Jump to content

अरेसीबो वेधशाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरेसीबो रेडिओ दुर्बीण
अरेसीबो रेडिओ दुर्बिणीचे छायाचित्र
संस्थाएसआरआय इंटरनॅशनल
युएसआरए
युएमइटी
स्थळअरेसीबो, पोर्तो रिको
तरंगलांबी३ सेंमी ते १ मी
स्थापना१९६३
दूरदर्शक श्रेणी गोलाकार परावर्तक
व्यास१,००० फूट (३०५ मी)
संग्रहण क्षेत्रफळ७३,००० चौरस मीटर (७,९०,००० चौ. फूट)
माऊंटसेमी ट्रांझिट दुर्बीण, स्थिर प्राथमिक आरसा
संकेतस्थळwww.naic.eduअरेसीबो वेधशाळा ही अटलांटिक महासागरातील पोर्तो रिको देशामध्ये अरेकिबो शहराच्या दक्षिणेला बारा किलोमीटर अंतरावर असलेली एक वेधशाळा आहे. अरेसीबो वेधशाळेचे प्रमुख साधन रेडियो दुर्बीण[श १] हे आहे. अमेरिकेचे संरक्षण खाते आणि कॉर्नेल विद्यापीठाच्या संयुक्त प्रकल्पान्वये ही वेधशाळा १ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी बांधून पूर्ण झाली. हिच्या उभारणीसाठी ८३ लक्ष डॉलर्स खर्च आला होता.

अरेसीबो डिश ॲंटेना

[संपादन]

अरेसीबो वेधशाळेच्या परिसरातील अनेक टेकड्यांच्या मधल्या खोलगट भागाचा अंतर्गोल[श २] आरशासारखा उपयोग करण्यात आला आहे. प्रत्यक्षात तो आरसा नसून विद्युतचुंबकीय[श ३] संदेशांचे ग्रहण आणि प्रक्षेपण करणारी प्रचंड डिश ॲंटेना आहे. ही डिश निरनिराळ्या दिशांना फिरविता येत नाही किंवा तिचा कोनही बदलता येत नाही. अरेसीबो डिश ॲंटेनाचा व्यास ३०४ मीटर असून त्याने ८ हेक्टर (२२० एकर) क्षेत्र व्यापलेले आहे. डिशच्या सभोवती परिघाजवळ ११७ मीटर, ७९ मीटर आणि ७९ मीटर उंचीच्या तीन खांबांवरून ६५ मीटर लांबीच्या बाजू असलेला एक त्रिकोणी प्लॅटफॉर्म डिशच्या मधोमध आडवा तरंगत ठेवण्यात आला आहे. विद्युतचुंबकीय संदेश डिशवर परावर्तित होऊन प्लॅटफॉर्मवरील एका विशिष्ट बिंदूत एकत्र होतात. त्या ठिकाणी असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या साहाय्याने ते ग्रहण केले जातात.

अरेसीबो डिश ॲंटेना भूपृष्ठाशी जखडलेली असल्यामुळे केवळ वरून खाली सरळ येणारे संदेश ती ग्रहण करू शकते किंवा केवळ तिला त्याच दिशेत संदेश प्रक्षेपित करता येतात. सुरुवातीच्या काळात ४३ कोटी हर्ट्‌झ (४३० मेगाहर्ट्‌झ) कंपनसंख्या असलेल्या रडार ट्रान्समिटरचा उपयोग संदेश प्रक्षेपणासाठी करण्यात आला होता.

परग्रहावरील सजीवसृष्टीसाठी पाठविलेला संदेश

[संपादन]

पारिभाषिक शब्दसूची

[संपादन]
  1. ^ रेडियो दुर्बीण (इंग्लिश: Radio Telescope - रेडिओ टेलिस्कोप) - रेडिओ लहरी पकडणारी दुर्बीण
  2. ^ अंतर्गोल किंवा अंतर्वक्र (इंग्लिश: Concave - कॉन्केव्ह)
  3. ^ विद्युतचुंबकीय (इंग्लिश: Electromagnetic - इलेक्ट्रोमॅग्नेटिक)

पर्यटन स्थळे

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]