Jump to content

अरविंद अडिगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरविंद अडिगा
जन्म नाव अरविंद अडिगा
जन्म ऑक्टोबर १०, इ.स. १९७४
चेन्नई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती द व्हाइट टायगर
वडील के. माधव अडिगा
आई आशा अडिगा
पुरस्कार 'द व्हाइट टायगर' साठी मॅन बुकर पुरस्कार - २००८
संकेतस्थळ http://www.aravindadiga.com/

अरविंद अडिगा (२३ ऑक्टोबर, इ.स. १९७४:चेन्नई, भारत[] - ) हा आपली पहिलीच कादंबरी द व्हाइट टायगरसाठी बुकर पुरस्कार मिळवणारा साहित्यिक आणि एक पत्रकार आहे.[]

जीवन

[संपादन]

अरविंदचे मूळ गाव मंगलोर आहे. त्याचे वडील व्यवसायाने डॉक्टर होते. मंगलोरच्याच कॅनरा हायस्कूलमध्ये अरविंदचे माध्यमिक शिक्षण झाले. इ.स. १९९० साली तो एस.एस.सी. झाला. त्याचवर्षी त्याच्या आईचे निधन झाले, तरीही या परिक्षेत तो गुणवत्ता यादीत आला. नंतर मंगलोरच्याच ॲल्सोसिस कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेऊन तो ऑस्ट्रेलियाला गेला. तिथून नंतर अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात जाऊन त्याने इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला.

द फायनान्शियल टाइम्स, मनी आणि वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्रातून अरविंद आडिगाने व्यापार, उद्योग आणि आर्थिक प्रश्नांवर लेखन केले. टाईम या साप्ताहिकामध्ये त्याने तीन वर्षे वार्ताहर म्हणून काम केले. टाईम साप्ताहिकातील कामानंतर त्याने मुक्त पत्रकार म्हणून काम चालू केले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ [|आडिगा, अरविंद] (१८ ऑक्टोबर २००८). साचा:Citation/make link. Interview with विजय राणा. द इंडियन एक्सप्रेस. 
  2. ^ व्हिक़्टोरीया यंग. "नॉवेल अबाऊट इंडिया विन्स द मॅन बुकर प्राईझ" (इंग्रजी भाषेत). ८ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.