आर्किया इस्रायल एरलाइन्स
| ||||
| स्थापना | १९४९ | |||
|---|---|---|---|---|
| हब |
बेन गुरियन विमानतळ ऐलात विमानतळ | |||
| विमान संख्या | ८ | |||
| मुख्यालय | तेल अवीव, इस्रायल | |||
| संकेतस्थळ | http://www.arkia.com/ | |||

आर्किया इस्रायल एरलाइन्स (हिब्रू: ארקיע; अरबी: خطوط أركيا) ही इस्रायल देशामधील एक विमान-वाहतूक कंपनी आहे. तेल अवीव महानगरामध्ये मुख्यालय व बेन गुरियन विमानतळावर प्रमुख हब असणारी अर्किया सध्या १६ देशांमधील २७ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवते.
इतिहास
[संपादन]

स्थापना आणि सुरुवातीची वर्षे
[संपादन]आर्कियाची स्थापना १९४९ मध्ये इस्त्रायल इनलँड एरलाइन्स नावाने झाली. नव्याने स्थापन झालेल्या इस्रायलच्या विविध प्रदेशांना, विशेषतः आकाबाच्या आखातात असलेल्या एलात या महत्त्वाच्या बंदराला तेल अवीवशी जोडण्यासाठी स्थानिक विमान कंपनीची गरज असल्याचे स्पष्ट झाल्यावर या कंपनीची स्थापना झाली.[१] १९५० मध्ये डी हॅविलँड डीएच.८९ विमानांद्वारे उड्डाणे सुरू झाली, त्यानंतर उत्तरेकडील रोश पिनापासून दक्षिणेकडील एलात बंदरापर्यंत इस्रायलमधील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी डग्लस डीसी-३ विमाने वापरली गेली.[१] या काळात एल अल कडे विमान कंपनीचा ५०% हिस्सा होता, तर उर्वरित हिस्सा इस्रायलचे कामगार महासंघ असलेल्या हिस्ताद्रुतकडे होता.[ संदर्भ हवा ] नंतर या विमान कंपनीने एलाता एरलाइन्स - एव्हिरॉन आणि आर्किया इस्रायल एरलाइन्स ही नावे स्वीकारली.[ संदर्भ हवा ] सेवेच्या पहिल्या वर्षात, इस्त्रायल इनलँड एअरलाईन्सने कर्टिस सी-४६ कमांडो वापरून १३,४८५ प्रवासी वाहून नेले.[१]
१९५० च्या दशकात विमान कंपनीची प्रगती होत राहिली. ताफ्यात मोठ्या डीसी-३ विमानांचा समावेश करण्यात आला आणि तेल अवीव-एलात मार्गावर दिवसातून दोन उड्डाणे सुरू झाली.[१] यामुळे आर्कियाच्या वार्षिक प्रवाशांची संख्या ७०,००० पेक्षा जास्त झाली.[१] १९६० च्या दशकात एलात शहराचा विकास होत गेला तशीच विमान कंपनीचीही वाढ झाली. १९६७ ते १९६८ दरम्यान ताफ्यात हँडली पेज डार्ट हेराल्ड २०० टर्बोप्रॉप विमानांचा समावेश करण्यात आला, ज्यामुळे आर्कियाला जेरुसलेम आणि शर्म-अल-शेख पर्यंत नवीन मार्ग विस्तारता आले.[१] कनाफ एअरलाईन्स अँड एव्हिएशन सर्व्हिसेसचे ५०% शेअर्स विकत घेतल्यावर 'कनाफ आर्किया एअरलाईन अँड एव्हिएशन सर्व्हिसेस' ही उपकंपनी स्थापन झाली. १९६० च्या दशकाच्या अखेरीस, उत्तरेकडील रोश पिनापासून दक्षिणेकडील ओफिरापर्यंत संपूर्ण इस्रायलमध्ये नियमित उड्डाणे सुरू झाली होती.[१]

