असंका गुरूसिन्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(असांका गुरुसिंहा या पानावरून पुनर्निर्देशित)

असंका गुरुसिन्हा (सिंहला: අසංක ගුරුසිංහ; १६ सप्टेंबर १९६६ (1966-09-16), कोलंबो) हा एक निवृत्त श्रीलंकन क्रिकेट खेळाडू आहे. गुरुसिन्हाने त्याच्या कारकीर्दीमध्ये ४१ कसोटी सामन्यांमध्ये २,४५२ धावा व २० बळी तर १४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३,९०२ धावा व २६ बळी नोंदवले. १९९६ क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये गुरुसिन्हाने ६५ धावा काढून श्रीलंकेच्या विजयाला मोठा हातभार लावला.

बाह्य दुवे[संपादन]