अनुवाद अभ्यास
अनुवाद अभ्यास ही एक शैक्षणिक आंतरविद्या आहे जी अनुवाद आणि स्थानिकीकरणाच्या सिद्धांतांचा पद्धतशीर अभ्यास, वर्णन आणी उपयोगाशी संबंधित आहे. एक आंतरविद्या म्हणून, अनुवाद अभ्यास अनुवादाला आधार देणाऱ्या अभ्यासाच्या विविध क्षेत्रांमधून बरेच काही घेते. यामध्ये तुलनात्मक साहित्य, संगणक विज्ञान, इतिहास, भाषाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, तत्वज्ञान, चिन्हमीमांसा, आणि शब्दावली यांचा समावेश आहे.
इंग्रजीत "ट्रान्सलेशन स्टडीज" हा शब्द ॲमस्टरडॅम-आधारित अमेरिकन विद्वान जेम्स एस. होम्स यांनी त्यांच्या 1972 च्या एका शोधनिबंधात सर्वात आधी वापरला होता. इंग्रजीतील लेखक अनुवाद अभ्यासाचा संदर्भ देण्यासाठी अधूनमधून "ट्रान्सलेटोलॉजी" (आणि कधीकधी "ट्रॅडक्टोलॉजी") हा शब्द वापरतात. युनायटेड स्टेट्समध्ये, "ट्रान्सलेशन आँड इंटरप्रीटिंग स्टडीज " या शब्दाला प्राधान्य दिले जाते (अमेरिकन ट्रान्सलेशन आणि इंटरप्रीटिंग स्टडीज असोसिएशन प्रमाणे), पण युरोपियन परंपरेमध्ये इंटरप्रीटिंग (मौखिक अनुवाद) अनुवाद अभ्यासामध्ये समाविष्ट आहे ( युरोपियन सोसायटी फॉर ट्रान्सलेशन स्टडीज प्रमाणे).
इतिहास
[संपादन]प्रारंभिक अभ्यास
[संपादन]ऐतिहासिकदृष्ट्या, अनुवाद अभ्यास फार पूर्वीपासून "कायदाप्रणित" (अनुवादकांना अनुवाद कसे करावे हे सांगणारे) होते, व तेही इतके की, कायदाप्रणित नसलेल्या अनुवादाची चर्चा सामान्यतः अनुवादाविषयी अजिबात मानली जात नव्हती. उदाहरणार्थ, जेव्हा अनुवाद अभ्यासाचे इतिहासकार अनुवादाबद्दल सुरुवातीच्या पाश्चात्य विचारांचा शोध घेतात, तेव्हा ते सुरुवात सहसा प्रसिद्ध वक्ता सिसेरोने ग्रीकमधून लॅटिनमध्ये अनुवादाचा वापर त्याच्यी वक्तृत्व क्षमता सुधारण्यासाठी कसा केला याच्या टिपण्यापासून करतात - हे जेरोमच्या सेन्स फॉर सेन्स अनुवादाचे प्रारंभिक वर्णन आहे. अनेक शतकांपूर्वी हेरोडोटसने लिहिलेल्या इजिप्तमधील दुभाष्यांचा वर्णनात्मक इतिहासाला सामान्यतः अनुवाद अभ्यासात मानल जात नाही - कदाचित कारण ते अनुवादकांना अनुवाद कसे करावे हे सांगत नाही. चीनमध्ये, अनुवाद कसे करावे यावरील चर्चेचा उगम हान राजवंशाच्या काळात बौद्ध सूत्रांच्या अनुवादापासून झाला.
ज्ञानशाखेसाठी आवाहन
[संपादन]1958 मध्ये, मॉस्कोमधील स्लाव्हिस्टांच्या चौथ्या महासभेत, अनुवादाच्या भाषिक आणि साहित्यिक दृष्टिकोनांमधील वादविवाद अशा टप्प्यावर पोहोचला जिथे अनुवादासाठी एक वेगळे विज्ञान असणे सर्वोत्तम उपाय मानले गेले. हे विज्ञान पूर्णपणे भाषाशास्त्रात किंवा पूर्णपणे साहित्यिक अभ्यासात नसुन अनुवादाच्या सर्व प्रकारांचा अभ्यास करण्यास सक्षम असेल असे ठरवले गेले. तौलनिक साहित्याभ्यासात, 1960 मध्ये आयोवा विद्यापीठ आणि प्रिन्सटन सारख्या काही अमेरिकन विद्यापीठांमध्ये अनुवाद कर्मशाळानां प्रोत्साहन देण्यात आले.
