आदिवासी साहित्य संमेलन
ही संमेलने वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या नावांनी भरवतात. अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन, आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलन, दलित आदिवासी साहित्य संमेलन, दलित-आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन, जागतिक आदिवासी साहित्य संमेलन, जागतिक आदिवासी युवक युवती साहित्य संमेलन ही त्यांतली काही नावे.
१९८९साली भरलेल्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मण माने होते.
नाशिक
[संपादन]- फेब्रुवारी २००९मध्ये ८वे अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन नाशिक येथील कालिदास कलामंदिरात झाले. संमेलनाध्यक्ष रांची विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामदयाल मुंडा होते.
- आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या वतीने नाशिकमध्ये दोन दिवस विभागीय आदिवासी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ५ व ६ जानेवारी २०१२ या काळात महाकवी कालिदास कलामंदिर येथे हे संमेलन झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी साहित्यिक प्रा. डॉ. पुष्पा गावित होत्या.
चंद्रपूर
[संपादन]आदिवासी साहित्य परिषदेच्या वतीने ३० एप्रिल ते दोन मे २०११ या काळात, चंद्रपूर शहरात तीन दिवसीय आदिवासी साहित्य संमेलन झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत बाळकृष्ण रेणके होते.
नागपुर
[संपादन]९वे अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन ७-८ मे २०११ या काळात नागपुरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित झाले. आदिवासी साहित्य-संस्कृती संवर्धन समिती व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री उषाकिरण आत्राम या होत्या.
अमरावती
[संपादन]- अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने अमरावती येथे २१ डिसेंबर २०१८ या दिवशी 'राष्ट्रीय अदिवासी युवक-युवती सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संमेलन झाले. अध्यक्षस्थानी माजी खासदार सोमजी डामोर होते.