अध्यात्मोपनिषद
अध्यात्म उपनिषद हे उपनिषद् शुक्ल यजुर्वेदाशी संबंधित आहे. नावाप्रमाणेच आत्मतत्त्वाच्या साक्षात्काराचा विषय यात प्रतिपादित केलेला आहे. अजन्मा रूपात हे तत्त्व सर्व चराचर घटकांमध्ये आहे पण प्राणी त्याला जाणत नाहीत हे समजावून ‘सोहम’ आणि ‘तत्त्वमसि’ अशा सूत्रांच्या आधारे शरीर आणि विकारांच्या पलीकडे जाऊन आत्मसाधनेत मग्न राहण्याचा निर्देश दिलेला आहे. स्वप्न-सुषुप्ति अशा अवस्थांच्या पलीकडे जाऊन निर्विकल्प समाधी अवस्थेत परमात्मतत्त्वात लीन होण्याची गोष्ट सांगितलेली आहे. या समाधी अवस्थेस ‘धर्ममेघ’ म्हणून तिच्यात सर्व वृत्तींना लीन करून मुक्ती अवस्था मिळविण्याचा सल्ला दिलेला आहे. जीवनमुक्त अवस्थेचे वर्णन करताना त्या स्थितीत प्रारब्ध कर्म संपून जातात असे समजावून दिलेले आहे परंतु हे स्पष्ट केलेले आहे की ही अवस्था मिळविण्याआधी केलेल्या कर्मांचे प्रारब्धफळ अवश्य भोगावे लागते; इंद्रियवृत्तीप्रमाणेच प्रारब्ध कर्म देखील केवळ देहाभिमान्यांनाच बंधनकारक असते. गुरूच्या शिस्तीचे पालन करून शिष्यास अशी अवस्था प्राप्त झाल्यावर त्याचे प्रतिफल कोणते असते याचे वर्णन करून या औपनिषदिक ज्ञानाच्या हस्तांतरणाची परंपरा यात सांगितलेली आहे.
पहा :