1950 आणि 1960 च्या दशकात, अनुवादाचा पद्धतशीर भाषिक-अभिमुख अभ्यास दिसू लागला. 1958 मध्ये, फ्रेंच भाषाशास्त्रज्ञ जीन-पॉल विनय आणि जीन डार्बेलनेट यांनी फ्रेंच आणि इंग्रजीची विरोधाभासी तुलना केली. 1964 मध्ये, यूजीन नायडा यांनी बायबल अनुवादासाठी एक पुस्तिका, "टूवर्ड अ सायन्स ऑफ ट्रान्सलेटिंग", प्रकाशित केली ज्यावर काही प्रमाणात हॅरिसच्या रचनांतरण-व्याकरणाचा प्रभाव होता. 1965 मध्ये, जे.सी. कॅटफोर्ड यांनी भाषिक दृष्टीकोनातून अनुवादाचा सिद्धांत मांडला. 1960 आणि 1970 च्या दशकाच्या सुरुवातीस, चेक विद्वान जिरी लेव्ही आणि स्लोव्हाक विद्वान अँटोन पोपोविच आणि फ्रँटीसेक मिको यांनी साहित्यिक अनुवादाच्या शैलीविचारावर काम केले.
1972 मध्ये कोपनहेगन येथे झालेल्या तिसऱ्या अंतरराष्ट्रीय उपयोजित भाषाशास्त्र महासभेतील साहित्यिक अनुवादावरील संशोधनाच्या सुरुवातीच्या चरणांचे संकलन जेम्स एस. होम्सच्या शोधनिबंधात करण्यात आले. "द नेम एंड नेचर ऑफ ट्रान्सलेशन स्टडीज ", ह्या शोधनिबंधात होम्सने अनुवादासाठी एका वेगळ्या ज्ञानशाखेची स्थापना करण्यास सांगितले व या क्षेत्राचे वर्गीकरण प्रस्तावित केले. होम्सच्या प्रस्तावाचा दृश्यमान "नकाशा" नंतर गिडियन टूरीने त्यांच्या 1995 "डिस्क्रिप्टिव ट्रान्सलेशन स्टडीज एंड बियोंड " यात सादर केला.
1990 च्या दशकापूर्वी, अनुवाद विद्वान विशिष्ट विचार संप्रदायांची, विशेषतः कायदाप्रणित, वर्णनात्मक आणि स्कोपोस रूपावलीमध्ये, रचना करत होते..1990 च्या दशकातील सांस्कृतिक वळणापासून, ही ज्ञानशाखा चौकशीच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विभागली गेली आहे, जेथे संशोधन प्रकल्प एकमेकांकडून व इतर शैक्षणिक शाखांकडून शोधपद्धति सामायिक करत, एकमेकांना समांतर चालतात.
विचार संप्रदाय
[संपादन]संशोधनाच्या संदर्भात प्रमुख विचार संप्रदाय काही मुख्य सैद्धांतिक संकल्पनांकडे झुकल्या आहेत, ज्यापैकी बहुतेक वादाचे विषय बनले आहेत.
समतुल्यता
[संपादन]1950 आणि 1960 च्या दशकात, अनुवाद अभ्यासातील चर्चा "समतुल्यता" कशी मिळवायची याच्याशी संबंधित होती. "समतुल्यता" या शब्दाचे विविध विचार संप्रदायांनुसार दोन वेगळे अर्थ होते. रशियाई परंपरेत, "समतुल्यता" हे सामान्यतः भाषिक स्वरूप किंवा अधिकृत तांत्रिक संज्ञा किंवा वाक्यांशांची जोडी यांच्यामधील परस्पर अनुरूपता होते, ज्यानुसार "समतुल्यता" "पर्यायी" च्या श्रेणीच्या विरोधात होते. परंतु, बॅलीच्या विचारांवर आधारित, विनय आणि डार्बेलनेटच्या फ्रेंच परंपरेत, "समतुल्यता" हे समान कार्यात्मक मूल्याची प्राप्ती होते, ज्यात साधारणपणे रूपात बदल गरजेचे होते. 1965 मध्ये कॅटफोर्डची समतुल्यतेची कल्पना फ्रेंच परंपरेप्रमाणे होती. 1970 च्या दशकात, रशियन सिद्धांतकारांनी "समतुल्यता" हे भाषिक परिवर्तनांच्या परिणामस्वरूप घडनारी गोष्ट या व्यापक अर्थाचा स्वीकार केला.
जवळपास त्याच वेळी, अनुवादाच्या व्याख्यात्मक सिद्धांताने अनुवाद अभ्यासामध्ये शब्दहीन (डिवरबलाईज्ड) अर्थाची कल्पना आणली ज्यानी शब्द अनुरूपता आणि अर्थ समतुल्यता यांच्यातील फरक रेखाटला आणि शब्द व वाक्यांशांच्या शब्दकोशातील व्याख्या (शब्द अनुरूपता) आणि दिलेल्या संदर्भातील मजकूर किंवा त्यातील तुकड्यांचा अर्थ (अर्थ समतुल्यता) या मधील फरक दर्शविला.
