आर.के. खन्ना टेनिस संकुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर.के. खन्ना टेनिस संकुलामधील एक कोर्ट

आर.के. खन्ना टेनिस संकुल हे भारत देशाच्या नवी दिल्ली शहरामधील एक टेनिस स्टेडियम आहे. ह्या संकुलामध्ये ५,०१५ आसनक्षमता असलेले एक मुख्य कोर्ट, ६ इतर कोर्ट्स व ६ सराव कोर्ट्स आहेत. हे संकुल इ.स. १९८२ साली खुले करण्यात आले व २००९ साली त्याची डागडुजी करण्यात आली.

१९८२ आशियाई खेळ२०१० राष्ट्रकुल खेळ ह्या स्पर्धांमधील टेनिस सामन्यांसाठी हे संकुल वापरण्यात आले होते. डेव्हिस करंडकफेड करंडक स्पर्धांमधील भारत संघाचे काही सामने येथे खेळवले जातात.

गुणक: 28°33′36″N 77°11′19″E / 28.56000°N 77.18861°E / 28.56000; 77.18861