Jump to content

अवनी लेखरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अवनी लेखरा
अवनी लेखरा
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ८ नोव्हेंबर २००१,
जन्मस्थान जयपूर, राजस्थान, भारत
उंची ५ फूट ३ इंच
वजन किलो
खेळ
देश भारत
खेळ नेमबाजी
खेळांतर्गत प्रकार एअर रायफल एसएच १
प्रशिक्षक सुमा शिरूर
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर भारत
सर्वोच्च जागतिक मानांकन
वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी पॅरालिंपिक सुवर्णपदक, विश्वविक्रम

अवनी लेखरा (जन्म ८ नोव्हेंबर २००१) ही एक भारतीय पॅरालिम्पियन आणि रायफल नेमबाज आहे.तिने तोक्यो २०२० पॅरालिम्पिकमध्ये १० मीटर एर रायफल स्टँडिंगमध्ये सुवर्णपदक आणि ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये कांस्य पदक जिंकले.[]

लेखरा सध्या महिलांच्या १०  मीटर एर रायफल स्टँडिंग एसएच१ (जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट रँकिंग) मध्ये जागतिक क्रमांक २ वर आहे.  पॅरा चॅम्पियन्स कार्यक्रमाद्वारे तिला गोस्पोर्ट्स फाउंडेशनने पाठिंबा दिला आहे. ती पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे.[] तसेच एकाच पॅरालिम्पिक स्पर्धेत एकापेक्षा जास्त पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. [१] तिला राजस्थान सरकारने सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) म्हणून नियुक्ती दिली आहे.

कारकीर्द

[संपादन]

२०१५ मध्ये भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा यांच्याकडून प्रेरणा घेऊन अवनीने नेमबाजी या खेळाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.

अवनीने तोक्यो २०२० पॅरालिम्पिकमध्ये १०  मीटर एर रायफल स्टँडिंगमध्ये २४९.६ गुणांच्या विश्वविक्रमासह सुवर्णपदक आणि ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये कांस्य पदक जिंकले.

  • पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धा २०२२

अवनीने जून २०२२ मध्ये पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत १०  मीटर एर रायफल स्टँडिंगमध्ये २५०.६ गुण मिळवून स्वतःचाच विश्वविक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदक जिंकले. याबरोबरच तिने २०२४ च्या पॅरीस पॅरालिम्पिकसाठी कोटा मिळवला.[]

अवनीने जून २०२२ मध्ये पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत ५  मीटर एर रायफल ३ पोझिशन्समध्ये ४५८.३ गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले.[]

व्यक्तिगत आयुष्य

[संपादन]

२०१२ साली अपघातात सापडल्यामुळे वयाच्या ११ व्या वर्षी अवनीला पॅराप्लेजिया झाला. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला खेळाचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. तिने तिरंदाजीपासून सुरुवात केली. मात्र पुढे ती नेमबाजीकडे वळली.

अवनी सध्या राजस्थानात कायद्याचे शिक्षण घेत आहे. []

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Avani Lekhara - Shooting | Paralympic Athlete Profile". International Paralympic Committee (इंग्रजी भाषेत). 2022-03-06 रोजी पाहिले.
  2. ^ "Avani Lekhara wins gold with world record in Para World Cup". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2022-06-07. 2022-06-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Avani Lekhara wins gold with world record in Para World Cup". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2022-06-07. 2022-06-09 रोजी पाहिले.
  4. ^ Jun 11, PTI / Updated:; 2022; Ist, 23:10. "Para Shooting World Cup 2022: Avani Lekhara clinches second gold | More sports News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-06-17 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  5. ^ "Tokyo Paralympics 2020: Indian athletes make history" (इंग्रजी भाषेत). 2021-09-06.
  6. ^ "National Sports Awards 2021: Neeraj Chopra, Lovlina Borgohain, Mithali Raj Among 9 Others to Get Khel Ratna". News18 (इंग्रजी भाषेत). 2021-11-02. 2022-05-21 रोजी पाहिले.
  7. ^ "Para champions, Neeraj Chopra, hockey star Vandana Katariya among Padma awardees". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2022-01-26. 2022-05-21 रोजी पाहिले.