अलेक्सी नव्हाल्नी
अलेक्सेइ नव्हाल्नी Алексей Навальный | |
भविष्यातील रशिया पक्षाचे अध्यक्ष
| |
विद्यमान | |
पदग्रहण १७ नोव्हेंबर २०१३ | |
जन्म | ४ जून, १९७६ बूत्यीन, (सोव्हियेत संघ) |
---|---|
राष्ट्रीयत्व | रशियन |
राजकीय पक्ष | भविष्यातील रशिया |
मागील इतर राजकीय पक्ष | याब्लोको (२०००-२००७) |
पत्नी | युलिया नवालनाया |
निवास | मॉस्को |
व्यवसाय | वकील, भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ते |
सही | |
संकेतस्थळ | https://navalny.com |
अलेक्सेइ अनातोलीविच नव्हाल्नी (रशियन: Алексей Анатольевич Навальный, ४ जून१९७६ )हे रशिया मधील एक विरोधी नेते वकील व भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ते आहेत. ते राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे समीक्षक आहे.[१]
सुरुवातीचे जीवन
[संपादन]नवालनी यांचा जन्म बूत्यीन येथे युक्रेनियन वडील आणि रशियन आईच्या पोटी झाला. १९९३ मध्ये त्यांनी मॉस्कोमधील पीपल्स फ्रेंडशिप युनिव्हर्सिटीमध्ये कायद्याची अभ्यास केला.१९९८ मध्ये ते पदवीधर झाले.[२] २००० मध्ये, नवालनी रशियन युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी, "याब्लोको" मध्ये सामील झाले.
कारकीर्द
[संपादन]ते त्यांच्या लाईव्हजर्नल या ब्लॉगद्वारे ओळखले गेले. २०१२ मध्ये, वॉल स्ट्रीट जर्नलने "व्लादिमीर पुतिनला ज्याला सर्वात घाबरते ती व्यक्ती" असे त्याचे वर्णन केले.[३] नवालनी हे रशियन विरोधी समन्वय समितीचे सदस्य आहेत. ते येल वर्ल्ड फेलो देखील आहेत.
२०१८ च्या निवडणुकीत ते रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार होते. त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात निवडणूक लढविली.[४]
२०२० विषप्रयोग आणि अटक
[संपादन]२० ऑगस्ट २०२० रोजी तोम्स्क, सायबेरिया येथून मॉस्कोला जाणाऱ्या उड्डाणादरम्यान नवालनी यांच्यावर विषबाप्रयोग झाला[५] आणि त्यांना ओम्स्कमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले.[६][७][८] On 7 September 2020, he woke up from the coma,[९] तो लवकरच व्हेंटिलेटरवर कोमात गेले. ७ सप्टेंबर २०२० रोजी, तो कोमातून जागे झाले आणि १४ सप्टेंबर रोजी, त्याला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. त्यांना २२ सप्टेंबर रोजी रुग्णालयातून विमुक्त करण्यात आले.[१०]
१७ जानेवारी २०२१ रोजी, बर्लिन मध्ये उपचार झाल्यावर ते रशियात परतले, जिथे त्यांना निलंबित तुरुंगाच्या शिक्षेच्या अटींचे उल्लंघन करण्यासाठी अटक करण्यात आली.[११][१२]
संदर्भ
[संपादन]- ^ "Who is Alexei Navalny: Tech-savvy anti-corruption fighter and thorn in Putin's side". Sky News (इंग्रजी भाषेत). 2020-08-20 रोजी पाहिले.
- ^ Ioffe, Julia. "Net Impact". The New Yorker (इंग्रजी भाषेत). 2020-08-20 रोजी पाहिले.
- ^ Kaminski, Matthew (2012-03-03). "The Man Vladimir Putin Fears Most". Wall Street Journal (इंग्रजी भाषेत). ISSN 0099-9660. 2015-01-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-20 रोजी पाहिले.
- ^ "रशिया नव्या वळणावर". Maharashtra Times. 2021-10-26 रोजी पाहिले.
- ^ "ॲलेक्सी नवालनी यांनी सांगितला विषप्रयोगातून बाहेर येतानाचा अनुभव".
- ^ DeMarche, Edmund (20 August 2020). "Alexei Navalny, a top Putin foe, allegedly poisoned: reports". Fox News (इंग्रजी भाषेत). 20 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "Russian opposition leader Alexei Navalny in intensive care after airport tea 'poisoning'". Telegraph Media Group Limited. 20 August 2020.
- ^ "Russian opposition leader Alexei Navalny 'poisoned'". BBC News. 20 August 2020.
- ^ "Russia's Navalny out of coma after poisoning". BBC News (इंग्रजी भाषेत). 2020-09-07. 2020-09-07 रोजी पाहिले.
- ^ "पुतीन विरोधी नवलनी यांना विमानतळावरच अटक; मागील वर्षी झाला होता विषप्रयोग". Maharashtra Times. 2021-10-26 रोजी पाहिले.
- ^ "Alexei Navalny detained at airport on return to Russia". the Guardian (इंग्रजी भाषेत). 2021-01-17. 2021-10-26 रोजी पाहिले.
- ^ author/online-lokmat (2021-02-03). "पुतीन यांच्या सर्वात मोठ्या विरोधकाला साडेतीन वर्षांची शिक्षा; रशियात उफाळू शकतो मोठा हिंसाचार". Lokmat. 2021-10-26 रोजी पाहिले.