Jump to content

आंतरजालाधारित प्रशिक्षण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंतरजालाधारीत प्रशिक्षण अथवा (इंग्रजी: Online Training) ऑनलाईन ट्रेनींग म्हणजे आंतरजालाचा वापर करून प्रशिक्षणासाठी लागणारे साहीत्य किंवा प्रशिक्षण देणारी सुवीधा. आंतरजालावर असलेल्या संकेतस्थळांवर पाने प्रकाशित करून मग प्रशिक्षार्थींना माहिती दिली जाते.

मात्र ही एक सर्वव्यापी संज्ञा झाली. यात अनेक प्रकार आहेत. जसे,

  • इ शिक्षण - शिक्षण विषयक सर्व मार्गदर्शन जालाद्वारे दिले जाते.
  • दृकश्राव्य पुस्तके (व्हिडियो बुक्स) - यामध्ये विषयाला धरून मर्यादीत आख्गलेल्या कालावधीत प्रशिक्षण दिले जाते.
  • वेबकास्ट/स्ट्रिमींग (मराठी शब्द?)
  • आंतरजालाधारीत प्रशिक्षण समुह

असे प्रशिक्षण देणे फायदेशीर ठरत असल्याने अनेक विद्यापीठे हे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. असे प्रशिक्षण देणे सहज शक्य व्हावे तसेच त्याचा संपूर्ण अहवाल ठेवता यावा या साठी ब्लॅकबोर्ड लर्नींग सिस्टीम (इंग्रजी: Blackboard Learning System) सारखी आंतरजालाधारीत पद्धती निर्माण करण्यात आल्या आहेत. ही ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने स्थित कंपनीने बनवलेली खाजगी सुवीधा आहे. या सुवीधे द्वारे एखादे प्रशिक्षण निर्धारीत करणे, त्याचे वितरण करणे तसेच त्याचे नियोजन करणे ही कामे करता येतात. तसेच सर्व प्रशिक्षणार्थींना एकमेकांशी संवाद साधता येतो.