अनंत रामचंद्र कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अ.रा. ऊर्फ अनंत रामचंद्र कुलकर्णी हे एक इतिहास संशोधक होते. ते पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे संस्थापक प्रमुख तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरूही होते.

अ.रा. कुलकर्णी यांच्या प्रयत्नामुळे डेक्कन महाविद्यालयाशी संलग्न असलेला इतिहास विभाग इ.स. १९६९ साली पुणे विद्यापीठात आला. तेव्हापासून इ.स. १९८८ पर्यंत अ.रा. या विभागाचे प्रमुख होते.

कुलकर्णी मूळचे सोलापूर जिल्ह्यातील. मुंबई विद्यापीठातून एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पीएच. डी. घेतली. इतिहास संशोधनासाठी ते लंडनच्या 'स्कूल आॅफ ओरिएंटल अँड आफ्रीकन स्टडीज', जर्मनीतील हायडलबर्ग आणि पॅरिस येथेही गेले होते. लंडनमधील संशोधनाच्या आधारे त्यांनी ग्रँट डफ याच्यावरील ग्रंथाचे लेखन केले.

लेखन[संपादन]

अ.रा. कुलकर्णी यांनी शिवकालीन महाराष्ट्र व मराठ्यांच्या इतिहासावरील अनेक ग्रंथाचे लेखन केले.

  • महाराष्ट्र इन द एज आॅफ शिवाजी
  • मध्ययुगीन महाराष्ट्र
  • मराठे आणि महाराष्ट्र
  • जेधे शकावली
  • मराठाज मिडिव्हल महाराष्ट्र
  • महाराष्ट्र सोसायटी अँड कल्चर
  • स्टडीज इन मराठा हिस्ट्री
  • मराठ्यांचा इतिहास (३ खंड) - ग.ह. खरे यांच्यासमवेत संपादन.