अरुणावती धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अरुणावती धरण हे यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती नदीवर असणारे धरण आहे. हे धरण यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या धरणांपैकी असून हे जिल्ह्यातले बेंबळा धरणाखालोखाल दुसरे सर्वात मोठे धरण आहे. हे धरण आर्णी तालुक्यात आहे. या धरणाला एकूण ११ दरवाजे आहेत.