विकिपीडिया चर्चा:तटस्थ दृष्टीकोन
अशी भाषांतरे टाळावीत
[संपादन]या आणि इतरही काही पानांवर अनेक वाक्यातील मोजक्याच शब्द किंवा शब्दसमुहांचे मराठीत भाषांतर केले गेले आहे. मराठी -इंग्रजीची अशी सरमिसळ नंतर भाषांतर करू पाहणार्याना अडचणीची ठरते.त्यामुळे केले तर किमान एका पूर्ण वाक्याचे भाषांतर करावे, अन्यथा करू नये असे माझे मत आहे. -मनोज ०७:१६, १९ मार्च २०१० (UTC)
- इंग्रजी भाषेत ज्या वेगाने माहिती आणि ज्ञानाची भर पडत जात आहे,इंग्रजी भाषेतील संपूर्ण माहिती आणि ज्ञानाचे सोडून देऊ केवळ इंग्रजी विकिपीडिया आणि त्याच्या इंग्रजी सहप्रकल्पातील उपलब्ध ज्ञानाचे प्रमाण पहाता लोक वळून वळून इंग्रजी भाषेकडे पळतच राहणार.समस्त इंटरनेटवरील मराठी भाषिक बांधव मराठी विकिपीडीयावर संपादनास आणले तरी इंग्रजी विकिपीडियावरील पर्याने इंग्रजी भाषेवरील अवलंबीत्व संपणार नाही हे आज तरी संख्याशास्त्रिय सत्य आहे.
- ज्यांना आपापल्या मातृभाषा खर्या अर्थाने टिकावे असे वाटते त्यांनी , कितीही अडचणी आल्या तरी मशिन ट्रान्सलेशन्सचे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. "गरज हि शोधाची जननी आहे" हे वाक्य प्रत्यक्षात आणण्या करिता कोणत्याही तंत्रज्ञानाच्या प्राथमिक अवस्थेचे मुल्यमापन व परिक्षण सूचना अशा पद्ध्तीचा interactionचा अवलंब केल्यासच तंत्रज्ञान पुढे जाते. त्याचे प्रथमदर्शनी स्वरूप आवडले नाही म्हणून केवळ त्याच्याकडे पाठ फिरवली तर ते तंत्रज्ञान आणि पर्यायाने ते ज्यांच्या करिता अपेक्षीत आहे ते तुम्ही आम्ही मागे राहू असे वाटते.
- त्यामुळे या प्रयत्नांमध्ये सध्याजरी त्रुटींचे पर्वत असले तरी साध्य साधताना विविध साधनांच्या विकासाकडेही लक्ष देत राहावे लागेल असे माझे व्यक्तिगत मत आहे.त्याकरिता असे प्रयत्न कावयास हवेतच आणि अशा अनुभवातून पुढचे धडे गिरवता येतील.
- ज्यांना सलग भाषांतरे करून असे लेख पूर्णकरण्यास हातभार लावायचा आहे त्यांच्याकरिता इंग्रजीविकिपीडियावर मुळ उतारे उपलध आहेतच.त्या अपुरे भाषांतर झालेल्या लेखांची संख्या मर्यादे बाहेर वाढू नये यासाठी साधारणतः अपुरी भाषांतरे झालेल्या लेखांची मर्यादा अंदाजे २% लेखांपर्यंत मर्यादित ठेवावी - (खरे तर हे प्रमाण मराठी विकिप्डिडियावरील सक्रीय भाषांतरकारांच्या प्रमाणानुसार ठरवावयास हवे) - असा प्रस्ताव मागे संकल्प द्रविडांशी चर्चाकरताना मांडला होता. या बद्दल अधिक मते जाणून घेण्यास् निश्चितच आवडेल
- माहितगार ०६:३२, २१ मार्च २०१० (UTC)
आपली मते आवश्यक
[संपादन]या पानाच्या दुसर्या परिच्छेदाच्या भाषांतरावर मराठी विकीपीडिया सदस्य आणि अधिकार्यांनी कृपया मते मांडावीत आणि सूचना कराव्यात. सर्वांना योग्य वाटल्यासच पुढे जाण्याचा विचार आहे. हे भाषांतर नकोसे वाटणार्यांना उलटवण्याचा पर्याय आहेच.-मनोज १०:३७, १९ मार्च २०१० (UTC)
