आय.एम. पेइ
Appearance
(आय.एम.पै या पानावरून पुनर्निर्देशित)
आय.एम. पेइ I.M. Pei | |
---|---|
जन्म |
२६ एप्रिल, १९१७ कॅंटन, चीन |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
शिक्षण | मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी |
पेशा | वास्तूशास्त्रज्ञ |
इहो मिंग पेइ (जन्मः एप्रिल २६, इ.स. १९१७) हे एक चिनी-अमेरिकन स्थापत्यकार आहेत. त्यांना आधुनिक वास्तूशास्त्राचा जनक असे संबोधले जाते. १९१७ साली चीनच्या कॅंटन शहरात जन्मलेले व शांघाय आणि हॉंग कॉंगमध्ये वाढलेले पेइ इ.स. १९३५ साली अमेरिकेत दाखल झाले. एम.आय.टी.मध्ये वास्तूशास्त्र शिकताना पेइंनी फावल्या वेळेत नवनवी स्थापत्य तंत्रे विकसित केली तसेच ल कॉर्बूझीये व इतर होतकरू वास्तूशास्त्रज्ञांच्या शैलीचा अभ्यास केला.
आजवर पेइ ह्यांनी अमेरिकेमधील व जगातील अनेक प्रसिद्ध इमारती डिझाईन केल्या आहेत. त्यांच्या कामात बॉस्टनमधील जॉन एफ. केनेडी अध्यक्षीय ग्रंथालय, पॅरिसमधील लूव्र संग्रहालयाचा काचेचा पिरॅमिड, हॉंग कॉंगमधील बँक ऑफ चायना टॉवर तसेच दोहामधील म्युझियम ऑफ इस्लामिक आर्ट ह्या उल्लेखनीय वास्तू गणल्या जातात.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "पेइ, कॉब, फ्रीड व सहकारी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)