Jump to content

अमोल कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉ. अमोल अरविंद कुलकर्णी
पूर्ण नावडॉ. अमोल अरविंद कुलकर्णी
जन्म 3 डिसेंबर १९७६
निवासस्थान पुणे
नागरिकत्व भारतीय
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिन्दू
कार्यक्षेत्र रासायनिक अभियांत्रिकी
कार्यसंस्था राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा
प्रशिक्षण इन्स्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई
डॉक्टरेटचे मार्गदर्शक डॉ. जे.बी.जोशी  
पुरस्कार शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार
वडील अरविंद कुलकर्णी

डॉ. अमोल अरविंद कुलकर्णी (3 डिसेंबर १९७६)[] हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक पदावर कार्यरत शास्त्रज्ञ आहेत.[] त्यांना २०२० साली शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार देण्यात आला.[]

शिक्षण

[संपादन]

अमोल कुलकर्णी यांचे प्राथमिक शिक्षण उद्गीर येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात झाले.[]

त्यांनी मुंबई येथील इन्स्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून १९९८ साली बी.टेक. (रासायनिक अभियांत्रिकी) ही पदवी[], २००० मध्ये एम. टेक. (रासायनिक अभियांत्रिकी) ही पदव्युत्तर पदवी तर २००३ साली पीएच.डी. मिळवली.[]

कारकीर्द

[संपादन]

२००४ ते २००५ या काळात डॉ.कुलकर्णी यांनी जर्मनीमधील मॅक्स प्लँक इन्स्टीट्यूट फॉर डायनमिक्स ऑफ कॉम्प्लेक्स टेक्निकल सिस्टीम्स येथे पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून काम केले. एप्रिल २००५ पासून त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत रासायनिक अभियांत्रिकी विभागात काम करण्यास सुरुवात केली. []

डॉ.कुलकर्णी यांनी औषधे, रंग, सुवासिक रसायने आणि नॅनो पदार्थ निर्मितीसाठी लागणाऱ्या रासायनिक भट्ट्याची रचना आणि विकास या क्षेत्रात काम केले आहे.[] भारतातील पहिली मायक्रोरीॲक्टर लॅबोरेटरी त्यांनी उभारली.[]

अनेक आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये त्यांचे ४९ शोधप्रबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी भारतात तसेच अमेरिकेत पेटंट दाखल केली आहेत.[] 

ते विद्यावाचस्पती पदवीसाठी (पीएच.डी.) विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून काम करतात.

पुरस्कार

[संपादन]
  • शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार (२०२०)
  • डॉ. ए. व्ही. राव अध्यासनासाठी नियुक्ती (२०२०)[]
  • एनसीएल रिसर्च फाऊंडेशनकडून सायंटीस्ट ऑफ द इयर पुरस्कार (२०१३)
  • एनसीएल रिसर्च फाऊंडेशनकडून टेक्नोलॉजी ऑफ द इयर पुरस्कार (२०१६)
  • VASVIK फाऊंडेशनचा VASVIK पुरस्कार (२०१६)[]
  • सीएसआयआरचा यंग सायंटीस्ट पुरस्कार
  • भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमीचे युवा शास्त्रज्ञ पदक (२००९)

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Noël, Timothy (2020-09-01). "Meet The Flow Chemist – Dr. Amol A. Kulkarni". Journal of Flow Chemistry (इंग्रजी भाषेत). 10 (3): 471–474. doi:10.1007/s41981-020-00110-9. ISSN 2063-0212.
  2. ^ Singh, Jyoti. "Inexpensive technology for production of silver nanowires". @businessline (इंग्रजी भाषेत). 2020-09-29 रोजी पाहिले.
  3. ^ PTI (2020-09-27). "CSIR Announces Awardees of Shanti Swarup Bhatnagar Prize for 2020". The Wire Science (इंग्रजी भाषेत). 2020-10-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-09-28 रोजी पाहिले.
  4. ^ "अमोल कुलकर्णी यांना 'शांतिस्वरूप भटनागर' पुरस्कार जाहीर". Nilkantheshwar Samachar. 2020-09-28 रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ a b "SELECTBIO - Flow Chemistry India Speaker Biography". selectbiosciences.com. 2020-09-28 रोजी पाहिले.
  6. ^ a b "CSIR-National Chemical Laboratory Faculty". academic.ncl.res.in. 2020-09-28 रोजी पाहिले.
  7. ^ a b c "राज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार". Loksatta. 2020-09-27. 2020-09-28 रोजी पाहिले.
  8. ^ ".:: Vasvik.org ::". www.vasvik.org. 2020-11-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-09-28 रोजी पाहिले.