आचार्य
Jump to navigation
Jump to search
हा लेख आचार्य संज्ञा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, आचार्य (निःसंदिग्धीकरण).
आचार्य:- उपनयन करून मुलास ब्रम्हचर्याची दीक्षा देणारा तसेच सांग(स+अंग=सर्व अंगांसहीत) आणि सार्थरित्या वेदांचे अध्यापन करणारा गुरू म्हणजे आचार्य होय.
आचार्यांवाचून विद्येला अधिष्ठान प्राप्त होत नाही असा उपनिषदातील अध्यात्मविद्येचा सिद्धांत आहे. वेदोत्तरकाळी झालेले व्याकरणादी ग्रंथ, गृह्यसूत्रे, धर्मसूत्रे, श्रौतसूत्रे, स्मृती, पुराणे, दर्शनसूत्रे, भाष्ये आणि महत्त्वाचे मौलिक किंवा विचरणात्मक शास्त्रग्रंथ यांच्या प्रणेत्यांना 'आचार्य' अशी संज्ञा लावण्याची प्रथा आहे.
बौधायन, आपस्तंब, वसिष्ठ, गौतम, पाणिनी, बादरायण, वात्स्यायन, शंकर, रामानुज, मध्व, वल्लभ इत्यादिकांना आचार्य हे अभिधान आहे.
पहा : आचार्य गुरुजी आणि शास्त्री
संदर्भ: मराठी विश्वकोश खंड - १