अनुवांशिक संबंध (भाषाविज्ञान)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


भाषाविज्ञानात अनुवांशिक संबंध ही संबंधांसाठी सामान्य संज्ञा आहे जी भाषेमध्ये त्याच भाषेच्या कुटुंबांच्या सदस्यांमध्ये असते. एकाच भाषेच्या गटभागाशी संबंधित घनिष्ठ संबंध असलेल्या भाषा एक भाषाकुटुंबीय म्हणून ओळखल्या जातात. हे संबंध भाषिक विश्लेषणाच्या तुलनात्मक पद्धतीच्या उपयोगाने स्थापित केलेले असतात. दोन भाषा अनुवांशिकतेने संबंधित आहेत असे मानले जाते जर का त्या भाषेंचा पुर्वज एकच असेल किंवा एक् भाषा दुसऱ्या भाषेतून जन्माला आलेली असेल. उदाहरणार्थ, इटालियन ही भाषा लॅटिन भाषेपासून जन्मली आहे. म्हणूनच इटालियन व लॅटिन यांना अनुवांशिकतेने संबंधित असे म्हटले जाते. स्पॅनिश देखील लॅटिन भाषेपासून जन्मली आहे. म्हणून, स्पॅनिश आणि इटालियन अनुवांशिकदृष्ट्या संबंधित आहेत. त्याचप्रमाणे, डॅनिश, स्वीडिश आणि नॉर्वेजियन हे आनुवंशिकरित्या इंडो-युरोपियन भाषा कुटुंबातील उत्तर जर्मनिक शाखेच्या माध्यमातून संबंधित आहेत.