अंबिका सोनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Ambika Soni (es); অম্বিকা সোনি (bn); Ambika Soni (hu); Ambika Soni (ast); Ambika Soni (ca); Ambika Soni (yo); Ambika Soni (de); Ambika Soni (ga); امبيکا سوني (ps); अंबिका सोनी (mr); Ambika Soni (sl); アンビカ・ソニー (ja); অম্বিকা সোনী (as); ಅಂಬಿಕಾ ಸೋನಿ (kn); Ambika Soni (nl); Ambika Soni (fr); അംബിക സോണി (ml); ಅಂಬಿಕಾ ಸೋನಿ (tcy); ᱚᱢᱵᱤᱠᱟ ᱥᱚᱱᱤ (sat); अंबिका सोनी (hi); అంబిక సోని (te); ਅੰਬਿਕਾ ਸੋਨੀ (pa); Ambika Soni (en); امبیکا سونی (pnb); امبیکا سونی (ur); அம்பிகா சோனி (ta) política india (es); politikari indiarra (eu); política india (ast); política índia (ca); polaiteoir Indiach (ga); هندی سیاستوال (ps); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag); politiciană indiană (ro); indisk politiker (sv); індійський політик (uk); भारतीय राजनीतिज्ञ (hi); ਭਾਰਤੀ ਸਿਆਸਤਦਾਨ (pa); ভাৰতীয় ৰাজনৈতিক নেত্ৰী (as); Indian politician (en-ca); இந்திய அரசியல்வாதி (ta); politica indiana (it); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); personnalité politique indienne (fr); India poliitik (et); भारतीय राजकारणी (mr); política indiana (pt); פוליטיקאית הודית (he); política india (gl); politikane indiane (sq); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); indisk politikar (nn); ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയപ്രവര്‍ത്തക (ml); Indiaas politica (nl); Indian politician (en-gb); հնդիկ քաղաքական գործիչ (hy); ಭಾರತದ ರಾಜಕೀಯ ನೇತಾರರು (kn); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); Indian politician (en); سياسية هندية (ar); سیاست‌مدار هندی (fa); indisk politiker (da) Ambika Soni (ml)
अंबिका सोनी 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखनोव्हेंबर १३, इ.स. १९४२
लाहोर
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Indraprastha College for Women
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अंबिका सोनी (जन्म १३ नोव्हेंबर १९४२) ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित भारतीय राजकारणी आहे. त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम केले होते. त्या राज्यसभेत पंजाब राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार होत्या.

प्रारंभिक जीवन[संपादन]

अविभाजित पंजाबमधील लाहोर येथे १९४२ मध्ये भारतीय नागरी सेवा अधिकारी आणि गोव्याचे लेफ्टनंट गव्हर्नर नकुल सेन वाधवा व इंदू वाधवा यांच्या पोटी सोनींचा जन्म झाला.[१] त्यांची आई इंदू वाधवा या गृहिणी होत्या.

अंबिकाने वेल्हॅम गर्ल्स स्कूल, नवी दिल्ली येथे शिक्षण घेतले आणि दिल्ली विद्यापीठाच्या इंद्रप्रस्थ कॉलेजमधून एमए (ऑनर्स) केले. त्यानंतर अलायन्स फ्रँकेइस, बँकॉक येथून डिप्लोमा सुपीरिओर एन लॅंग्यू फ्रँकेइस आणि हवाना विद्यापीठातून (क्युबा) स्पॅनिश कला आणि साहित्यात पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा केला.

१४ ऑक्टोबर १९६१ ला, वयाच्या १९ व्या वर्षी, अंबिकाने उदय सोनी, भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी, सोबत लग्न केले.[२]

राजकीय कारकीर्द[संपादन]

अंबिका सोनी यांनी १९६९ मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात व इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षात सामील झाल्या. भारताच्या फाळणीच्या वेळी जेव्हा तिचे वडील अमृतसरचे जिल्हाधिकारी म्हणून तैनात होते तेव्हापासून सोनी गांधींच्या जुन्या कौटुंबिक मैत्रिणी होत्या आणि त्यांनी जवाहरलाल नेहरूंसोबत खूप जवळून काम केले होते. [३] १९७५ मध्ये तिची भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि संजय गांधींसोबत त्यांनी जवळून काम केले. [१] १९९८ मध्ये त्या अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. १९९९-२००६ पर्यंत त्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस होत्या.[२]

मार्च १९७६ मध्ये सोनी पहिल्यांदा राज्यसभेत निवडून आल्या. नंतर त्या जानेवारी २००० मध्ये पुन्हा निवडून आल्या. पुढे, त्या जुलै २००४ मध्ये आणि पुन्हा जुलै २०१० आणि जुलै २०१६ मध्ये निवडून आल्या.[४]

  • जानेवारी 2000 - फेब्रुवारी 2004
    • सदस्य, सार्वजनिक उपक्रम समिती
    • सदस्य, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सल्लागार समिती
  • फेब्रुवारी 2000 - 2001
    • सदस्य, संरक्षण समिती
  • मे 2000 - जून 2003
    • सदस्य, सभागृह समिती
  • जानेवारी 2002 - डिसेंबर 2003
  • सदस्य, परिवहन, पर्यटन आणि संस्कृती समिती
    • जानेवारी 2003 - फेब्रुवारी 2004
  • सदस्य, गृह व्यवहार समिती
  • ऑगस्ट 2004 - जानेवारी 2006
    • सदस्य, परिवहन, पर्यटन आणि संस्कृती समिती
  • ऑक्टोबर 2004 - जानेवारी 2006
    • सदस्य, पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या सल्लागार समिती
  • मार्च 2005 - जानेवारी 2006
    • सदस्य, पोस्ट-ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, चंदीगड
  • डिसेंबर 2012 - मे 2014
    • सदस्य, परराष्ट्र व्यवहार समिती
    • सदस्य, संरक्षण मंत्रालयासाठी सल्लागार समिती
  • मे 2013 - मे 2014
    • सदस्य, लोकलेखा समिती
  • सप्टेंबर 2014 - मे 2019
    • सदस्य, संरक्षण समिती
  • जुलै 2018 - फेब्रुवारी 2019
    • सदस्य, प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष (सुधारणा) विधेयक, 2018 वर राज्यसभेची निवड समिती
  • जुलै 2019 नंतर
    • सदस्य, पोस्ट-ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, चंदीगड
  • सप्टेंबर 2019 नंतर
    • सदस्य, वित्त समिती
  • ऑक्टोबर 2019 नंतर
    • सदस्य, सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाच्या सल्लागार समिती
  • 29 जानेवारी 2006 - 22 मे 2009
  • 22 मे 2009 - 27 ऑक्टोबर 2012

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "An affair to remember". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2009-12-11. 2022-05-03 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Once a Sanjay Gandhi's aide during Emergency, Ambika Soni declined offer to become Punjab CM" (इंग्रजी भाषेत). 6 Nov 2021. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  3. ^ "By invitation only". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2009-05-29. 2022-05-03 रोजी पाहिले.
  4. ^ "Ambika Soni makes a comeback" (इंग्रजी भाषेत). ११ फेब्रुवारी २०२३. Archived from the original on 2023-02-13. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  5. ^ "Soni, Wasnik, Sahai resign ahead of reshuffle". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2022-05-03 रोजी पाहिले.