Jump to content

ग्वादालकॅनाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्वादालकॅनाल नैऋत्य प्रशांत महासागरातील सॉलोमन द्वीपसमूहात असलेले सगळ्यात मोठे बेट आहे.

दुसऱ्या महायुद्धात १९४२-४३ च्या सुमारास येथे व आसपासच्या समुद्रां जपानदोस्त राष्ट्रांत महाभयानक लढाया झाल्या.

होनियारा हे ग्वादालकॅनालच्या उत्तर किनाऱ्यावरील शहर ब्रिटिश आधिपत्याखालील सॉलोमन द्वीपसमूहांची राजधानी होती. स्वातंत्र्यानंतरही हेच शहर येथील राजधानी आहे. हे बेट जवळजवळ संपूर्णपणे जंगलाने नटलेले आहे. येथे माउंट पोपोमानास्यू हा जागृत ज्वालामुखी आहे.

१९९८मध्ये येथील लोकसंख्या अंदाजे ८५,००० होती.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Rumley, Dennis; Forbes, Vivian Louis; Griffin, Christopher. Australia's arc of instability: the political and cultural dynamics of regional security. p. 181. 20 October 2010 रोजी पाहिले.