Jump to content

अँतोनियो लुसियो विवाल्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲंतोनियो विवाल्डी

ॲंतोनियो लुसियो विवाल्डी (मार्च ४, इ.स. १६७८:व्हेनिस, इटली - जुलै २८, इ.स. १७४१) हा इटालियन बरोक संगीतकार आणि व्हायोलिनवादक होता.[१] याला बरोक संगीतकारांपैकी सर्वोत्तम मानले जाते. याने ४०पेक्षा जास्त ऑपेरांना संगीत दिले तसेच अनेक वाद्यसंगीतरचना केल्या. चार ऋतू (द फोर सीझन्स) या त्याने रचलेल्या चार संगीतरचना सगळ्यात जास्त प्रसिद्धी पावल्या.

पेशाने धर्मगुरू असलेल्या विवाल्डीला त्याच्या लाल केसांमुळे इल प्रेते रॉसो (लाल धर्मगुरू) असे टोपणनाव दिले गेले होते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ Talbot, Porter & Knapp 2022, § "Introduction".
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: