Jump to content

अरविंद डि सिल्व्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अरविंद डी सिल्वा या पानावरून पुनर्निर्देशित)
अरविंद डि सिल्व्हा (1996)

अरविंद डि सिल्व्हा (सिंहला: පින්නදුවගේ අරවින්ද ද සිල්වා; १७ ऑक्टोबर, १९६५ (1965-10-17), कोलंबो) हा एक निवृत्त श्रीलंकन क्रिकेट खेळाडू आहे. डि सिल्व्हा आजवरच्या सर्वोत्तम श्रीलंकन फलंदाजांपैकी एक मानला जातो. आपल्या कारकीर्दीमध्ये त्याने ९३ कसोटी सामन्यांमध्ये ६,३६१ धावा व २९ बळी तर ३०८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ९,२८४ धावा व १०६ बळी नोंदवले. १९९६ क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये डि सिल्व्हाने तीन बळी घेऊन व १०७ धावा काढून श्रीलंकेच्या विजयाला मोठा हातभार लावला. त्याला अंतिम सामन्याचा सामनावीर ठरवण्यात आले होते.

बाह्य दुवे

[संपादन]