आरापंखी टिटवी
Appearance
आरापंखी टिटवी (इंग्लिश:Spur-winged lapwing; हिंदी:खार पंखी टीटीरी) हा एक पक्षी आहे.
हा पक्षी आकाराने तित्तिरापेक्षा मोठा असून वरून शरबती करडा व फिकट उदी, तसाच रंग छातीचा असतो. कपाळ, डोके, शेंडी व गळा काळा, त्याला पांढरी किनार, पोटावर काळा डाग, शेपूट व शेपटी जवळचा भाग पांढरा, शेपटीचे टोक काळे आणि उडताना पंखावर लांब पांढरी पट्टी दिसते. तसेच पंखाची टोके काळी असतात. ते जोडीने किवां समुहाने राहतात.
वितरण
[संपादन]ते निवासी असतात व ते स्थानिक स्थलांतर करतात. मणिपूर, आसाम आणि संलग्न राज्य, बांगला देश, भूतान आणि उत्तर भारत, हरियाणा, मध्य प्रदेश, दक्षिणेकडे गोदावरी नदीपर्यंत असतात.
निवासस्थाने
[संपादन]ते नद्यांचा वाळवंटी भागात आढळतात.
संदर्भ
[संपादन]- पक्षिकोश - मारुती चित्तमपल्ली