- भाषांतरात अस्सल निर्भेळ मराठी उठून दिसते आहे! बाकी कोणीही काही मत दिले नाही याचा अर्थ सर्वांना हे बदल मान्य आहेत असा धरावा. - कोल्हापुरी ०४:३८, २० मार्च २०१० (UTC)
इतरत्र सापडलेला मजकूर
[संपादन]इतरत्र सापडलेला मजकूर योग्य संपादने करुन या पानात समाविष्ट करावा -- अभय नातू (चर्चा) १८:२९, १३ मे २०१८ (IST)
विकिपीडियावरील सर्व मजकूर निष्पक्षपाती दृष्टिकोणातून लिहिलेला असला पाहिजे. याचा अर्थ असा की ज्या विशिष्ट विषयावर मजकूर लिहिलेला असेल, त्या विषयासंबंधातील सर्व लक्षणीय व विविध विचार जे विश्वसनीय स्रोतांमध्ये प्रसिद्ध झालेले असतील, त्यांचा योग्य प्रमाणात व कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय निष्पक्षपाती परामर्श घेतलेला असावा.
निष्पक्षपाती दृष्टिकोण हे विकिपीडियाचे आणि विकिमीडियाच्या इतर प्रकल्पांचे एक मूलभूत तत्त्व आहे. तसेच ते विकिपीडियाच्या केंद्रस्थानी असलेल्या तीन धोरणांपैकी एक आहे; इतर दोन धोरणे ही - "पडताळणी करता येणे" आणि "मूलभूत संशोधन नाही." ही धोरणे सामायिकरीत्या ठरवितात की विकिपीडियावरील लेखांमध्ये कोणत्या प्रकारचा आणि गुणवत्तेचा मजकूर स्वीकारार्ह असेल, आणि त्या धोरणांचा निकष एकत्रितपणे लावला जात असल्याने, कोणत्याही एका धोरणाचा अर्थ स्वतंत्रपणे लावला जाऊ नये. संपादकांनी या तीन धोरणांचा नीट परिचय करून घ्यावा असा आमचा आग्रह आहे.
या धोरणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, आणि ज्या तत्त्वावर ते आधारित आहे, त्यांच्याविरुद्ध कोणतीही इतर धोरणे किंवा मार्गदर्शक तत्त्वे घालून देता येणार नाहीत किंवा संपादकांच्या सहमतीने सुद्धा तसे करता येणार नाही.
निष्पक्षपाती दृष्टिकोणाचे स्पष्टीकरण
निष्पक्षपातीपणा म्हणजे विकिपीडिया समुदायाला जे अपेक्षित असते, ते देण्यासाठी निरनिराळ्या विश्वसनीय स्रोतांचे काळजीपूर्वक विश्लेषण आणि समीक्षा करावी लागते आणि मग त्यातील माहिती समतोलपणे, योग्य प्रमाणात आणि शक्यतो कोणत्याही संपादकीय पूर्वग्रहाशिवाय वाचकापर्यंत पोहचवावी लागते. विकिपीडियाचा उद्देश वादविवादांचे वर्णन करणॆ हा असतो, परंतु त्यात भाग घेणे हा नसतो. संपादकांचा स्वत:चा स्वाभाविक दृष्टिकोण असू शकतो, परंतु त्यांनी निष्ठापूर्वक संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करावा व एका विशिष्ट दृष्टिकोणाचा दुसर्यापेक्षा अधिक पुरस्कार करू नये. तेव्हां, निष्पक्षपाती दृष्टिकोण म्हणजे कांही विशिष्ट दृष्टिकोण वगळणे नव्हे, तर ज्यांची पडताळणी करता येणे शक्य असेल व ज्यांच्यामध्ये पुरेसे वजन असेल, असे सर्व दृष्टिकोण समाविष्ट करणे. एका ज्ञानकोशासाठी योग्य असा निष्पक्षपातीपणा येण्यासाठी खालील तत्त्वांचा अवलंब करावा.