मार्च १९८० मध्ये, कनाफ आर्कियाने आर्कियाचे उर्वरित समभाग विकत घेतले आणि दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण केले.[ संदर्भ हवा ] १९८० च्या दशकात विमान कंपनीने वेगाने प्रगती केली आणि आंतरराष्ट्रीय चार्टर मार्केट तसेच विमानांच्या देखभाल-दुरुस्ती क्षेत्रात प्रवेश केला.
विमानताफा
[संपादन]



सध्याचा ताफा
[संपादन]ऑगस्ट २०२५मध्ये आर्कियाकडील विमाने:[२]
| विमान | सेवेत | मागणीवर | प्रवासी | नोंदी |
|---|---|---|---|---|
| एरबस ए३२०-२०० | १ | — | १८० | [३] |
| एरबस ए३२१ एलआर | २ | — | २१९ | पहिले गिऱ्हाइक.[४][५] |
| एम्ब्राएर १९५ | ३ | — | १२२ | |
| एकूण | ६ | — | ||
ऐतिहासिक ताफा
[संपादन]आर्किया इस्रायल एरलाइन्सने खालील विमाने देखील चालवली आहेत:[६]
| विमान | सुरुवात | निवृत्त | नोंदी |
|---|---|---|---|
| एटीआर ७२-५०० | १९९८ | २०१७ | |
| बोईंग ७३७-२०० | १९८२ | २००० | |
| बोईंग ७५७-२०० | १९९३ | २००७ | |
| बोईंग ७५७-३०० | २००० | २०१९[ संदर्भ हवा ] | |
| कर्टिस सी-४६ कमांडो | १९५० | माहिती नाही | |
| डी हॅविलँड कॅनडा डॅश ७ | माहिती नाही | माहिती नाही | |
| डग्लस डीसी-३ | १९५५ | माहिती नाही | |
| एम्ब्राएर १९० | माहिती नाही | माहिती नाही | |
| हँडली पेज डार्ट हेराल्ड | १९६४ | माहिती नाही | |
| व्हिकर्स व्हायकाउंट | १९८० | माहिती नाही |
रंगसंगती (लिव्हरी)
[संपादन]मे २०१७ मध्ये नवीन विमाने सेवारत होण्यापूर्वी आर्कियाने नवीन रंगसंगती जाहीर केली. यामध्ये विमानाच्या शेपटांच्या उभ्या भागावर इंग्लिश 'a' हे अक्षर असून विमानाचा मागील भाग आणि विंगलेट्सवर विविध रंगांचे पट्टे आहेत. पट्ट्यांचा आणि बोधचिह्नाचा रंग प्रत्येक विमानानुसार वेगळा असतो.[७]
बाह्य दुवे
[संपादन]
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2010-12-25 at the वेबॅक मशीन.
- 1 2 3 4 5 6 7 "About Arkia". Arkia Israel Airlines. 2007-05-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-07-20 रोजी पाहिले.
- ↑ "Global Airline Guide 2025 - Arkia". Airliner World. September 2025. p. 63.
- ↑ קוטלר, עמית (31 July 2025). "ארקיע מתרחבת: מטוס שביעי נוסף לצי החברה; עבר צביעה וחידוש של תא הנוסעים". פספורטניוז (हिब्रू भाषेत). PassportNews. 31 July 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Arkia Israeli Airlines takes delivery of world's first A321LR" (Press release). Airbus. 14 November 2018.
- ↑ "Israel's Arkia to take maiden A321neo(LR)". ch-aviation.com. 16 October 2018 रोजी पाहिले.
- ↑ "Arkia Israeli Airlines - Company Profile and History". 2018-03-01 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-02-28 रोजी पाहिले.
- ↑ "PICTURE: Arkia revamps livery ahead of fleet renewal". लंडन: Flightglobal. 15 May 2017. 19 May 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित.