अजय पिरामल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अजय पिरामल
जन्म ३ ऑगस्ट १९५५ (वय ६३)
बागड, राजस्थान
निवासस्थान मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
ख्याती भारतातील यशस्वी उद्योजक
धर्म हिंदू
जोडीदार स्वाती पिरामल
अपत्ये २ –आनंद पिरामल, नंदिनी पिरामल
वडील गोपीकिसन पिरामल
आई ललिता पिरामल

अजय पिरामल(जन्म ३ ऑगस्ट १९५५) हे भारतातील आघाडीचे उद्योगपती व पिरामल ग्रुपचे अध्यक्ष आहेत. अजय पिरामल यांची कंपनी पिरामल एंटरप्राइजेज फार्मा, हेल्थकेयर, रिअल इस्टेट, इन्फॉर्मेशन सर्विसेस, ग्लास पॅकेजिंग आणि फायनान्स सर्व्हिसच्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. पिरामल ग्रुप भारताव्यतिरिक्त, अमेरिका, ब्रिटन, युरोप, जपान, आशिया आणि दक्षिण आशियासह ३० पेक्षा जास्त देशांमध्ये आपला व्यवसाय करत आहे.[१] ह्या कंपनीची उत्पादने जगातल्या १०० पेक्षा जास्त मार्केट मध्ये विकली जातात. पिरामल एंटरप्रायझेसचे बाजार भांडवल गेल्या सात वर्षांमध्ये चार पटींनी वाढले आहे, २०१०-११ मध्ये ते सरासरी १०,००० कोटींवरून ते एप्रिल २०१८ मध्ये ४५,००० कोटी रु. इतके झाले आहे.[२]

सुरुवातीचे जीवन[संपादन]

अजय पिरामल यांचा जन्म ३ ऑगस्ट १९५५ रोजी राजस्थान मधील बागड (जिल्हा झुंझुनूं) या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोपीकिसन पिरामल आणि आईचे नाव ललिता पिरामल होते. १९७७ मध्ये, वयाचा २२ व्या वर्षी त्यांचे आजोबा पिरामल चतुर्भुज यांनी १९३४ साली स्थापन केलेल्या वस्त्रोद्योगात काम करण्यास सुरुवात केली. १९७९ साली अजय पिरामल यांचा वडिलांचा मूत्यू झाला तर १९८४ साली त्यांचा भाऊ अशोक यांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला, त्यामुळे व्यवसायाची पूर्णं जबाबदारी अजय पिरामल यांचावर येऊन पडली. त्यानंतर ते ‘पिरामल एंटरप्राइजेज’चे अध्यक्ष बनले, त्याचबरोबर मोरारजी मिल्सचे अध्यक्ष व मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले.[३]

व्यवसायातील कारकीर्द[संपादन]

१९८२ च्या दत्ता सावंत हडताल ने मुंबईतील कापड उद्योगाला हद्दपार केले, त्यानंतर अजय पिरामल यांनी व्यापार करण्याचा इतर स्रोत निवडला.[२] त्यानंतर त्यांनी १९८८ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियातील बहुराष्ट्रीय कंपनी निकोलस लेबोरेटरीजला विकत घेतले. आणि त्याचे बदलून निकोलस पिरामल केले. फाइझर आणि ग्लॅक्सोसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करणाऱ्या निकोलस पिरामल कंपनीला भारतातील टॉप १० फार्मा कंपन्यांमध्ये पाचवे स्थान मिळाले आहे. रॉश, बोइंगर मॅनहाइम, रोन पोलेन्क, आयसीआय आणि होचस्ट रिसर्च सेंटर या भारतीय उपकंपन्यांसारख्या परदेशी अधिग्रहणांची एक स्ट्रिंग तयार केली. भारतातील पहिले मोठे शॉपिंग मॉल, क्रॉसरोड्स, उभारले. गेल्या दशकात, पिरामल ग्रुपने २० पेक्षा जास्त कंपनी अधिग्रहण केले आहेत आणि मर्क, एली लिली, फाइझर, ॲबॉट, व्होडाफोन, बायो-सिंटॅक, बेयर आणि डिसिझन रिसोर्सेस ग्रुप (डीआरजी) सारख्या जागतिक कंपन्यांशी भागीदारी केली आहे. हा ग्रुप आता फॉर्च्यून ५०० ने भारतभरातील ५० सर्वात मोठया महामंडळाचा रॅंक दिला आहे.[४]

संचालक आणि मंडळ सदस्य[संपादन]

 • अध्यक्ष - पिरामल ग्रुपचे
 • अध्यक्ष - श्रीराम ग्रुप
 • बिगर कार्यकारी संचालक - टाटा सन्स लिमिटेड
 • डिन ॲडव्हायजर्स मंडळ - हार्वर्ड बिझनेस स्कूलचे सदस्य
 • अध्यक्ष आणि संचालक मंडळाचे अध्यक्ष - अनंत नॅशनल युनिव्हर्सिटी
 • अध्यक्ष - प्रथम शिक्षण संस्था
 • सदस्य - सेंट्रल बोर्ड ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया
 • माजी अध्यक्ष - इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंदौर
 • सदस्य - भारतीय उद्योग संघाच्या राष्ट्रीय परिषद[५]

पुरस्कार[संपादन]

 • बिझनेस लीडर ऑफ द इयर, २०१८, इंटरनॅशनल एडव्हान्सिंग असोसिएशन लीडरशिप अवार्ड्स
 • अचिव्हमेंट अवार्ड्स, एशिया पॅसिफिक उद्यमी पुरस्कार (एपीईए) २०१८
 • सीएनबीसी एशिया बिझनेस लीड ऑफ द इयर, २०१७
 • सीएनबीसी एशियाचे इंडिया बिझनेस लीडर ऑफ द इयर अवॉर्ड, २०१८
 • एआयएमए मॅनेजिंग इंडिया द्वारा कॉर्पोरेट सिटीझन ऑफ द इयर अवॉर्ड, २०१६
 • सेन सस्टेनेबिलिटी अवॉर्ड, २०१५
 • क्रिएशेल ग्लोबल अचिवर्स पुरस्कार, २०१०

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "Ajay Piramal Biography in Hindi | अजय पीरामल जीवन परिचय | StarsUnfolded - हिंदी". hindi.starsunfolded.com (इंग्रजी भाषेत). 2018-08-23 रोजी पाहिले.
 2. ^ a b Layak, Suman (2018-04-08). "How Ajay Piramal is creating success stories by eschewing conventional wisdom". The Economic Times. 2018-08-23 रोजी पाहिले.
 3. ^ "Piramal family". Forbes (इंग्रजी भाषेत). 2018-08-23 रोजी पाहिले.
 4. ^ Unnikrishnan, C.H. (2014-04-17). "Piramal to buy 20% stake in Shriram Capital". https://www.livemint.com/. 2018-08-23 रोजी पाहिले. External link in |work= (सहाय्य)
 5. ^ "Scientist back on IIT panels". The Telegraph. 2018-08-23 रोजी पाहिले.