⦁ मते वस्तुस्थिति म्हणून मांडणे टाळावे. सर्वसामान्यपणे, लेखांमध्ये त्यांच्या विषयासंबंधातील लक्षणीय मतांची माहिती असते. तथापि, ती मते विकिपीडियाच्या आवाजात मांडू नयेत. त्याऐवजी, त्यांच्या विशिष्ट मूळ स्रोताचा उल्लेख करावा, किंवा जेथे योग्य असेल तेथे, त्याचा एक व्यापक दृष्टिकोण म्हणून उल्लेख करावा. उदाहरणार्थ, लेखात असे म्हणू नये की "वंशविच्छेद हे एक सैतानी कृत्य आहे", तर असे म्हणावे की "अमुक व्यक्तीने वंशविच्छेदाचे वर्णन मानवी पाशवीपणाची परिसीमा असे केले आहे." ⦁ वादग्रस्त दावे वस्तुस्थिति म्हणून मांडू नयेत. वेगवेगळे विश्वसनीय स्रोत एकाच विषयाबाबत उलटसुलट दावे करत असतील, तर त्या दाव्यांना मतप्रदर्शन समजावे, वस्तुस्थिति नव्हे, आणि ती थेट विधाने म्हणून मांडू नयेत. ⦁ वस्तुस्थितीला मत म्हणून मांडू नये. विश्वसनीय स्रोतांमध्ये मांडलेले वस्तुस्थितीचे दावे, जे निर्विवाद आणि निर्विरोध असतील, ते सर्वसामान्यपणे थेट विकिपीडियाचा आवाज म्हणून मांडावेत. एखाद्या निर्विवाद दाव्यासंबंधात अमान्यता दर्शविणारा लेख असेल, तरच मूळ दाव्याच्या स्रोताचा उल्लेख करावा अन्यथा तशी आवश्यकता नाही. तथापि, पडताळणीसाठी मूळ स्रोताची लिंक देणे नेहमीच अधिक चांगले. शिवाय, मजकूर अशा स्वरूपाचा नसावा की ज्यातून कोणत्याही प्रकारे विवाद दर्शविला जात असेल. ⦁ मूल्यमापनात्मक भाषा टाळावी. एक निष्पक्षपाती दृष्टिकोण त्या विषयाबद्द्ल (किंवा त्या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जे म्हणत असतील त्याबद्दल) सहानुभूति दर्शवीत नाही किंवा त्याची हेटाळणी करत नाही. अर्थात, क्वचित प्रसंगी स्पष्टतेसाठी यात थोडी तडजोड गरजेची असू शकते. मते आणि दुमते एका समतोल रंगात मांडावीत. संपादकीय मते त्यात घालू नयेत. जेव्हां एका विशिष्ट दृष्टिकोणाकडे झुकलेला संपादकीय पूर्वग्रह जाणवत असेल, तेव्हां तो लेख सुधारला पाहिजे. ⦁ परस्परविरोधी दृष्टिकोणांचे तौलनिक महत्त्व दर्शवावे. एखाद्या विषयासंबंधातील वेगवेगळ्या दृष्टिकोणांना असलेला तौलनिक पाठिंबा लेखात प्रतिबिंबित व्हावा आणि उगाचच त्यांची नसलेली समानता प्रतीत होऊ नये, किंवा एखाद्या विशिष्ट दृष्टिकोणाला अवाजवी वजन देऊ नये. उदाहरणार्थ, असे म्हणणे की, "सायमन वायझेन्थालच्या म्हणण्यानुसार, होलोकॉस्ट हा जर्मनीतील यहूदी लोकांचा समूळ नाश करण्याचा कार्यक्रम होता, परंतु डेव्हिड इर्विंग या विश्लेषणावर शंका व्यक्त करतो", हे मोठ्या बहुमताला आणि अल्पमताला एकाच पातळीवर ठेवल्यासारखे होईल, जणू ते दोन दृष्टिकोण दोन व्यक्तींचेच आहेत.