडिया. 2020-10-01.
- ^ "हिरडा". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2020-10-02 रोजी पाहिले.
- ^ "त्रिफळाचे फायदे, सहप्रभाव आणि ते कसे घ्यावे. - Triphala Benefits, Side Effects and How to take. in Marathi". myUpchar. 2020-10-02 रोजी पाहिले.