फेडोरोव्ह (1953) आणि विनय आणि डार्बेलनेट (1958) यांच्या विचारांवर आधारित, समतुल्यतेच्या चर्चेत अनुवाद उपायांच्या ("प्रक्रिया", "तंत्र" किंवा "धोरण" देखील म्हटले जानारे) प्रभेदविचारांचा समावेश होते. 1958 मध्ये, लोह डियानयांगच्या अनुवाद - तत्त्वे आणि तंत्रे (英汉翻译理论与技巧) ने फेडोरोव्ह आणि इंग्रजी भाषाशास्त्रावर आधारित चिनी आणि इंग्रजीमधील अनुवाद उपायांचा प्रभेदविचार सादर केला.
या परंपरेत, समतुल्यता प्राप्तीच्या मार्गांची चर्चा मुख्यतः कायदाप्रणित आहे आणि अनुवादक प्रशिक्षणाशी संबंधित आहे.
वर्णनात्मक अनुवाद अभ्यास
[संपादन]वर्णनात्मक अनुवाद अभ्यासाचे उद्देश होम्स नकाशाचा एक विभाग भरण्यासाठी अनुभवजन्य वर्णनात्मक शाखा तयार करणे आहे. सांस्कृतिक उत्पादनांना वैज्ञानिक पद्धती लागू होऊ शकते ही कल्पना 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात रशियन रूपवाद्यांनी विकसित केली होती आणि तौलनिक साहित्याभ्यासातील विविध संशोधकांनी ती परत मिळवली. ही कल्पना नंतर साहित्यिक अनुवादावर लागू करण्यात आली. या उपयोजनेचा एक भाग होता पॉलिसिस्टमचा सिद्धांत (इव्हन-जोहर 1990) ज्यामध्ये अनुवादित साहित्य हे प्राप्त किंवा लक्ष साहित्यिक प्रणालीची उप-प्रणाली म्हणून पाहिले जाते. गिडियन टूरी, संशोधनाच्या उद्देशाने अनुवादांना "लक्ष्य संस्कृतीचे तथ्य" म्हणून विचारात घेण्याच्या गरजेवर त्यांचा सिद्धांत मांडतात. साहित्यिक अनुवादाच्या संदर्भात "हाताळणी" आणि "आश्रय" या संकल्पनाही विकसित केल्या गेल्या आहेत.
स्कोपोस सिद्धांत
[संपादन]अनुवाद अभ्यासातील आणखी एक शोध 1984च्या युरोपमध्ये आणि जर्मन भाषेत प्रकाशित दोन पुस्तकांनमधे बघितला जाऊ शकते. कॅथरीना राईस आणि हान्स वर्मीर द्वारा लिखित "फाउंडेशन फॉर ए जनरल थिअरी ऑफ ट्रान्सलेशन", आणि जस्टा होल्झ-मेनटारी द्वारे लिखित "ट्रान्सलेटोरियल ॲक्शन ". या दोघांमधून स्कोपोस सिद्धांत म्हणून ओळखला जाणारा सिद्धांत आला आहे, जो समतुल्यतेला प्राधान्य देण्याऐवजी अनुवादाद्वारे पूर्ण होणाऱ्या उद्देशाला प्राधान्य देतो.
सांस्कृतिक अनुवाद
[संपादन]सांस्कृतिक वळण हे या ज्ञानशाखेच्या विकासात आणखी एक पाऊल पुढे होते. हे सुसान बास्नेट आणि आंद्रे लेफेव्हेर द्वारा "ट्रान्सलेशन- हिस्ट्री - कल्चर " मध्ये रेखाटले गेले आणि अनुवाद अभ्यास व इतर क्षेत्रीय अभ्यास आणि संकल्पना यांच्यातील देवाणघेवाण द्वारे त्वरित दर्शवले गेले. यात लिंग अभ्यास, नरभक्षकता, उत्तर-वसाहतवाद, सांस्कृतिक अभ्यास, व इतर अनेक क्षेत्रांचा समावेश होता.
सांस्कृतिक अनुवादाच्या संकल्पनाची उत्पत्ति मुख्यतः होमी भाभा यांच्या "द लोकेशन ऑफ कल्चर " मधील सलमान रश्दी यांच्यावरील वाचनावरून होते. सांस्कृतिक अभ्यासामध्ये सांस्कृतिक अनुवाद ह्या संकल्पनेचा वापर दिलेल्या संस्कृतीत, भाषिक किंवा अन्य परिवर्तनाची प्रक्रिया दर्शविण्यासाठी केला जातो. ही संकल्पना संस्कृतीतील परिवर्तन आणि आदान-प्रदानच्या स्वरूपाचे विश्लेषण करण्यासाठी भाषिक अनुवादाचा एक साधन किंवा रूपक म्हणून वापर करते.