आत्मबोध उपनिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हे उपनिषद् ऋग्वेदाशी संबंधित आहे. यालाच ‘आत्मप्रबोध उपनिषद’ असेही म्हणतात. या उपनिषदात दोन अध्याय आहेत. पहिल्या अध्यायात ओंकाररूपी नारायणास नमस्कार करून हृदयास ब्रह्मपूर आणि स्वप्रकाशित म्हटलेले आहे. हृदयात आणि सर्वत्र ‘प्रज्ञारूप’ - प्रज्ञानेत्र चेतनाचा निवास सांगितलेला आहे. ह्या ज्ञानाचे महत्त्व तसेच त्याच्या प्रभावामुळे अमरलोकात स्थान प्राप्त होण्याची गोष्ट सांगितलेली आहे. दुसऱ्या अध्यायात आत्मसाक्षात्कारी साधकांच्या अनुभूतींचा उल्लेख आहे. उसाच्या रसातील साखर आणि समुद्राच्या लाटांची उपमा देऊन ब्रह्म, जगत आणि जीव यांची अवस्था समजावून दिलेली आहे. आत्मानुभूतीच्या ह्या अवस्थेत सर्व लौकिक संबंधांचे तसेच भेदभावाचे अस्तित्व संपून जाण्याची आणि जीवन्मुक्तावस्था प्राप्त होण्याची गोष्ट सांगितलेली आहे.

पहा :