Jump to content

एर्विन रोमेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अर्विन रोमेल या पानावरून पुनर्निर्देशित)
एर्विन रोमेल

एर्विन योहानस युजीन रोमेल तथा फील्ड मार्शल रोमेल (नोव्हेंबर १५, इ.स. १८९१:हाइडेनहाइम, बाडेन-व्युटेम्बर्ग, जर्मनी - ऑक्टोबर १४, इ.स. १९४४:हेर्लिन्जेन, जर्मनी ) म्हणून ओळखले जाते) हे दुसऱ्या महायुद्धातील सर्वात प्रसिद्ध जर्मन सेनापतींपैकी एक होते. जर्मनीचा महान सेनानायक. रोमेलचा जन्म १८९१ मध्ये श्टुटगार्ट जवळील हाइडेनहाइम येथे झाला. त्याची जर्मन लष्करामध्ये अधिकारी कॅडेट म्हणून १९१० मध्ये भरती झालि. आणि लवकरच अधिकारीपदावर सेकंड लेफ्टनंट म्हणून १९१२ मध्ये नेमणूक झाली. त्याने पहिल्या महायुद्धात फ्रांस, रोमेनियाइटलीमध्ये युद्धात भाग घेतला.

पहिल्या महायुद्धानंतर रोमेलने १९२९-३३ दरम्यान ड्रेस्डेन इन्फंट्री स्कूल त्यानंतर १९३५-३८ मध्ये पॉट्सडॅम वॉर अकॅडेमी या लष्करी विद्यालयांत शिक्षक म्हणून काम केले. यावेळेपर्यंत रोमेल एक साधा अधिकारी म्हणूनच ज्ञात होता. १९३८ मध्ये रोमेलला हिटलरच्या सुरक्षेची जवाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर रोमेलने पोलंडच्या आक्रमणामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली.

पोलंडच्या कामगिरी नंतर रोमेलची मेजर जनरल पदी नियुक्ती झाली. त्याने ७व्या पॅन्झर डिव्हिजनची सूत्रे हाती घेऊन फ्रांसच्या आक्रमणात उल्लेखनीय कामगिरी बजावली.

१९४१-४२ दरम्यान रोमेल आफ्रिका कोरचा सेनापती होता.