आय.डी.पी. एज्युकेशन
Appearance
ऑस्ट्रेलिया येथील आय.डी.पी. एज्युकेशन (इंग्रजी: IDP Education) ही संस्था परदेशांत जास्तीत जास्त विद्यार्थी मिळवण्यासाठी प्रयत्न करते व त्या बदल्यात विद्यापीठे या संस्थेला विद्यार्थ्याच्या पहिल्या वर्षाच्या फीच्या १०% रक्कम देतात. या संस्थेची जगभरात कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. त्यांद्वारे ऑस्ट्रेलियन शिक्षणाचे जोरदार जागतिक विपणन करण्याचा प्रयत्न होत आहे.
या संस्थेची भारतातील मुख्य शहरांमध्ये, जसे मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद व चंदीगड येथे कार्यालये आहेत. संस्थेच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.