अमूल
Appearance
(अमूल डेरी या पानावरून पुनर्निर्देशित)
![]() | |
प्रकार | सहकारी संस्था |
---|---|
उद्योग क्षेत्र | दूध व निगडित उत्पादने |
स्थापना | १९४६ |
संस्थापक | त्रिभुवनदास पटेल |
मुख्यालय |
आणंद, गुजरात, ![]() |
महसूली उत्पन्न | ३८,६०० कोटी रुपये |
कर्मचारी | ३६ लाख दूध उत्पादक |
संकेतस्थळ | अमूल.कॉम |
अमूल ही भारत देशामधील एक प्रमुख दूध उत्पादक सहकारी संस्था आहे. १९४६ साली गुजरातच्या आणंद शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली अमूल भारतामध्ये दूध क्रांती घडवून आणण्यासाठी ओळखली जाते. पद्मभूषण त्रिभुवनदास पटेल हे अमूलचे संस्थापक होते. तसेच व्हर्गीज कुरियन ह्यांनी अमूल दूधाला देशभर पोचवण्यात सिंहाचा वाटा उचलला. आजच्या घडीला ३८,६०० कोटी रुपये इतकी वार्षिक उलाढाल असलेली अमूल ही जगातील सर्वात मोठ्या दूध उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. दूधासोबत ताक, दही, चीज, पनीर, चॉकलेट इत्यादी असंख्य लोकप्रिय उत्पादने अमूलच्या ब्रॅंडखाली विकली जातात.