आयर्विन पूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयर्विन पूल हा महाराष्ट्राच्या सांगली शहरातील कृष्णा नदीवरील पूल आहे.

पार्श्वभूमी[संपादन]

सांगलीत इ.स. १९१४ व इ.स. १९१६ साली आलेल्या महापुरानंतर कृष्णा नदीवर पूल असण्याची गरज निर्माण झाली. यासाठी तत्कालीन सांगली संस्थानाचे अधिपती चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन दुसरे यांनी पुढाकार घेतला. व इ.स. १९२७ साली पुलाचे बांधकाम सुरू झाले व इ.स. १९२९ साली ते पूर्ण झाले. पुलाचे उद्घाटन तत्कालीन व्हाईसराय आयर्विन यांच्या हस्ते इ.स. १९२९ साली झाले.