आफ्रिकान्स विकिपीडिया
आफ्रिकान्स विकिपीडियाचे संस्थाचिन्ह | |
ब्रीदवाक्य | मुक्त ज्ञानकोश |
---|---|
प्रकार | ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प |
उपलब्ध भाषा | आफ्रिकान्स |
मालक | विकिमीडिया फाउंडेशन |
निर्मिती | जिमी वेल्स, लॅरी सॅंगर |
दुवा | http://af.wikipedia.org/ |
व्यावसायिक? | चॅरिटेबल |
नोंदणीकरण | वैकल्पिक |
अनावरण | १६ नोव्हेंबर, इ.स. २००१ |
आशय परवाना | क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.० |
आफ्रिकान्स विकिपीडिया ( आफ्रिकान्स ) वेब -आधारित मुक्त-मजकूर ज्ञानकोश विकिपीडियाची आफ्रिकान्स भाषेतील आवृत्ती आहे. हा प्रकल्प १६ नोव्हेंबर २००१ रोजी सुरू झाला होता आणि ही ११वी तयार केलेली विकिपीडिया आवृत्ती आहे.[१] डिसेंबर २०१६ मध्ये ही लेखसंख्येनुसार ८४वे सर्वात मोठे विकिपीडिया आवृत्ती होती. दक्षिण आफ्रिका आणि नामीबिया व्यतिरिक्त, आफ्रिकान्स विकिपीडियाचा वापर आणि देखभाल युरोप, उत्तर अमेरिका आणि ओशनिया मधील वापरकर्त्यांद्वारे केले जाते. सप्टेंबर २०२० पर्यंत ही आफ्रिकेच्या भाषांपैकी सर्वात मोठी आणि विकिपीडियाची ७० व्या क्रमांकाची सर्वात मोठी भाषा आवृत्ती होती.[२]
भेटी आणि संपादने
[संपादन]आफ्रिकान्स विकिपीडिया मधील शोध सर्व विकिपीडिया शोधांपैकी ०.००८% होते. १ जुलै २००९ ते ३० सप्टेंबर २०१३ या कालावधीत आफ्रिकान्स विकिपीडिया वर सर्वाधिक वापरकर्त्यांनी खालील प्रमाणे भेटी दिल्या.
- (६४.०%)
- (५.५%)
- (४.१%)
जागतिक:(२६.४%)
इंग्रजी विकिपीडियाच्या ९२.७%च्या आकड्यानंतर नंतर दक्षिण आफ्रिकेच्या सर्व शोधांपैकी आफ्रिकान्स विकिपीडियाचा आकडा २.२% आहे. नामिबियात, आफ्रिकान्स विकिपीडियाचा वापर १.२% शोधांवर वर इंग्रजी (८५.३%), जर्मन (५.७%) आणि पोर्तुगीज (१.५%) विकिपेडिया पेक्षा कमी, ४थ्या क्रमांकावर केला जातो. [३]
सर्व जर्मन संपादनांपैकी ०.१ %, सर्व बेल्जियन संपादनांपैकी ०.३% आणि सर्व दक्षिण आफ्रिकेतील संपादनांपैकी २४.४% संपादने आफ्रिकान्स विकिपीडियावर होतात. [४] आफ्रिकान्स विकिपीडियामध्ये नेदरलँड्स आणि बेल्जियमचा सहभाग बहुदा आफ्रिकान्स आणि डच भाषेच्या भाषेच्या संबंधामुळे आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "Wikipedia:2001", English-language Wikipedia (16 December 2006)
- ^ https://meta.wikimedia.org/wiki/List_of_Wikipedias#10_000+_articles. Accessed 18 September 2020.
- ^ Wikimedia Traffic Analysis Report – Wikipedia Page Views Per Country – Breakdown. Stats.wikimedia.org. Retrieved on 23 November 2013.
- ^ Africa. Stats.wikimedia.org. Retrieved on 23 November 2013.
बाह्य दुवे
[संपादन]- (आफ्रिकान्स भाषेत) आफ्रिकान्स विकिपीडिया
- (iआफ्रिकान्स भाषेत) आफ्रिकान्स विकिपीडिया मोबाइल आवृत्ती (मुख्यपृष्ठ अद्याप कॉन्फिगर केलेले नाही)
- एरिक झॅक्टे यांच्या द्वारे आफ्रिकान्स विकिपीडियासाठी आकडेवारी